नायक पिक्चरमधल्या अनिल कपूरसारख्या कमला ताई पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा बनल्या..
आज कमला हॅरिस ताईंना सगळे अमेरिकवासीय म्हणत असतील,
आज खुश तो बोहोत होंगे आप !
असं का ? अहो भिडूनो आपल्या भारतीय वंशाच्या कमला ताई अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्यात. कमाल आहे की नाही…
खर तर जो बायडन यांच्या रुटीन चेकअप मध्ये त्यांना ऍनास्थेशीया दिला जाणार होता. त्यामुळे ते काही वेळासाठी बेशुद्ध असणार होते. अमेरिकेच्या प्रोटोकॉल प्रमाणे जर राष्ट्राध्यक्ष जर बेशुद्ध असतील तर त्याच्या पॉवर्स उपराष्ट्राध्यक्षाकडे जातात. त्याप्रमाणे शुक्रवारी ८५ मिनिटांसाठीच कमला ताई राष्ट्राध्यक्ष झाल्या होत्या.
आजपर्यंतच्या अमेरिकेच्या २५० वर्षांच्या इतिहासात कोणत्याच महिला राष्ट्राध्यक्षा बनल्या नव्हत्या.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं काय साधीसुधी गोष्ट नसते. जगातला सगळ्यात ताकदवर नेता म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. ८५ मिनिटांसाठी का होईना. राष्ट्राध्यक्ष तो राष्ट्राध्यक्षच.
पण राष्ट्राध्यक्षाचे अधिकार काय असतात ते बघूया.
अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष निवडला जातो. कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त दोन टर्मसाठी अध्यक्ष होऊ शकते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे केंद्र आणि राज्यांचे प्रमुख देखील असतात. संसदेने संमत केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे ही त्यांची जबाबदारी आहे. देशाचे सर्वोच्च राजनैतिक अधिकारी असल्याने ते नवीन देशांनाही मान्यता देऊ शकतात.
अमेरिकेत तीन शक्ती एकमेकांवर नियंत्रण ठेवतात. राष्ट्रपती नियुक्ती करू शकतात, परंतु यासाठी सिनेटची संमती आवश्यक आहे. परंतु सिनेटच्या मान्यतेशिवाय ही राष्ट्रपती स्वतःचे मंत्री आणि दूत नियुक्त करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायच झालंच तर, कायदेमंडळ कार्यकारिणींवर नियंत्रण ठेवते.
राष्ट्रपती देशाच्या भविष्याबाबत वेळोवेळी संसदेला माहिती देतात. ते देशाला संबोधित ही करतात. परंतु राष्ट्रपती त्यांच्या वतीने विधेयक मांडू शकत नाहीत. भाषणाच्या माध्यमातून त्यांना सामान्य जनतेचा पाठिंबा मिळू शकतो आणि संसदेवर कायदा करण्यासाठी ते दबाव आणू शकतात.
राष्ट्रपती कोणत्याही विधेयकावर स्वाक्षरी करण्यास नकार देऊ शकतात. ही त्यांची व्हेटो पॉवर आहे. पण संसद दोन तृतीयांश बहुमताने राष्ट्रपतींचा व्हेटोही रद्द करू शकते.
यूएस राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींच्या अधिकाराचा स्पष्टपणे उल्लेख करत नाही. यामुळेच राष्ट्रपतींना आणखी एक व्हेटो ट्रिकचा पर्याय उपलब्ध आहे. याला पॉकेट व्हेटो म्हणतात. विशेष परिस्थितीत राष्ट्रपती विधेयक “आपल्या पॉकेट” मध्ये ठेवू शकतात. संसद हा व्हेटो रद्द करू शकत नाही. ही युक्ती अमेरिकेत आतापर्यंत १००० वेळा तरी वापरली असावी.
राष्ट्रपती सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करण्याचे निर्देश देऊ शकतात. या ताकदीला कार्यकारी आदेश म्हणतात. पण याचा अर्थ राष्ट्रपती निरंकुश होतो असे नाही. न्यायालये आणि काँग्रेस अशा आदेशांविरुद्ध कायदे करू शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही देशासोबत करार करू शकतात, परंतु त्याला सीनेटच्या दोन तृतीयांश लोकांच्या संमतीनंतरच कायदेशीर मान्यता मिळते. त्यांना कार्यकारी करार म्हणतात.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे अमेरिकन लष्कराचे कमांडर-इन-चीफ देखील आहेत. परंतु संसदच युद्ध घोषित करू शकते. संसदेच्या मान्यतेशिवाय राष्ट्रपती हिंसाप्रवण भागात सैन्य पाठवू शकतात का याबाबत फारशी स्पष्ट घटनात्मक सूचना नाही. म्हणजे व्हिएतनाम युद्धावेळी पण असच घटनात्मक आव्हान उभ राहिल होत.
आता एवढे अधिकार मिळत असतील ते ही ८५ मिनिटांसाठी तर विषय आहे का ? कमला ताईंसारख्या नशीबवान त्याच म्हणायच्या. एकदम नायक पिक्चर मधल्या अनिल कपूर सारख्या ओ.
हे हि वाच भिडू
- भारती पवार यांच्या म्हणण्यानुसार खरचं सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या आहेत का ?
- कोरोना लसीचं माहित नाही पण डोलो ६५० चे मालक रग्गड श्रीमंत झालेत ..
- सध्या डोकं वर काढलेल्या डेल्टा प्लसची माहिती भारतीय संशोधकांना २०२० मध्येच मिळाली होती.