‘अंगुठाछाप मोदी’ या ट्वीटमुळे डी.के शिवकुमार यांना माफी मागावी लागलीय.

सत्ताधारी आणि विरोधक याचं वक्तव्य, टीका, आरोप -प्रत्यारोपांच राजकारण आपण कायमच पाहत आलोत. सद्याच्या राजकीय क्षेत्रात पहायचं तर राजकारणातला सुसंस्कृतपणा हरवला असल्याचं चित्र दिसून येत आहे.

आता त्यात रोजच कोणता न कोणता राजकारणी कुणावर काहीतरी खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असते. मग अशावेळेस या नेत्यांना न पदाचं भान असते न ज्यांच्यावर टीका करतोय त्यांच्या वयाचं.

आत्ताचं सांगायचं झालं तर, कर्नाटक काँग्रेसच्या ट्वीटरवरून एक ट्वीट केलं गेलं आणि सगळीकडेच खळबळ माजलीये.

हे ट्वीट होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत. सद्या कर्नाटकात दोन पोटनिवडणुकांमुळे प्रचार चालू आहे. आता प्रचार म्हणलं कि, एकमेकांवर टीका-टिप्पणी चालतच असते. मात्र काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे मोठाच वाद निर्माण झाला आहे.

काय होतं त्या ट्वीट मध्ये?

“काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोकं आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला हे भोगावं लागत आहे,” असं या ट्वीटमध्ये बोललं होतं.

काँग्रेसने केलेले हे ट्वीट हे केवळ एक टीका नसून मोदींवर केलेला ‘पर्सनल अटॅक’ असल्याचं अनेकांनी म्हटलं.  यामुळे सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आता शाब्दिक लढाई चालू झाली आहे आणि या वादाला शांत करण्यासाठी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी पुढाकार घेत माफी मागतिली आहे.

त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याप्रकरणी खेद व्यक्त करत माफी मागितली आणि सोशल मीडिया टीमला हे ट्वीट डिलीट करण्यास सांगितलं.

याच ट्वीटमुळे सध्या कर्नाटक काँग्रेसमध्ये देखील घमासान चालू आहे. काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरून हे ट्वीट केल्यामुळे हा मुद्दा गांभीर्याने घेतला जातोय. आणि कॉंग्रेसला आता टीकेला सामोरे जावे लागत आहे. पण काँग्रेसने ते ट्वीट डिलीट केली असून हे ट्वीट कुणी केले त्या सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

 

डी.के शिवकुमार यांनी ट्वीट करत म्हटलंय की, राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे”. तसंच सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन केलेलं असंसदीय ट्वीट खेदजनक असून लवकरच काढून टाकण्यात येतंय असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.