कोणतीही चूक नसताना जेव्हा १६ वर्षाच्या मुलीला फरफटत नेत इराणच्या त्या जेलमध्ये कैद केलं होतं

गेल्या दोन दिवसांपासून इराणमधला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ तिथल्या सर्वात खतरनाक इविन जेलमधला असल्याचं म्हटलं जातयं. जगभरातलं प्रत्येक मिडिया हाऊस आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ दाखवला जातोय.

तर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणं इविन जेलमधला एक वृद्ध कैदी जेल परिसरात फिरत असताना खाली कोसळतो. त्यानंतर तिथले दोन गार्ड त्याला फरपटत नेतात. ते दोन्ही गार्ड्स त्या कैद्याला तसचं फरपटत आत जेलच्या आतल्या एका सेक्शनमध्ये नेतात आणि जबर मारहाण करतात. त्यानंतर तिथेच असलेले आणखी गार्ड्स सुद्धा त्या कैद्याला मारहाण करतात.

इविन जेल मधला हा व्हिडिओ फुटेज काही हॅकर्सनं लीक केलाय. जस्टीस फॉर अली असं या हॅकर्सच्या ग्रुपचं नाव असल्याचं समजतंय.

या हॅकर्सच्या ग्रूपने गेल्या वर्षीचं एविन जेलचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले होते. ज्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ एका मिडिया हाऊसला दिले. तिथून हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.

हॅकर्सचं म्हणनं आहे की, हा एवढा एकचं व्हिडिओ नाही, असे कित्येक फूटेज आहेत, जे या जेलच्या आतला क्रूर कारभार उघड करतील.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या जेलवर आणि तिथल्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. या इविन जेलचे प्रमुख मोहम्मद मेहदी हज-मोहम्मदी यांनी हे फूटेज आपल्याचं जेलचे असून ते खरे असल्याचं मान्य केलयं.

दरम्यान, इराणच्या या इपिक जेलशी संबंधित कित्येक घटना चर्चीत आहेत. इराणच्या तेहरानमध्ये असणारा हा जेल जगातल्या सर्वात खतरनाक जेलपैकी एक आहे. १९७० साली मोहम्मद रेझवा पहलवी याच्या शासनकाळात बनवलेल्या या जेलला ‘ टॉर्चर फॅक्ट्री’ असही म्हंटल जात. इथं कैद्यांना वाईट पद्धतीने टॉर्चर करण्याचा, महिला कैद्यांवर अत्याचाराच्या घटना सामान्य आहेत.

इविन जेलमध्ये एखाद्याला वेड लागेल, इवढं टॉर्चर केलं जातं. कैद्यांना दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागतं.

या जेल संदर्भात असही म्हटलं जात की, इथं जो कोणी जाईल त्याचं बाहेर पडणं अवघड असतं.

अशीच एक घटना लेखिका मरिना नेमत यांच्यासोबत घडली. आपली काहीही चूक नसताना त्यांना तुरुंगात दोन वर्षे राहावं लागलं, पण या दोन वर्षात तुमच्यासोबत इतकं काही घडलं की कि, तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

ते १९८२ चं साल होत. मरीना १७ वर्षाची होती. त्यावेळी नवीन इस्लामिक क्रांतिकारी सरकार स्थापन झालं होत, या सरकारच्या आक्रमक धोरणांना विरोध म्हणून मरिना नेमत एक विद्यार्थी म्हणून निदर्शनांना उपस्थित राहिली आणि विद्यार्थी वृत्तपत्रात क्रांतीविरोधी लेख लिहिले.

मरीना प्रशासनाच्या डोळ्यावर होती. एक दिवस रात्री ९ वाजता रेवोल्यूशनरी गार्डचे दोन सैनिक मरीनाच्या घरात घेतले आणि तिला फरपटत कारमध्ये बसवलं. मरीनाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली आणि कार सुरु झाली.

कार थेट जेलमध्ये जाऊन पोहोचली. तिथेही तिला मारहाण करत एका मुलीबद्दल विचारलं गेलं. मरीना त्या मुलीचे नाव पहिल्यांदा ऐकत होती, तिला नेमकं काय घडलयं याबद्दल काहीचं माहित नव्हते. नंतर दोघांनी तिला हातकडी बांधली आणि अंथरूनावर उलटं झोपवले गेलं. यानंतर तिच्या तळव्यावर चाबकाचे फटके मारले. तिला टॉर्चर तर केलचं पण तिच्यावर रेपही करण्यात आला.

१९८२ ते १९८४ पर्यंत ती तुरूंगात कैद होती. या दोन वर्षात तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले गेले. गोष्टी इतक्या भयानक पातळीवर गेल्या होत्या की, तिला जेलमधल्या गार्डसोबत लग्न करण्यासाठी भाग पाडले गेले.

आपल्या या मुलाखतीत मरिना सांगते की, इराणच्या कारागृहात परदेशी लोकांना इराणी लोकांपेक्षा खूप चांगली वागणूक दिली जाते. जरी त्यांना चौकशी आणि मानसिक छळाद्वारे टॉर्चर केले जात असले, तरी त्यांच्यावर क्वचितच शारीरिक अत्याचार केले जातात.

मरीना जेव्हा इविन तुरुंगात होती, तेव्हा ९० टक्केपेक्षा जात कैदी हे १८ वर्षाखालचे होते. तिला फायरिंग स्क्वॉडसमोर ठेवून बलात्कार केला जायचा. मी माझ्या मित्रांना टॉर्चर करताना पाहिले, त्यातल्या अनेकांना फाशी देण्यात आली.

यांनतर मरीना १९९१ मध्ये कॅनडाला गेली. तेव्हापासून ती इराणच्या या जेलमधल्या क्रूनतेविरूद्ध जगभरात प्रदर्शन करतेय. आपल्या आयुष्यातल्या या वाईट आठवणींबद्दल तिने अनेक पुस्तक लिहिलीत. त्यातल्या ‘Prisoner of Tehran’ हे पुस्तक एका रात्रीतून इतके फेमस झाले कि, त्याचे २५ पेक्षा जास्त भाषांत अनुवादन करण्यात आलेय. 

यासोबतच मरीना नेमतने  After Tehran: A Life Reclaimed हे पुस्तक पब्लिश केलं, ज्यात तिच्या कुटुंबासह कॅनडामध्ये स्थायिक होण्याचे आणि इविनमधील त्या दोन भयानक वर्षांच्या परिणामी तिला भोगाव्या लागलेल्या आयुष्यभराच्या आघातांचे वर्णन आहे.

हे ही वाचं भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.