स्वकर्तृत्वावर निर्माण झालेली ही मराठ्यांची श्रीमंती….

साऱ्या भारतभर आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मराठ्यांनी 19 व्या शतकात अतिशय भव्य अशा वास्तूंची निर्मिती केली. त्यांचे भव्यपण एवढे भावणारे होते की त्यासमोर लाल किल्लासुद्धा फिका पडला. उत्तरेतील मराठा साम्राज्याचे बुरुज म्हणजे शिंदे, होळकर, गायकवाड, पवार घराणे.. याच मराठ्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महालांची निर्मिती केली.

19 व्या शतकातील वैयक्तिक वापरासाठी उभारलेली भारतातील सर्वात महागडी वास्तू “लक्ष्मी विलास पॅलेस”..

तब्बल 700 एकर मधे पसरलेली ही वास्तू 1890 मधे ‘सयाजीराव गायकवाड’ यांनी ब्रिटिश इंजिनियर ‘मेजर मॉंट’ मार्फत तयार करून घेतली. यासाठी सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा खडक आणण्यात आला. अतिशय श्रीमंत आणि अतिभव्य स्वरूपातील या महालात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.

या पॅलेसचा दरबार हॉल आतून नटला आहे तो ‘बेल्जियम’ काचांनी. फरशा आणल्या होत्या व्हेनिसवरून.

Vadodaras lavish Lakshmi Vilas Palace could be worth over Rs 24000 crores FB 1200x700 compressed

याच देशातून आलेले बारा कारागीर तब्बल 18 महिने काम करत होते. या दरबार हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात इटालियन शिल्पकार ‘फेलीची’ याने बनविलेले संगमरवरी पुतळे आहेत. राजघराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी हॉलच्या पहिल्या मजल्यावर गॅलऱ्या आहेत. महालाच्या बाहेरच्या बाजूने इटालियन पद्धतीचे कारंजे आहे. या दरबार हॉलला पाहून एका कवीने लिहून ठेवले आहे,

‘या काचांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे हा हॉल एकदम सुवर्णमहालासारखाच भासत आहे..’

राजवाड्यातील संपूर्ण फर्निचर फ्रान्समध्ये तयार करण्यात आले होते. या पॅलेसमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘फतेहसिंग संग्रहालय’.अनेक परिचित-अपरिचीत गोष्टींचा खजिना पर्यटकांना येथे पाहायला मिळतो.त्याचबरोबर,राजा रवि वर्मा यांच्या अनेक अद्भुत पेंटिंगचे एक सुंदर कलेक्शन येथील भिंतींवर आपल्याला पाहायला,अनुभवायला मिळते..!!

याच धर्तीकर आवर्जून उल्लेख करावा असा महाल म्हणजे ग्वाल्हेर येथील ‘जयविलास पॅलेस’.

महान शिंदे घराण्यात जन्म घेतलेल्या महाराज जयाजीराव शिंदे यांनी 1874 मधे ग्वाल्हेर येथे हा महाल बांधला. यासुद्धा महालाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील दरबार हॉल. इटली, इंग्लंड, न्यूयॉर्क, इजिप्त, जापान, चीन यांसारख्या देशातून आणलेल्या फर्नीचरने हा महाल नटला आहे.

दरबार हॉल च्या छतावर 2 बेल्जियम पद्धतीचे अतिसुंदर असे झुंबर लटकावले आहेत. अभ्यासकांच्या मते, जगात असणाऱ्या सर्वात महागड्या झुंबरांमध्ये या दोन भव्य झुंबरांचा समावेश होतो.

Jai Vilas02

यातील एकाचे वजन 3.5 टन एवढे भरेल, इतकी मोठी आहेत. यांची साफ सफाई करायला कमीत कमी एक महिना वेळ लागतो. निव्वळ ‘560 किलो’ सोनं वितळवून या दरबाराच्या भिंती सजल्या आहेत. जयविलास पॅलेसचा दरबार हॉल हा थेट रोमच्या ‘सेंट पीटर’ कॅथेड्रलची प्रतिकृती आहे. आजच्या काळाचा विचार केला, तर ‘1200 कोटी’ इतका खर्च या इमारतीच्या बांधकामाला आला. एकूण 400 खोल्यांचे बांधकाम या महालात करण्यात आले.

मराठ्यांचा अजून एक कलाविष्कार म्हणजे इंदोर येथे 27 एकरात उभारलेला ‘लालबाग पॅलेस’.

आधी या ठिकाणी गुलाबाची बाग होती, जी फुल उमळल्यावर संपूर्ण लाल दिसायची, म्हणून ‘लालबाग’. सन 1886 मध्ये तुकोजीराव होळकर द्वितीय यांच्या काळात या महालाचे काम सुरू झाले आणि तुकोजीराव होळकर (तृतीय) यांच्या काळात पूर्णत्वास गेले.

या महालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महालात कुठेही स्वयंपाकघर नव्हते. नदीच्या पलीकडे भलेमोठे स्वयंपाकासाठी बांधकाम करण्यात आले होते. जमिनीखालच्या भुयारातून हे जेवण महालाच्या तळघरात येई आणि लिफ्ट मधून जेवण डायनिंग हॉल मध्ये आणण्यात येत असे. आजही ती लिफ्ट आपण पाहू शकतो.

merchant 153620 5e3d369ce2dac

वेगवेगळ्या बेडरूम, ड्रेसिंग रूम, परदेशी पाहुण्यांसाठी खास केलेली व्यवस्था, डान्स फ्लोअर, ग्रंथालय अशा नानाविध गोष्टींनी हा महाल विशेष उठून दिसतो. बेल्जियम ग्लासने संपूर्ण महाल सजवला आहे. अतिशय भव्य अशा महालाची निर्मिती केली महान पराक्रमी होळकर घराण्याने.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Dipak says

    पवार घराणे चा उल्लेख नाही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.