महापुरात वडिलांचं मेडल वाहून गेलं त्याची भरपाई म्हणून पेसने घरात मेडलांचा पूर आणला होता.

भारतात सध्या क्रिकेटचं वारं जोरात वाहतंय, म्हणजे जवळपास तो राष्ट्रीय खेळ म्हणून निवडला जाऊ शकतो इतका तो भारतात लोकप्रिय झाला आहे. क्रिकेट व्यतिरिक्त कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी वैगरे हे खेळ सुद्धा खेळले जातात मात्र ते सगळे दुय्यम म्हणून. यात असा खेळ आहे ज्यात भारत कायम टॉपला होता तो खेळ होता लॉन टेनिस. लॉन टेनिस म्हणल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर सानिया मिर्झा येते. पण पुरुषांमध्ये लिएंडर पेस हे नाव कायम आढळून येतं.

आज जरा लिएंडर पेस बद्दल जाणून घेऊया. लिएंडर पेस हे नाव कायम आपल्याला पेपर वाचताना आढळायचं पण नक्की पेसने खेळात असे काय विक्रम केले होते, तो कोण होता, त्याला मिळालेले अवॉर्ड याबद्दल आपण जाणून घेऊया.

पदमभूषण लिएंडर पेस. इंडियन एक्सप्रेस म्हणूनसुद्धा लिएंडर पेस ओळखला जातो. १७ जीन १९७३ मध्ये लिएंडर पेसचा जन्म झाला. खेळांबद्दल माहिती आणि खेळांचं महत्व हे पेसला अगदीच लहानपणी कळलं होतं कारण त्याचे वडील वेस पेस हे व्यवसायाने डॉक्टर तर होतेच पण ते एक उत्कृष्ठ खेळाडू होते. आई बास्केटबॉलमध्ये एक्सपर्ट खेळाडू होती. 

पेसचे वडील वेस पेस हे १९७२ मध्ये झालेल्या म्युनिख ऑलम्पिक स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या हॉकी संघाचे ते महत्वाचे खेळाडू होते. लिएंडर पेसचा सुरवातीला कल हा हॉकीकडेच होता. घरातूनच खेळाचे संस्कार पेसवर झाले होते. त्यामुळे वयाच्या ७ व्या वर्षापासूनच पेसने टेनिसचे धडे गिरवायला सुरवात केली होती.

१९९५ मध्ये पेसने मद्रास टेनिस अकॅडमी जॉईन केली आणि भविष्याच्या दिशेने तो टेनिस क्षेत्रात करियर करता येईल म्हणून खेळू लागला.

पेसला खरी प्रसिद्धी मिळाली ती १९९० सालामध्ये जेव्हा त्याने विम्बल्डन ज्युनिअर टेनिस स्पर्धा जिंकली आणि जगातील सर्वोत्तम ज्युनिअर टेनिस खेळाडू म्हणून विक्रम केला.

ज्यावेळी जगभरातले मोठे नामवंत खेळाडू डेवीस कप स्पर्धेला नाकं मुरडायचे तेव्हा लिएंडर पेसने त्या स्पर्धेत भाग घेतला होता. १९९१ पासून लिएंडर पेस व्यावसायिक रित्या खेळू लागला. १९९६ मध्ये त्याने अटलांटा ऑलम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय होता.

पुढे पुरुष डबल मध्ये महेश भूपतीसोबत आणि मिक्स डबल मध्ये मार्टिना हिंगीस बरोबर त्याची दीर्घकाळ जोडी जमली. या जोडीने टेनिसचे अनेक सामने भारताला जिंकून दिले.

या जोडीने २००३, २०१० आणि २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. फ्रेंच ओपन, यूएस ओपन अशा स्पर्धांमध्येही या जोडीने बाजी मारली. पेस आणि भूपती या जोडीने डेवीस कप स्पर्धेत सलग २४ सामने जिंकण्याचा रेकॉर्ड बनवला होता.

वैयक्तिक लिएंडर पेसने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिकून जागाच लक्ष वेधून घेतलं होतं. पेस हा एक डबल टेनिसमधला सगळ्यात आक्रमक आणि दमदार खेळाडू आहे. ग्रँड स्लॅम, फ्रेंच ओपन, ऑलम्पिक, वर्ल्ड टूर फायनल, वर्ल्ड सिरीज, डेविस कप अशा सगळ्या नामांकित स्पर्धांमध्ये विजयी राहून पेसने देशाची मान उंचावली होती. 

लिएंडर पेसने डेविस कप स्पर्धेत भारताच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. सगळ्यात जास्त म्हणजे ४३ वेळेस डेविस कप मॅचेस जिंकण्याचा मान मिळवला होता. भारत सरकारने त्यावेळी पदमभूषण पुरस्कार देऊन त्याला गौरवलं होतं.

एका पावसाळयात जेव्हा पेसच्या घरात पाणी शिरलं होतं तेव्हा त्याच्या वडिलांनी हॉकी स्पर्धेत मिळवलेलं मेडल वाहून गेलं होतं, त्याची भरपाई म्हणून पेसने मेडल आणि बक्षिसांचा महापूर घरात आणला होता.

४७ वय असूनही तो उत्कृष्ठ टेनिस खेळतो. २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टेनिस खेळातून संन्यास घेतला. भारताच्या टेनिसच्या इतिहासात लिएंडर पेस हे नाव कायम वरच्या रांगेत असतं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.