हिशोब लागला, इंग्रज भारतातून ३,२१,७६,१२,५०,००,००,०००.५० रुपये घेवून गेलेले !
फेका फेका अजून जोरात फेका. हित अख्खी RBI कामाला लागली तरी नोटबंदीनंतर नोटा मोजायला दोन वर्ष लागले. आणि हे डायरेक्ट इंग्रजांनी किती रुपये नेले तो आकडा टाकायलेत.
पहिली गोष्ट हे आम्ही नाही सांगत, हे सांगितलय एका अर्थतज्ञ व्यक्तीने.
आणि हो त्यांनी कधीच मोदींना नोटबंदीचा सल्ला दिला नव्हता असे ते अर्थतज्ञ आहेत. त्यांनी काय केलय डिप अभ्यास केलाय. संशोधन केलं आणि रिसर्च पेपर मांडला. तो पण कुठल्यातरी ढोले पाटील टाईप विद्यापीठात नाहीत तर थेट कोलंबिया विद्यापीठात. याच रिसर्च नुसार त्यांना हा करेक्ट आकडा सांगितलाय.
आत्ता यावर एकच उपाय आहे शांतपणे हा आकडा मान्य करायचां. चुकून आपण मान्य केला नाही आणि त्या मॅडम म्हणाल्या की, करा रिचेक. बस्सा ! मुंबई विद्यापीठ साधा पेपर रिचेक करायला किती दिवस लावतय माहिताय न. त्यामुळं शांतपणे मान्य करा.
आत्ता मुळ मुद्दा कोण आहेत या मॅडम.
उत्सा पटनाईक त्याचं नाव. कोलंबिया युनिवर्सिटीमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आलं आहे की इंग्रजांनी भारतातून २०० वर्षात तब्बल ४५ ट्रिलीयन डॉलरची मालमत्ता लुटली. लुटली म्हणजे प्रॉपर लुटली. दिवसाढवळ्या दरोडा टाईप. तर या लुटीचा परिणाम काय झाला तर भारत गरिब झाला. याहून अधिक काय परिणाम होणाराय.
त्यांनी नुकतीच LIVE MINT ला मुलाखत दिली होती, त्यात त्या म्हणतात १७६५ आणि १९३८ च्या दरम्यान ची हि आकडेवारी असून ती 9.2 ट्रिलीयन पाऊंड / 45 ट्रिलीयन डॉलर आणि हे 3,21,76,12,50,00,00,000.50 हे जेवढं असतय तेवढे रुपये लुटले. वरचे पन्नास पैसे कुणाचे लुटलेत ते आम्हाला पण माहित नाही. त्यांचा दूसरा निष्कर्ष असाय की 1900-02 मध्ये आपल्या देशात प्रतिव्यक्ती उत्पन्न १९६.१ आणि १९४५-४६ ला २०१ रुपये होतं.
आणि एक गोष्ट त्यांनी असही सांगितल की, १९१० दरम्यान भारतीयांच सरासरी वयोमान २२ वर्ष होतं…! थोडक्यात त्या काळात अशी चौकाचौकात संध्याकाळच्या वेळेस फिरायला येणारी वयोवृद्ध माणसं कोणालाही बघायला मिळत नसणार.
असो, हिकडे उर्जितभाऊ पैसै मोजून मोजून आत्ता कुठं मोकळं व्हायला लागलेले. तेवढ्यात या मॅडमनी दूसरा बॉम्ब फोडलाय. आत्ता एक काम करा, या पैशाला लोकसंख्येनं भागा आणि प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये किती रुपये येतील त्याच गणित मांडा.
नोट- आलेली रक्कम १५ लाखांच्या वरचा बोनस म्हणून ग्राह्य धरायला सुरवात करा, २०१९ येतय आत्ता नवी रक्कम..
हे ही वाचा –
- मर्द को दर्द होता हैं, अर्थात पुरुषांच #metoo
- आम्ही त्या गुप्तरोगवाल्या डॉक्टरांना फोन केला आणि आमच्या फ्युजा उडाल्या !
- ताजमहल विकणाऱ्या नटवरलाल नं न्यायाधीशांना मात्र एक रुपयालाच फसवलं.