आजोबा ३० वर्षे भारतात सरपंच होते, नातू आज बायडनची भाषणे लिहितो..

अमेरिकेमध्ये काल पासून बायडन पर्व सुरु झाले आहे. तिथल्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बायडन यांनी आपल्या काही भविष्यातील काही योजनांबद्दल भाष्य केले. त्यांच्या या भाषणाला चांगलीच वाह-वाह मिळाली.

दुसऱ्या बाजूला भारतीयांसाठी देखील हे भाषण जरा खासच होत, बायडन काल जे काही बोलले त्यातील शब्द न शब्द एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने लिहला होता.

विनय रेड्डी असं या व्यक्तीच नाव.

आणि केवळ कालचच नाही तर मागच्या ८ वर्षांपासून म्हणजे बायडन उपराष्ट्राध्यक्ष असताना आणि त्यानंतरच्या काळातील देखील त्यांची प्रचाराची सर्व भाषण ही विनय यांनीच लिहिली होती. २०१३ पासून ते बायडन यांचे मुख्य भाषणलेखक आहेत.

आता त्यांना राष्‍ट्रपती जो बाइडन यांचे डायरेक्‍टर ऑफ स्‍पीचराइटिंग म्हणून नियुक्त केलं आहे 

विनय रेड्डी यांचं मूळ गाव तेलंगणा मधील पोथिरेडिपेटा.

त्यांचे आजोबा तिरुपती रेड्डी हे १९५० च्या दशकापासून जवळपास ३० वर्ष गावचे सरपंच होते. विनय यांच्या वडिलांचं नाव नारायण रेड्डी. त्यांचं शिक्षण देखील याच गावात झालं. १९७० च्या आसपास हैदराबादमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले आणि ते अमेरिकेला स्थायिक झाले.

पुढे विनय यांचा जन्म देखील अमेरिकेतच झाला. तर शिक्षणामध्ये त्यांची बॅचलर्स डिग्री मियामी यूनिवर्सिटीमधून आणि ओहायोच्या स्टेट यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लॉ मधून घेतलं. 

पुढे त्यांना त्यांच्या ओहायो राज्याच्या सिनेटर शेरॉड ब्राऊन यांचे मुख्य भाषण लेखक म्हणून मिळाली. त्यानंतर २०१३ ते २०१७ या काळात त्यांनी उपराष्ट्राध्यक्षांचे मुख्य भाषण लेखक म्हणून जबाबदारी पार पडली. त्याच दरम्यान त्यांनी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशयनमध्ये स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष, अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेमध्ये आणि आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ भाषण लेखक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

पुढे बायडन-हॅरिस यांचं प्रचारादरम्यान देखील त्यांचे मुख्य भाषण लेखक आणि संपूर्ण कॅम्पेनिंगचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहिलं.

जरी ते अमेरिकेमध्ये राहत असले तरी त्यांचं भारतामध्ये येणं जाणं कायम असते. त्यांच्या पोथिरेडिपेटा गावासोबत आज ही त्यांनी नातं जोडलेलं आहे. सध्या या गावात त्यांचे वडील नारायण रेड्डी आणि आई विजया रेड्डी यांचं घर आणि ३ एकर जमीन देखील आहे. शेवटचे भारतात ते फेब्रुवारी २०२० मध्ये आले होते.

विनय सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत आहेत. बायडनच्या धमाकेदार भाषणांचे, त्यांच्या विजयाचे शिल्पकार मानलं जातंय. भारतातल्या खेड्यात सरपंच असलेल्या इरसाल आजोबाचा हा खमक्या नातू राजकरण कोळून प्यायलाय आणि म्हणूनच अमेरिकेच्या अध्यक्षाची भाषणे रंगवणे त्याला जमलंय हे नक्की.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.