मार्मिक कसं सुरु झालं याचा किस्सा खुद्द श्रीकांत ठाकरे सांगतात की….

१९ जून १९६६ साली सुरु शिवसेना नावाचं वादळ सुरु झालं आणि पुढील अनेक दशकं हे वादळं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते आणि या वादळात सर्वात महत्वाची भूमिका निभावली ती मार्मिक ने !! 

मार्मिक चा आज वर्धापन दिन. 

मुळात मार्मिक साप्ताहिक बाळासाहेब आणि त्यांचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मिळून १९६० साली सुरु केलं. 

मार्मिक कसं सुरु झालं, त्यामागचा किस्सा श्रीकांत ठाकरे यांच्या भाषेतून वाचूया….

बाळासाहेब त्याकाळी फ्री प्रेस मध्ये नोकरीला होते, तिथे त्यांची व्यंगचित्रकाराची पोस्ट होती

बाळासाहेबांच्या परखड व्यंगचित्रांमुळे संपादक आणि बाळासाहेब यांच्यामध्ये खटके उडायचे. शेवटी त्यांनी फ्री प्रेस सोडलं आणि ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’त गेले. त्या दरम्यान श्रीकांत ठाकरे ऑल इंडिया रेडिओ मुंबईवर वादनकार म्हणून काम करीत होते. 

त्याचवेळी एका जपानी दैनिकात महिन्याला सात आठ व्यंगचित्रं काढून देण्याची विनंतीवर बाळासाहेब त्यांना व्यंगचित्र देत असत. त्यात बाळासाहेब यांनी ‘इंडिया रिप्रेझेंट थेंकरे’ असा उल्लेख करून चर्चिल यांची काढलेली तीन व्यंगचित्रं छापली गेली आणि व्यंगचित्रकार बाळ ठाकरे जगविख्यात झाले !

इतक्यात दुसरीकडे पुढे फ्री प्रेसमधल्या पत्रकारांनी मिळून नवीन इंग्लिश पेपर सुरू केला ‘न्यूज डे’ नावाचा. पेपरचं ऑफीस भवानी शंकर रोड, दादर येथे होतं. दररोज रात्री आम्ही तेथे सर्व पहायला जायचो. कारण जाणं अगत्याचं होतं. आम्ही सोडले तर इतर पत्रकार साऊथ इंडियन होते.

न्यूज डे च्या सुरुवातीला पत्रकारांना काही मिळायचं नाही. ते मिळणार नव्हते, म्हणून क्राईम रिपोर्टर अय्यरला विचारलं की, ‘व्हॉट अबाऊट यू अय्यर ?’ अय्यर म्हणाला, ‘आय अॅम बॉरोइंग मनी फ्रॉम माय फ्रेंडस्, नाऊ आय विल बॉरो मोअर’ असा होता.

‘न्यूज डे’ मधून आमचे बंधू काही महिन्यांनंतर बाहेर पडल्यावर काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला.

पण प्रबोधनकारांनी एक मंत्र दिला होता की माणसाने कधीही हताश होऊन जाऊ नये. नव्या क्लृप्त्या काढाव्यात त्याप्रमाणे बंधुनी एक डमी तयार केली. शंकर्स वीकली होतं पण आपण दुसरं चांगलं काढलं तर त्याचं नाव होतं ‘कार्टुनिस्ट’. मोठ्या बंधुंनी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा दादा म्हणाले, ‘इंग्लिश मध्ये नको. कारण मजकुरासाठी साऊथ इंडियन लोकांच्या पाया पडावं लागेल. तुला अनुभव आलाच आहे. तेव्हा मराठीत काढा !’ बंधुंना हा विचार एकदम पसंत पडला. झालं.

आमचं नावासाठी डोकं सुरू झालं. तिरंदाज’, ‘ठेवावं की ‘अंजन’ ? भाऊ दादांकडे गेला.  दादा स्वस्थ खुर्चीवर बसले होते, म्हणाले, ‘मार्मिक’ मी बाहेर गेलो होतो. आल्यावर त्याने मला सांगितलं.

दादांच्या तोंडातून ब्रह्मवाक्यच यायचं नेहमी ! काय नाव ‘मार्मिक’, मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक.

‘मार्मिक’ हे प्रथम आम्ही ‘न्यूज ग्लेझ’ या गुळगुळीत न्यूज प्रिंटवर छापायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी जाऊन पाच हजार रुपयांचा तो पेपर घेऊन बँकेच्या हवाली केला जिवादिवशी बिल्डिंगमधील ऑफिसात. 

तोच मी लागेल तसा ५०, ५० रिमे घेऊन खटाऱ्यात टाकायचो नि त्या खटाऱ्याबरोबर चालत चालत येऊन प्रिंटिंग प्रेसमध्ये टाकायचो. काही वेळा रात्री प्रिंटर्सबरोबर जाऊन मशिनच्या शेजारी उभं राहून नीट प्रिंटिंग कव्हर होतंय की नाही ते बघायचो. 

सकाळी सातच्या शिफ्टचे कामगार येऊन सांगायचे की, ‘अहो साहेब जा!’ तेव्हा मी घरी यायचो. ‘मार्मिक’च्या एजंट लोकांच्या ताळेबंदीचा जमाखर्च स्वतः जातीने पहायचो. 

आम्ही घरातले दोन बंधू नि वहिनीदेखील पॅकिंग करायला बसायच्या. मग ते सारं रात्री केलेल्या बाहेरच्या मुलांनी सकाळी पोस्टात नि रेल्वेवर पाठवायचं. 

आम्ही दर आठवड्याला राजकीय व्यंगचित्र काढायचोच, पण सुरुवातीच्या काळात सोशल व्यंगचित्रांचा भडीमार वेळ मिळेल तसा करून ठेवायचो. नंतर इतर व्यंगचित्रकारांना प्रोत्साहनाखातर मुभा देऊ लागलो. 

एक दिवस काय झालं की काही लोकांकडून ‘मार्मिक’कडे काही तक्रारी आल्या नि मराठी लोकांवर नोकरभरतीमध्ये अन्याय होतोय अशी नावानिशी तक्रार आली.  यातील एक तक्रार प्रसिद्ध केल्यावर तक्रारींचा गठ्ठाच्या गठ्ठा आला. 

ती मराठी मनं बोलत होती. यंडूगुंडूंना त्यांचीच माणसं मुंबईत आणतात नि मराठी माणूस कितीही योग्य नि कर्तबगार असला तरी त्याला डावलून त्यांच्या माणसांचा भरणा चालू झालाय. 

या प्रवृत्तीला हाणण्यासाठी नि मराठी माणसातला आत्मविश्वास जागा करण्यासाठी ‘मार्मिक मधून एक उभा कॉलम दिला जायचा ‘वाचा नि थंड बसा ।’ 

मराठी मंडळीतला आत्मविश्वास जागा झाला नि बंधुंनी त्याला चांगलीच जागृती दिली. मुंबईभर रोज शेकडो व्याख्यानाच्या फैरी झडत होत्या. एका नव्या विचाराची दिशा मिळाल्यावर अन्यायाबरोबर लढण्याची एक उर्मी मिळाली होती. जसजशा सभा होत गेल्या तसातसा विचार प्रत्येक हृदयात ठाण मारून बसला.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.