आता महाराष्ट्रातील शाळा डिजिटल होणार…एका क्लिक मध्ये तुमची हजेरी लागणार.

हजेरी म्हणलं कि आपल्याला शाळेतले दिवस आठवतात, वर्गात हजेरी देतांना येस्स सर, येस्स मॅडम असं आपण म्हणायचो पण आता आजकालची लेकरं आता एका क्लिकवर त्यांची हजेरी देणार आहेत.  वर्षानुवर्षे वर्गात हजेरी नोंदविण्यासाठी वापरण्यात येणारे हजेरीपत्रक कालबाह्य होणार हे मात्र नक्की. 

हो बरोबर वाचताय तुम्ही आता महाराष्ट्रातल्या शाळा डिजिटल होणार आहेत. एक क्लिकवर तुमची हजेरी पडणार आहे. यासाठी राज्य सरकारने महास्टुडंट ॲप’ सुरु केलं आहे. राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी आता ‘महास्टुडंट ॲप’वर डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. आता दिवाळीनंतर शाळांमध्ये या ॲपचा वापर शाळांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून शाळांना सूचना द्याव्या लागणार आहेत.  

या ॲपचा वापर सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

‘महास्टुडंट ॲप’ चा वापर करण्यासाठीची मान्यता देण्यात आली आहे हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून बुधवारीच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

टेक्नोलॉजी आणि गॅजटप्रेमी असणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन राज्यभरात ‘सरल प्रणाली’वर सर्व शाळांची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने डेव्हलप केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी डिजिटलच्या माध्यमाने नोंदवण्यासाठी गुण आहेत. त्यामुळे राज्याने विकसित केलेल्या ‘सरल प्रणाली’त शाळांच्या विद्यार्थी, शिक्षकांच्या माहितीच्या आधारे राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महास्टुडंट हे ॲप डेव्हलप केलेय.

महाराष्ट्रातील शाळा महास्टुडंट ॲपने डिजिटल होणार आहेत…

Google Play Store वर उपलब्ध असलेले मोबाइल अॅप्लिकेशन शाळांना विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटली रेकॉर्ड करण्यासाठी आणि जेवण्याची सुट्टीच्या योजनेशी संबंधित डेटा ठेवण्यासाठी उपयोगी आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “केंद्राने कामगिरी श्रेणी निर्देशांक प्रणाली आणली आहे. यामध्ये काही मुद्दे शाळांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन नोंदवता येतील. जर एखादा विद्यार्थी शाळेला दांडी मारत असेल, तर शिक्षक एका साध्या क्लिकवर अनुपस्थिती नोंदवू शकतात. त्यामुळे शिक्षकांना हजेरीचा तपशील वेगळा गोळा करण्याची गरज पडणार नाही. याशिवाय शिक्षकांच्याही उपस्थितीची नोंदही ॲपवर ठेवण्यात येणार आहे.

२०१९ मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रथम अंमलात आणलेली कामगिरी श्रेणी निर्देशांक प्रणाली, नावनोंदणी गुणोत्तर, प्रशासन आणि व्यवस्थापन, शिक्षण-शैक्षणिक परिणाम इ. यासारख्या विविध घटकांवर शालेय शिक्षणातील राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते.

महाराष्ट्र सरकारकडे आधीपासूनच एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सर्व शाळांची संपूर्ण माहिती, शिक्षकांची नियुक्ती आणि विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड असते. राज्य सरकारच्या ‘प्रगती शिक्षक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत’ डिजिटल शाळांचा अवलंब करण्यावर खूप भर देण्यात आला आहे. थोडक्यात डिजिटल क्रांती करण्यामध्ये आपण एक एक पाऊल पुढे टाकतोय हे मात्र नक्की…

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.