भारताच्या अंतराळ क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल म्हणजे इंडियन स्पेस असोसिएशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) लाँच केले.  ISPA अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित बाबींवर  स्वतंत्र एजन्सी म्हणून काम करणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

“अंतराळ क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञानाबाबत भारतात मोठे बदल होत आहेत. ‘इंडियन स्पेस असोसिएशन’ हा या बदलांचा दुवा आहे.  ISPA च्या निर्मितीसाठी मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.”

यावेळी पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील  प्रतिनिधींशी देखील संवाद साधला. या बैठकीत केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, इस्रोचे अध्यक्ष के शिवन आणि अध्यक्ष इनस्पेसचे पवन गोयनका उपस्थित होते.

या कार्यक्रमात, पीएम मोदी म्हणाले की, आज भारतामध्ये अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात मोठ्या सुधारणा होत आहेत, हा त्याचा दुवा आहे.

इंडियन स्पेस असोसिएशनची चार उद्दिष्टे आहेत. यामध्ये पहिले म्हणजे खाजगी क्षेत्राला नावीन्यासाठी स्वातंत्र्य देणे, दुसरे म्हणजे प्रवर्तक म्हणून सरकारची भूमिका सुनिश्चित करणे, तिसरे म्हणजे युवकांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे म्हणजे सामान्य नागरिकांचे साधन म्हणून अंतराळ क्षेत्र विकसित करणे.

१३० कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी अंतराळ क्षेत्र हे एक मोठे माध्यम आहे. स्पेस सेक्टर म्हणजे सामान्य माणसासाठी उत्तम मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी सुविधा आणि उद्योजकांसाठी शिपमेंट ते डिलिव्हरीपर्यंत चांगला स्पीड.

जगाला जोडण्यात अंतराळाच्या महत्वाची भूमिका.

पीएम मोदी म्हणाले की, २० व्या शतकात स्पेस आणि स्पेसवर राज करण्याच्या प्रवृत्तीने जगातील देशांची विभागणी कशी केली हे आपण पाहिले आहे. आता २१ व्या शतकात जगाला जोडण्यात अंतराळ महत्वाची भूमिका बजावते, भारताला याची खात्री करावी लागेल.

याशिवाय, पीएम मोदी म्हणाले की, एअर इंडियाबाबत घेतलेला आमचा निर्णय आमची बांधिलकी आणि गांभीर्य दर्शवतो. भारताला नवनिर्मितीचे नवीन केंद्र बनवावे लागेल. भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे एंड टू एंड टेक्नॉलॉजी आहे.

“भारताने अंतराळ क्षेत्रात नाविन्य आणले. आम्ही केंद्र आणि स्टार्ट-अप यांच्यातील सहकार्याचा मंत्रही दिला.

पंतप्रधानांनी हे देखील नमूद केले की, ISPA चे प्रक्षेपण अशा दिवशी होत आहे जेव्हा जग आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करत आहे. भारताच्या मंगळ मोहिमेशी संबंधित महिला शास्त्रज्ञांच्या यशाची आठवण करून देताना ते म्हणाले की, त्यांना आशा आहे की, अंतराळ क्षेत्रात महिलांच्या सहभागाला अधिक प्रोत्साहन मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला नवनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे. ही एक अशी रणनीती आहे जी भारताच्या तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि जागतिक विकासात मोठी भूमिका बजावेल. आत्मनिर्भर भारत ही केवळ एक मोहीम नाही. ही एक चांगली विचारसरणी आणि चांगली योजना आहे, जेणेकरून भारतातील उद्योजक आणि तरुणांचे कौशल्य वाढेल आणि भारताला ‘पॉवरहाऊस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग’ बनवता येईल.

इंडियन स्पेस असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, नेल्को, वनवेब, भारती एअरटेल, मॅप्मी इंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि अनंत टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.  हे संघ स्पेस संबंधित धोरणांचा पुरस्कार करतील आणि  सरकार व सरकारी संस्थांमध्ये समन्वय स्थापित करतील .

हे ही  वाचं  भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.