लालुंनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले..

फिल गुड फॅक्टर, इंडिया शायनिंगची हवा निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा २००४ च्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. निवडणूक पुर्व चाचण्यांमध्ये मतदारांचा कौल भाजपच्या बाजूने असल्याचे समोर आले होते.

त्यामुळे त्यांनी सहा महिने आधीच लोकसभा बरखास्त करुन निवडणूका घेतल्या.

पण निकालांमध्ये मतदारांनी भाजपला नाकारत तब्बल आठ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी नकार दिल्यानंतर कधीच चर्चेत नसलेले डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. पण या चाव्या स्वबळावर मिळाल्या नव्हत्या.

त्यापुर्वी मनमोहन सिंग यांच्या नावाला युपीएमधील सर्व पक्षांची सहमती असणे गरजेचे होते. आणि यात अत्यावश्यक अशी संमती होती ती लालु प्रसाद यादव यांची.

कारण युपीएमध्ये सर्वात जास्त म्हणजे १४५ जागा कॉंगेसच्या होत्या तर दोन नंबरला २२ जागा राजदच्या होत्या.  (डाव्या पक्षांनी युपीएला बाहेरुन पाठिंबा दिला होता)

युपीएची मुहूर्तमेढ 

एव्हाना भारताला आघाडी सरकारची सवय झाली होती. भाजपने यापुर्वी एनडीए स्थापन करुन अधिकृत आघाडी साकारली होती. पण २००४ मध्ये कॉंग्रेसनेही अधिकृत युपीए नावाची आघाडी स्थापन केली.

यात लालुंचा राष्ट्रीय जनता दल, तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष हे आणि इतर समविचारी पक्ष होते.  तर बाहेरुन डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने युपीए – १ सरकार अस्तित्वात आले आणि या सरकारचं नेतृत्व होते डॉ. मनमोहन सिंग यांच्या हातात.

मनमोहन सिंग यांचे नाव जाहीर करण्यापुर्वी सोनिया गांधीनी पंतप्रधान व्हावे यासाठी कॉंग्रेसचे खासदार आणि लालु प्रसाद यादव तयारी करत होते. पण सोनियांनी स्पष्ट नकार कळवला आणि डॉ. सिंग यांचे नाव जाहीर केले.

पण सोनिया गांधीनी नकार देतात राजदच्या लालु प्रसाद यादव यांचा सरकारला पाठिंबा न देण्याचा विचार चालू होता. तसेच मनमोहनसिंग यांच्या नावाला त्यांनी जाहीर विरोधही केला. मात्र पुढे जेव्हा त्यांनी मंजूरी दिली तेव्हाच मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

याबद्दल त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहीले आहे.

लालूप्रसाद यादव आपले आत्मचरित्र ‘गोपालगंज से रायसीना’ मध्ये लिहतात,

‘माझ्याकडे राजदचे २२ खासदार होते आणि मला असे वाटत होते की सोनिया गांधीनी पंतप्रधान व्हावे. तसे मी त्यांना बोलून ही दाखवले होते. कारण तसे झाल्यास तो माझ्या विचारसरणीचा विजय झाला असता.

कारण निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांनी त्यांच्या विरोधात अत्यंत अस्वीकार्य भाषा वापरली होती. सोबतच माझ्याही विरोधात अपप्रचार केला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या व्यतिरीक्त पंतप्रधान म्हणून मी कोणाचाही स्विकार करण्यास तयार नव्हता.

लालु पुढे लिहीतात,

जेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान पद नाकारले तेव्हा मला धक्का बसला. पण त्यांनी माझ्यासमोर लगेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचा विचार बोलून दाखवला. तसेच या नावाला संमती देण्यासाठी आग्रह करु लागल्या. पण मी तात्काळ नकार कळविला.  त्यानंतर नकार देण्यासाठीचे कारण जाणून घेण्यासाठी सोनिया गांधी डॉ. सिंग यांच्या समवेत माझ्या निवासस्थानी आल्या.

त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही मला विनंती केली की,

‘प्रधानमंत्री के रूप में स्वीकार कर लूं.’

मात्र मी दुविधेमध्ये होतो. एकीकडे सोनिया गांधी यांना मला नवीन पंतप्रधान म्हणून पहायचे होते. तर दुसरीकडे, मी त्यांची विनंतीला मी नकार देवू शकलो नाही. आणि अखेर मी डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा देण्यासाठी तयार झालो.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. paritosh karanje says

    बोल भिडू या वेबसाईटचे लेख वाचण्यास खुप भारी असतात.फक्त ज्या विषयी चा लेख आहे.ते फोटो पण लेखात दाखवत चला,वाचायला जास्त आवड निर्माण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.