ज्यो बायडनला तालिबानी बनवणारे बॅनर लावणारा स्वघोषित ‘नेक्स्ट ट्रम्प तात्या’ आहे.. !

गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यात अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष जो बायडन तालिबान्यांच्या वेशात असून त्यांच्या हातात एक रॉकेट लॉन्चर सुद्धा दाखवलं गेलंय. सोबतच या पोस्टरवर लिहिलंय कि, ‘Making the Taliban Great Again’.

हा, आता हे क्लियर आहे कि, यामागे राजकीय खेळी आहे. कारण अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर जो बायडन वादाच्या कचाड्यात सापडलेत. कारण जसं त्यांनी अमेरिकन सैन्य परत बोलवलं त्यांनतर काहीच दिवसात तालिबान्यांनी अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केली. या सगळ्या प्रकारामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना टीकेला समोर जावं लागतंय.

या साखळीत आता बायडन यांना तालिबानी म्हंटल गेलंय. महत्वाचं म्हणजे त्यांच्या तालिबानी वेशातले हे पोस्टर बायडन यांच्या होमटाऊन पेनसिल्व्हेनियात लावले गेलेत.

या पोस्टरमुळे अमेरिकेत एकचं खळबळ उडाली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध एवढी हिम्मत कोणी असे प्रश्न समोर येत होते. मात्र, थोड्याच वेळात हे पोस्टर लावणारा चेहरा समोर आला. त्याने माध्यमातून स्वतः जाहीर केलं की,  आपणचं हे बिलबोर्ड लावले आहेत.

 

ती व्यक्ती म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा स्कॉट वॅग्नर. ६५ वर्षीय स्कॉट वॅग्नर स्वतः “नेक्स्ट ट्रम्प” म्ह्णून घेतात.

पेनसिल्व्हेनिया राज्यभरात जो बायडनचे हे विचित्र पोस्टर लावण्याचे श्रेय घेणाऱ्या स्कॉट वॅग्नरने यासाठी  तब्बल १५,००० डॉलर्स खर्च केल्याचं म्हटलंय.

खरं तर, स्कॉट वॅग्नर यांनी या पोस्टरच्या माध्यमातून बायडन यांना एकप्रकारे टोमणा मारलाय. कारण गेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी जो बायडन यांनी ‘Making America great again’ या स्लोगन अंतर्गत निडणूक लढवली होती.  

गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर अमेरिकेच्या प्रतिसादाबद्दल वॅग्नर उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.  या पोस्टरची जबाबदारी घेत स्कॉट वॅग्नरने म्हंटले कि,

‘मी कोणापासून लपवत नाही, आणि मला असेच वाटते. बायडनची खिल्ली उडवायला मला लाज वाटत नाही आणि कुठल्या गोष्टीचा पश्चातापही नाही. कारण बायडनच्या घाईगडबडीत का असेना पण निर्णयामुळे आज संपूर्ण जग अमेरिकेवर हसतंय. तालिबान उघडपणे सांगतंय की त्यांनी अमेरिकेला अफगाणिस्तानातून पळवून लावलं आणि ते आता खूप उत्साही आहेत.'”

एका अमेरिकन वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हंटल कि, ‘मी अफगाणिस्तान युद्धात भाग घेतलेल्या अनेक लष्करी दिग्गजांना भेटलो. असे अनेक सैनिक आहेत ज्यांनी अफगाणिस्थानात आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले आहे. लढताना त्यांनी केवळ हातपाय गमावले नाहीत, तर २० वर्षे चाललेल्या या युद्धात त्याची मानसिक स्थितीही खूप वाईट झाली आहे.”

‘त्यात बायडननं घातलेला मोठा गोंधळ म्हणजे युद्धग्रस्त देशातून माघार घेताना अमेरिका विमान, वाहने आणि अनेक शस्त्रे आणि स्फोटके मागे ठेवली, असंही स्कॉट वॅग्नर यांनी म्हंटल.

दरम्यान, स्कॉट वॅग्नर चर्चित येण्याची हि काय पहिली वेळ नाही. याआधीही स्वतःला ट्रम्प म्हणवून घेतल्यामुळं ते चर्चित आले होते. 

स्कॉट वॅग्नर हे एक अमेरिकन बिजनेसमॅन आणि राजकीय नेते आहे.  त्यांनी पेनसिल्व्हेनियाच्या २८ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेय. २०१८ च्या निवडणुकीत पेनसिल्व्हेनियाच्या गव्हर्नरसाठी ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते, त्यांना सध्याच्या डेमोक्रॅट टॉम वुल्फ यांनी पराभूत केले.

एक यशस्वी बिजनेसमॅन असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला फंडिंग करणाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांनी २०१८ मध्ये वॅग्नर यांना गव्हर्नर म्हणून मान्यता दिली.

हे ही  वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.