कोण होता अब्बास, ज्याला मोदींजींच्या आईने आपल्या मुलासारखं संभाळलं होतं.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची भेट घेतली. त्यांचे पाय धुतले. आज हिराबेन यांचा शंभरांवा वाढदिवस असल्याने मोदींनी आपल्या आईची भेट घेतली. १०० व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी आपल्या आई हिराबेन यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहून आठवणी देखील लिहल्या आहेत. 

यात ते लहानपणापासूनचे अनेक किस्से सांगतात.

मोदीजी सांगतात माझ्या आईला तिच्या आईचं म्हणजेच माझ्या आज्जीचं प्रेम मिळालं नाही. तिचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या वीसनगर येथे झाला. माझ्या आज्जीचं निधन त्या काळी आलेल्या महामारीच्या साथीमुळे झालं. 

आई तेव्हा काही दिवसांचं तान्ह बाळ होती. आईची आठवण अशी काहीही तिच्याजवळ नाही. आईला अक्षर ओळख देखील नाही. ती कधी शाळेत गेली नाही. वडनगरच्या ज्या घरात आम्ही रहात होतो तिथे घरात कोणतं बाथरुम नव्हतं की शौचालय नव्हतं. साधं मातीचं घर होतं.  

आईबाबत लहानपणीच्या आठवणी सांगत असताना मोदींना आपल्या ब्लॉगमध्ये अब्बासचा उल्लेख केला आहे.. 

नरेंद्र मोदी सांगतात. आमची रहाण्याची जागा भलेही खूप लहान असेल पण आईचं ह्रदय खूप मोठ्ठ होतं. आमच्या घरापासून थोड्याचं अंतरावर एक गाव होतं. तिथे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र रहायचे. त्यांच्या मुलाचं नाव होतं अब्बास.  वडिलांच्या त्या मित्राचं निधन झाल्यानंतर वडिलांनी अब्बासला आमच्या घरी आणलं. माझ्या आईने अब्बासला देखील आमच्यासारखचं वाढवलं. आम्हा सर्व भावंडाप्रमाणेच आमच्या घरी अब्बास असायचा. आई त्याची देखभाल करायची. ईदच्या दिवशी त्याच्या आवडीचे जेवण करायची. 

पुढे आईसंबंधित आठवण लिहतात मोदीजी लिहतात की,

एकदा माझ्या भावाने आईला घेवून केदारनाथला जाण्याचा निश्चिय केला. तेव्हा माझे केदारनाथ मधील काही सहकारी आपण नरेंद्र मोदींची आई आहात का अशी विचारणा करत प्रत्येक महिलेला करत माझ्या आईपर्यन्त पोहचले. त्यांनी माझ्या आईची सेवा केली. त्यानंतर आई मला म्हणाली, तू चांगला काम करायला लागला आहेस. लोक तुला ओळखतात.. 

अशा असंख्य आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या आहेत. पण चर्चा होत आहे ती अब्बास ची. कारण नुपूर शर्मांच मुस्लीमद्वेषी वक्तव्य, त्यानंतर झालेले हिंसाचार या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी काढलेली आपल्या लहानपणीच्या सहकारी अब्बासची आठवण पुरेसी बोलकी ठरणारी आहे.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.