पाकिस्तानात एका पोरीवर ४०० पुरुषांच्या जमावानं अत्याचार केला. कारण होतं तिरंगा झेंडा !

हल्ली पाकिस्तानला आणि पाकिस्तानी लोकांना अगदी कशाचंच भान राहिलेलं नाही. जनावर बरी म्हण्टलंत तरी चालेल खरं ही पाकडी नको. ही म्हणायची वेळ येते कारण ही तसंच आहे. विचार करा फक्त ४०० पुरुषांच्या जमावात एक मुलगी. त्या मुलीला अगदी नको नको केलं त्या पुरुषांनी. आणि निर्ल्लजांसारखा तो व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल केला.

पाकिस्तानचे लाहोर शहर..इथं पोलिसांनी ४०० लोकांवर गुन्हा दाखल केला. या लोकांवर एका मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवलाय. लैंगिक अत्याचार झालेली हि मुलगी एक सोशल  मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे यु ट्यूबची कंटेंट क्रिएटर आहे. अक्षरशः पुरुषांनी तिचे कपडे फाडून त्याला हवेत फेकल्याचा आरोप आहे.

पीटीआयच्या वृत्तसंस्थाच्या हवाल्यानुसार, या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली. पाकिस्तानच्या जनतेने, हा व्हिडिओ त्यांच्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांना सोशल मीडियावर टॅग केला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रिपोर्टनुसार, १४ ऑगस्ट रोजी लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान जवळील आझादी चौकात अनेक पाकिस्तानी नागरिक स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. मग अचानक जमावाने एका मुलीला हवेत उडवायला सुरुवात केली. त्यांनी तिचे कपडे फाडले आणि तिला फरफटत नेले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेशी संपर्क साधला. पीटीआयच्या रिपोर्टनुसार  लाहोरच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने  एफआयआर दाखल करण्यासाठी पिडीतेचे मन वळविले. तसेच पोलिसांनी सांगितले की, ती मुलगी इतकी भेदरली होती की, एफआयआर दाखल  करेपर्यंत ती संपूर्ण वेळ रडत होती.

दुसरीकडे, पीडितेने तिच्या एफआयआरमध्ये सांगितले की तिचे एक यूट्यूब चॅनेल आहे. १४ ऑगस्ट रोजी, ती तिच्या सहा साथीदारांसह आझादी चौकात स्वातंत्र्य साजरा करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी गेली. पीडितेने तिच्या एफआयआरमध्ये पुढे सांगितले,

आम्ही क्लिप शूट करत होतो तेव्हा तिथं काही तरुणांनी मला स्पर्श करून टॉन्ट मारायला सुरुवात केली. त्या लोकांची संख्या वाढतच होती. मिनार-ए-पार्कचा एक सुरक्षारक्षक हे सर्व पाहत होता. त्याने मला वाचवण्यासाठी उद्यानाचा मुख्य दरवाजा उघडला. जेणेकरून मी सुटू शकेन. जेव्हा मी उद्यानात प्रवेश केला, तेव्हा जमाव माझ्या मागे लागला. जमावाने माझे कपडे फाडले. मला त्रास दिला. त्यांनी मला ओढले, हवेत फेकले. माझ्या सहकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली.

पीडितेने सांगितले की हे सर्व सुमारे एक तास चालले. काही लोकांनी तिला जमावाच्या तावडीतून वाचवले. पीडितेने असेही सांगितले की जमावाने तिचा फोन, तिची सोन्याची अंगठी आणि सुमारे दीड लाख पाकिस्तानी रुपये हिसकावले. व्हायरल व्हिडिओच्या मदतीने संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर असेही बोलले जात आहे की मुलीने तिच्यासोबत दोन झेंडे घेतले होते. एक पाकिस्तानचा आणि दुसरा भारताचा. तिला हे ध्वज तिच्या व्हिडीओ क्लिपसाठी वापरायचे होते कारण पाकिस्तानचा १४ ऑगस्ट आणि भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी येतो. दरम्यान, त्या गर्दीतल्या कोणीतरी भारताच्या ध्वजावर आक्षेप घेतला. आणि त्यामुळेच त्या मुलीवर असा हल्ला झाला. तथापि, पोलिसांनी दोन ध्वजांच्या गोष्टीची खातरजमा केलेली नाही.

हे झालं आत्ताच, मागे तर पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खानने अशा घटनांसाठी अख्या स्त्री जमातीलाच दोषी ठरवल होत. आता हे ४०० पुरुषांचं वागणं बघून काय म्हणणार शेठ! 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.