आताच नाही तर मुख्यमंत्र्यांचे पप्पा अनेकदा आपल्या जातीयवादी कमेंटमुळे गोत्यात सापडलेत…

नेतेमंडळी म्हंटल कि, बायनबाजी तर होणारचं. तस पाहायचं झालं तर आपल्या विरोधी पक्षावर त्यांच्या नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप करणं हे आजकालच्या नेतेमंडळींच्या कामकाजाचा एक भागाचं बनत चाललंय. पण आपली ही वक्तव्य करताना कधी- कधी नेतेमंडळींनी जीभ इतकी घसरते कि, ते अडचणीत तर सापडतातचं, सोबत पक्षासाठी आणि आपल्या जवळच्यांसाठी सुद्धा मोठी अडचण करून ठेवतात.

आता असंच काही घडलंय छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल त्यांच्यासोबत. आधीच त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाही, तोवर त्यांच्या वडिलांनी वादग्रस्त विधान करून स्वतःहून वाद  ओढहून घेतलायं.

तर झालं असं कि, ३० ऑगस्टला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल लखनऊमध्ये होते. खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नंदकुमार बघेल तिथं आले होते. त्यावेळी शिक्षक भरतीमध्ये चुकीची आरक्षण प्रक्रिया स्वीकारल्याबद्दल धरणे आंदोलन करणाऱ्या तरुणांना त्यांनी गाठले आणि त्यांचे समर्थन केले. या धरणे आंदोलनादम्यान नंदकुमार बघेल यांनी आक्षेपार्ह विधान केले.

नंदकुमार बघेल म्हणाले कि,

“आमचे ध्येय हे आहे की, ज्याचं वोट त्याचं राज्य, त्यामुळे वोट आमचं आणि राज्य तुमचं असं चालणारं नाही. आम्ही हे आंदोलन करू आणि ब्राह्मणांना गंगेतून वोल्गाला पाठवू, ते परदेशी आहेत, विदेशी आहेत , ज्या पद्धतीनं इंग्रज लोकं आली आणि निघून गेली, तसंच ब्राम्हणांनी एकतर सुधारावं नाही तर गंगेतून वोल्गाला जायला तयार व्हावं.”

नंदकुमार पुढे म्हणाले की, ‘ब्राह्मणांबद्दल चीड आहे कारण ब्राह्मण परदेशी आहेत आणि आम्हाला अस्पृश्य मानतात, ते आमचे सर्व अधिकार हिरावून घेत आहेत आणि म्हणून त्यांच्याशी लढणे आवश्यक आहे.   ब्राह्मणांना बॉयकॉट करण्यासाठी आम्ही गावागावात अभियान चालवू. सरपंचांना सांगू कि, ब्राह्मणवादाला विरोध करा. “

आता एखाद्या समाजाबद्दल असं वक्तव्य करणार तर वातावरण पेटणारचं. तर नंदकुमार बघेल यांच्या या विधानावर सर्व ब्राह्मण समाजाच्या लोकांनी रायपूरमध्ये निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यांचा पुतळा जाळण्यात आलायं, सोबतच रायपूरच्या डीडी नगर पोलीस ठाण्यात सर्व ब्राह्मण समाजाच्या तक्रारीवरून नंदकुमार बघेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीये.

नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध रायपूरमध्ये आयपीसीच्या कलम ५०५ आणि १५३ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

रायपूर सोबतच लखनऊमध्येही सर्व हिंदूवादी संघटनांचे लोक आणि ब्राह्मणवादी नेते नंदकुमार बघेल यांच्या या विधानावर नाराज आहेत. असंही म्हंटल जातंय की, रायपूरनंतर नंदकुमार बघेल यांच्या या विधानावर लखनऊमध्ये एफआयआर नोंदवला जाऊ शकतो. ब्राह्मण समाजाकडून नंदकुमार बघेल यांना अटक करण्याची मागणी होतेय.

दरम्यान, नंदकुमार बघेल यांची ही काय पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी  बऱ्याचदा ब्राम्हण समाजाविरुद्ध वक्तव्य केलीत. ज्यामुळे ते स्वतः तर अडचणीत सापडलेतचं सोबतच आपला मुलगा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचीही डोकेदुखी वाढवलीये.

राहुल गांधींची जात

तर याआधी नंदकुमार बघेल यांनी राहुल गांधींच्या जातीबद्दल मोठं विधान केलं होतं. जेव्हा अंबिकापूर येथील सर्किट हाऊसमधील पत्रकारांनी त्याला विचारले की, तुम्ही एकीकडे ब्राह्मणांचा विरोध करता आणि दुसरीकडे राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याविषयी बोलता, पण राहुल गांधी निवडणुकीच्या वेळी स्वतःला जनेउधारी ब्राह्मण म्हणवतात.

याला विरोध करत नंदकुमार म्हणाले की, ते चुकीचे बोलतायेत. त्यांची आई इटालियन आहे आणि वडील पारसी, मग ते ब्राह्मण कुठून झाले ? ते म्हणाले की, राहुल गांधी हे सकल सतनामी आहेत.

यासोबत त्यांनी भाजपवर सुद्धा हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते की,

या देशात ब्राह्मणवाद चालणार नाही. आमचे ब्राह्मणांशी वैर नाही, पण जे आयात अधिकारी आहेत त्यांना आमचा विरोध आहे. रावणाने म्हटलेयं ब्राह्मण तोंडातून जन्माला आलेत आणि शूद्र आणि मागास पायांपासून. ही संकल्पना आरएसएस आणि भाजपने तयार केली आहे.

एवढंच नाही तर, ब्राह्मण समाजाबद्दल त्यांच्या मनात असलेली निराशा त्यांनी एक पुस्तकात मांडली होती. त्यावेळी भूपेश बघेल अजित जोगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. या दरम्यान, नंदकुमार बघेल यांनी ‘ब्राहमण कुमार रावण को मत मारो’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते.

बघेल यांच्या मते, हे पुस्तक मनुस्मृती आणि वाल्मिकी, तुलसीदास, पेरियार इत्यादींच्या रामायणावर आधारित पुस्तकांचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. पण पुस्तकाच्या प्रकाशना सोबतचं वाद सुरू झाला. पुस्तकामुळे एका विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची आणि त्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये द्वेष आणि संघर्ष भडकण्याची शक्यता होती.

हे पाहता अजित जोगींना या पुस्तकावर बंदी घातली. यावेळी नंदकुमार बघेल यांना तुरुंगातही पाठवण्यात आले होते. दरम्यान, कॅबिनेट मंत्री असूनही भूपेश यांनी वडिलांच्या सुटकेसाठी कोणत्याही राजकीय पॉवरचा वापर केला नव्हता. 

आता सुद्धा वडिल नंदकुमार बघेल यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतरही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्पष्टपणे सांगितले की,

कोणीही कायद्याच्या वर नाही, पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुनिश्चित केली जाईल, छत्तीसगड सरकार प्रत्येक जाती, धर्माचे संरक्षण करेल, प्रत्येक वर्ग, प्रत्येक समुदाय भावनांचा आदर केला जातो, कायदा आमच्यासाठी सर्वांपेक्षा वर आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.