तेलात पैसा असतो याचं गणित कळलं आणि तो जगातला पहिला अरबपती बनला…

व्यवसाय करताना रिस्क घ्या, एकतर काहीतरी करून दाखवाल किंवा चांगला अनुभव घ्याल हे ध्येय धोरण ठरवून जॉन डेव्हीसन रॉकफेलर जगातले पहिले अरबपती बनले होते.

त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पहिल्यांदा तेलाचे कारखाने सुरु करून मोठी क्रांती घडवणारे रॉकफेलर यांची हि यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

रॉकफेलर यांची घरची परिस्थिती मूळची बेताची होती. त्याचे वडील लोकांना कॅन्सर वर खोट्या औषधाच्या बाटल्या विकून फसवायचे. या फसवेगिरीमुळे त्यांना सतत शहरं बदलावे लागत असे. यामुळे घरची जबाबदारी जॉनवर आली होती. चॉकलेट आणि कॅंडीज विकून जॉन घर चालवायचा. 

यामुळे जॉन रॉकफेलरची फॅमिली न्यूयॉर्कवरून क्लेव्हलँडमध्ये राहायला गेले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर जॉनने बुक किपींगचा २ वर्षाचा कोर्स केला. यातूनच त्याने काम देखील शोधलं. हेविट अँड टटल या कंपनीत त्याला बुक किपींग कोर्समुळे काम मिळालं. १४ डॉलर त्याचा पहिला पगार होता.

जो पगार येईल त्यातला १०% हिस्सा हा चॅरिटीसाठी द्यायचा हा नियम त्याने शेवटपर्यंत पाळला. काही मित्रांना सोबत घेऊन एक कंपनी सुरु केली आणि यातून व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं. यासाठी बँकेतून लोन घेतलं आणि फेडलं सुद्धा. पुढे कंपनी जेव्हा मोठी झाली तेव्हा सुद्धा बँकेसोबत त्याचे व्यवहार सुरूच होते.

पुढे जॉनला कळलं कि पेनसिल्व्हेनिया मध्ये ऑइल एक्सट्रॅकशनचं काम सुरु आहे. तेल बाहेर काढण्याच्या कामात आपण पैसा लावायला पाहिजे असा विचार जॉनच्या डोक्यात आला. पूर्ण अभ्यास करून त्याने ऑइल इंडस्ट्रीमध्ये उडी घेतली. त्याचा आहे निर्णय पूर्ण अमेरिकेसाठी कलाटणी देणारा ठरला. या व्यसनात रिस्क फॅक्टर आणि लक फॅक्टर खूप महत्वाचा होता, जॉनने ठरवल्याप्रमाणे यात स्वतःला झोकून दिलं. 

ऑइल एक्सट्रॅक्टशनपेक्षा ऑइल रिफायनिंगसाठी जॉनने प्रयत्न केले. यातून त्याने मध्ये पहिला रिफायनरी बिझनेस सुरु केला. यातून केरोसीन सुद्धा बनायला सुरवात झाली. संपूर्ण अमेरिकेत केरोसीन पोहचवण्यासाठी त्याने सुरवात केली. ट्रान्सपोर्टसाठी रेलवे मंजुरी देत नव्हती तेव्हा बड्या अधिकाऱ्यांसोबत डील करून त्याने हा ही प्रॉब्लेम मिटवला.

रिफायनरी त्याने थेट रेल्वे जवळच उभी केली जेणेकरून ट्रान्सपोर्टचा मॅटर निकाली निघेल. जॉन रॉकफेलर हा मुळातच हुशार होता. त्याच्या लक्षात आलं कि रिफायनरीच्या कामाच्या वेळेस वाया गेलेल्या ऑइल मधून काहीतरी नफा मिळेल असं प्रोडक्ट तयार करायला हवं. तेव्हा या वाया गेलेल्या तेलातून वॅसेलीन आणि मेणबत्तीचा शोध लागला. यातूनसुद्धा पैसा मिळू लागला. 

१८७० मध्ये जॉन रॉकफेलरने स्टॅंडर्ड ऑइल नावाने कंपनी सुरू केली. आपल्या पेक्षा कोणी ऑइल रिफायनरीचा व्यवसाय केला नाही पाहिजे या धोरणातून त्याने दार महिन्याला ३-४ ऑइल कंपन्या विकत घ्यायला सुरवात केली ज्या छोट्या प्रमाणावर चालत होत्या. पहिल्यांदा पाईप लाईन सिस्टीमचा वापर करून जॉनने लोकांना एकदम स्वस्तात रॉकेल वाटायला सुरवात केली.

या मुळे स्टँडर्ड ऑइल मोठी कंपनी बनली. पैसा कमावण्याचा उद्देश रॉकफेलरचा नव्हता आपल्या कंपनीचं नाव लोकांपर्यंत कसं जाईल याचा तो विचार करत असायचा. बँकांनी वेळोवेळी जॉनला लोन देऊन मदत केली त्यामुळे हि कंपनी टिकली.

१८८२ मध्ये अमेरिकेतली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून स्टँडर्ड ऑइल ओळखलं जाऊ लागलं. ९०% ऑइल हे स्टँडर्ड कंपनी अमेरिकेला पुरवत होतं. १८९० मध्ये रॉकफेलर चॅरिटीकडे वळला होता. त्याने शिकागो युनिव्हर्सिटी स्थापन केली.

पण १९०२ मध्ये इडा टार्बेल या महिलेने स्टँडर्ड ऑइलवर आणि रॉकफेलरवर आरोप केले कि एकाधिकारशाही आणून रॉकफेलरने अनेक लोकांचं नुकसान केलं आहे, जॉनच्या वडिलांवर फसवणुकीचे आरोप लावले. 

या आरोपांमुळे जॉन रॉकफेलर घाबरून गेला. त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागले. या आरोपांमुळे पुढे स्टँडर्ड ऑइल ३४ भागांमध्ये विभागली गेली. १९१६ मध्ये जॉन रॉकफेलर जगातला पहिला बिलेनियर बनला. वयाच्या ९७ व्या वर्षी त्याचं निधन झालं. पुढे अँड्र्यू कार्नेजीने स्टँडर्ड ऑइल सांभाळायला सुरवात केली.

पहिल्यांदा तेलातून पैसा मिळवायला सुरवात करून आणि बिलिनियर बनून रॉकफेलरने एक सेगमेंट सेट केलं ते कायमचंच…

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.