अटापट्टूला कसोटीत दुसरी धाव काढायला तब्बल ७ वर्षे लागली होती…

क्रिकेटमध्ये जर एकदा का तुम्ही संघाच्या बाहेर फेकले गेले तर तुम्ही परत इन टीम होण्याच्या शक्यता फार कमी असतात. जर तुमचं खराब प्रदर्शन चालूच असेल तर सिलेक्शन कमिटी तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणारच पण एक खेळाडू असा होता ज्याने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून संघात पुनरागमन केलं. सुरवातीचा अपयशाचा काळ विसरत त्याने जे केलं ते जगाला आश्चर्याचा धक्का देणारं होतं.

तर DONT GIVE UP ला खऱ्या अर्थाने कोणाचं आयुष्य सूट होत असेल तर ते म्हणजे मार्वन अटापट्टू या खेळाडूचं.

एकदा का ग्राऊंडमध्ये मार्वन अटापट्टू बॅटिंगला कि तो बॉलर्सला फोडून काढत असे, त्याच्यासारखी बॅटिंग अभावानेच पाहायला मिळायची. श्रीलंकेचा महत्वाचा बॅट्समन म्हणून मार्वन अटापट्टू ओळखला जायचा. चौकार षट्काराच्या नादी न लागता सिंगल डबल रन काढून धावफलक हलता ठेवण्यावर मार्वन अटापट्टूचा भर असायचा.

पण रेकॉर्डच्या मागे एक काहीतरी सनसनाटी गोष्ट असते ती मार्वन अटापट्टूच्या आयुष्यात होती. स्थानिक क्रिकेटमध्ये तुफानी बॅटिंग करून मार्वन अटापट्टू श्रीलंकन संघात सामिल झाला होता. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याच प्रदर्शन जबऱ्या होतं त्यामुळे लवकरच तो श्रीलंकन निवड समितीच्या डोळ्यात बसला होता. मोठ्या अपेक्षेने त्याला संघात घेण्यात आलेलं होतं.

आपल्या पहिल्या टेस्ट इनिंगमध्ये मार्वन अटापट्टू झिरोवर आउट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तो झिरोवर आउट झाला. हे श्रीलंकन निवड समितीसाठी इतकं निराशाजनक होतं कि त्यांनी त्या टेस्टनंतर मार्वन अटापट्टूला वगळलं.

हे प्रकरण मार्वन अटापट्टूच्या डोक्यात गेलं. दिवसरात्र त्याने नेटमध्ये प्रॅक्टिस सुरु केली. क्रिकेट हा आपला श्वास आहे असं समजून तो प्रॅक्टिस करायचा.

फर्स्ट क्लास क्रिकेट तो खेळायचाच शिवाय संघात परतण्यासाठी तो जास्त मेहनत घेऊ लागला होता. २१ महिने म्हणजे जवळपास तब्बल पावणे दोन वर्षानंतर मार्वन अटापट्टू संघात परतला. पण एखादा शाप लागल्यासारखा मार्वन अटापट्टूइथं परत अपयशी ठरला. पहिल्याच इनिंगला तो झिरोवर आऊट झाला, आणि दुसऱ्या इनींगला त्याने एक रन केला.

पुन्हा एकदा मार्वन अटापट्टू संघातून बाहेर आणि नेट्समध्ये पुन्हा प्रॅक्टिस सुरु. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो भरपूर रन करायचा खरा पण टीममध्ये आल्यावर त्याला झिरोचा शाप लागला होता. आता पुन्हा तो संघात आला तेही सगळं नियोजन करून पण परत एकदा दोन्ही इनिंगमध्ये तो झिरोवर आउट झाला. अशा घटना वारंवार घडू लागल्याने मार्वन अटापट्टूचं करिअर संपल्यात जमा झालं होतं. लोकं म्हणायचे कि

मार्वन अटापट्टू हा चांगला खेळाडू आहे पण तो स्टार खेळाडू बनू शकत नाही.

पण मार्वन अटापट्टूला माहिती होतं कि हा आपला वाईट काळ आहे. पुन्हा नेट प्रॅक्टिस करून तो आपल्या खेळावर काम करू लागला. तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मार्वन अटापट्टूसंघात आला.

९७सालच्या न्यूझीलंड सिरीजमध्ये त्याने २५ धाव केल्या आणि सात वर्षांनी आपला कसोटी रेकॉर्ड १ रन च्या पुढे नेला.  यानंतर त्याने जो काय खेळ केला कि सगळे पाहतच राहिले.  टेस्टमध्ये ५ हजार धावा, वनडेमध्ये ८ हजाराहून जास्त रन, ६ वेळा टेस्ट मध्ये डबल सेंच्युरी.

अशा दमदार खेळाच्या जोरावर मार्वन अटापट्टू श्रीलंकेचा कॅप्टन सुद्धा झाला. जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा श्रीलंकेचा कोच झाला. ६ वर्ष लागले मार्वन अटापट्टूला करिअरचा दुसरा रन बनवण्यासाठी. पण जितक्या वेळा तो संघाच्या आतबाहेर होत राहिला आणि नंतर त्याने जो पराक्रम केला तो कोणालाही जमला नाही. DONT GIVE UP चं ज्वलंत उदाहरण म्हणजे मार्वन अटापट्टू…!

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.