गेली अनेक वर्ष या गूढ बेटावर प्रत्येकजण हा भुताटकीचा मास्क घातलेला आढळतो.

२०२० या वर्षात कोरोनाचा कोव्हीड १९ हा व्हायरस आला आणि आपलं आयुष्य बदलून गेलं. हॅण्ड सॅनिटायझर या गोष्टीची नव्याने ओळख झाली. सोशल डिस्टंसिंग लॉकडाऊन हे सहज वापरायचे शब्द झाले.

गेले तीन-चार महिने मास्क दैनंदिन ड्रेसकोड एक भाग बनला आहे.

घरातून बाहेर पडायचं झालं तर खिशात वॉलेट नसलं तरी चालेल पण नाकावर मास्क हवाच हा नियम बनला.

आधी N-95, सर्जिकल मास्क एवढेच प्रकार होते. आता वेगवेगळ्या फॅशनचे मास्क बाजारात आले आहेत. वर-वधू लग्नात एकमेकाला डिझायनर मास्क घालत आहेत असा नवा रिवाज आपल्याला बघायला मिळतोय.

आपल्या काहीजणांना ही बळजबरी वाटते. कोणी यातून पळवाट शोधायला बघतोय.

पण एक ठिकाण अस आहे जिथे जगण्यासाठी 24 तास कायम मास्क वापरावं लागतं.

जपानच मियाकेजिमा आयलंड

जपानमध्ये ईझु नावाचाछोट्या मोठ्या बेटांचा समूह आहे. या बेटांपैकी फक्त सात बेटांवर मानवी वस्ती आहे, त्यापैकीच एक आहे मियाकेजिमा आयलंड.

हे बेट टोकियो पासून साधारण १८० किलोमीटर दूर आहे. याचं क्षेत्रफळ अंदाजे 55 किलोमीटर असेल. मियावाकेजिमाची लोकसंख्या आहे २८८४.

या बेटाच वैशिष्ट्य म्हणजे इथे माउंट ओयामा नावाचा एक जिवंत ज्वालामुखी आहे.

गेल्या ५०० वर्षात १३ वेळा ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. १९४० साली झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता. असेच विस्फोट १९६२ आणि १९८३ साली झाले होते.

शेवटचा ज्वालामुखीचा मोठा विस्फोट २००० साली झाला. सलग झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर १४ जुलै २००० रोजी ओयामाचा ज्वालामुखी आग ओकू लागला. कित्येक दिवस हे सुरू होतं.

या ज्वालामुखीमधून लावासोबतच सल्फर डाय ऑक्सआईडसुद्धा बाहेर पडत होता.

अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या या वायूच्या संपर्कात आल्यास प्राण सुद्धा गमवावे लागतात.

ज्वामुखीजवळ मल्टीकंपोनंट गॅस अनालायझर सिस्टीम बसवली असल्यामुळे वेळीच संकटाचा इशारा मिळाला. आणि त्यामुळे जापनीज सरकारने बेट रिकामे केले.

जवळपास चार वर्षे हे बेट निर्मनुष्य होते.

अखेर धोका टळला आहे हे जाणवल्यावर १ फेब्रुवारी २००५ रोजी नागरिकांना बेटावर परत येण्याची परवानगी देण्यात आली. फक्त प्रत्येकाला गॅस मास्क घालणे कंपल्सरी करण्यात आले.

कित्येकजण परतले नाहीत. त्यामुळे अनेक इमारती आजही निर्मनुष्य आहेत. गेल्या काही वर्षात मास्क वापरण्याची सक्ती कमी केली आहे पण तरी जे लोक राहतात ते कायम तो अगदी चेहरा झाकणारा गॅस मास्क वापरतात.

अनेकदा इंटरनेटवर मियाकेजीमा येथील लग्न म्हणून नवरी नवऱ्यापासून सगळे वऱ्हाड गॅस मास्क मध्ये उभे असलेला फोटो पाहायला मिळतो. तो फोटो खरा नसला तरी बघूनच अंगावर काटा येतो.

images

भुताटकी प्रमाणे दिसणाऱ्या गॅस मास्कचा शोध साधारण एकोणिसाव्या शतकात लागला. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात केमिकल अस्त्रांचा सामना करण्यासाठी हे मास्क वापरले जायचे. तेव्हा पासून या गॅस मास्कसोबत अनेकांच्या काळ्या आठवणी जोडलेल्या आहेत.

पण जपान सरकारने या बेटाचही टुरिस्ट पॉईंट मध्ये रूपांतर केलं आहे.

गॅस मास्क टुरिझम म्हणून परदेशी लोक विमानाने या बेटावर जातात. तिथल्या पडलेल्या गूढ इमारती, मास्क घालून काम करत असलेले भुतासारखे जपानी लोक, मागे धगधगता ज्वालामुखी हे सगळं अगदी हॉरर मुव्ही सारखं आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Somnath says

    मला आश्चर्य वाटतं ह्या जपानी बांधवांचं ,… एवढं सगळं त्या बेटावर घडत असून सुद्धा काही जापानी गॅस मास्क वापरुन त्या बेटावर आजही वास्तव्य करीत आहेत. खरंच राष्ट्रभक्ती तसंच मातीवरती असणारं प्रेम फक्त जापानी लोकांमध्येच प्रभावी पणे दिसून येतं

Leave A Reply

Your email address will not be published.