Orkut च्या जमान्यातलं आमचं प्रेम….

प्रेम व्यक्त करणे जगातल्या काही कठीण कामांपैकी एक आहे, म्हणजे किमान आम्हाला तरी असे वाटते. हे प्रेम व्यक्त करण्यसाठी आज कधी नाही ते फोन फुल चार्ज करून अगदी इंटरनेट पॅक कधी संपणार आहे इथे पर्यंतची सगळी तयारी तुम्ही करून बसला असालच म्हणा.

कारण तिला किंवा त्याला आज इम्प्रेस करायला काळ रात्र घालवून तयार केलेली कविता, इकडून तिकडून ढापलेली जाम भावनिक वाक्य आता पर्यंत instagram, facebook, whatsapp च्या स्टेट्स वर पडली ही असतील. मग हजारदा त्या तुमच्या प्रेमाने पाहिलं का नसेल पाहिल ? असे अनेक प्रश्न डोक्यात फिरत असतील आता.

एवढच काय तर काहींनी आजचा गुड मॉर्निंगचा मेसेज पण एकदम भनाट तयार केला असेल, म्हणजे आजची सकाळ न भूतो न भविष्यती असल्यासारखा. आता हे वाचून, मी तुमच्याबद्दल काही लिहतोय कि काय असे वाटेल तुम्हाला पण नका काळजी करू इतक्या सहज तुमची प्रेम कहाणी नाही करणार एक्स्पोज.

तर ही सगळी उठाठेव करण्यापाठीमागे कारण असं, कि आज या न सोसणाऱ्या सोशल मिडिया मुळे आपल प्रेम किती सोप झालं, म्हणजे अक्षरशा दोन मिनटात मॅगी व्हावी तस हा आपला जमाना, शेर करून झटक्यात डिलीट मारणारा आहे.

पण प्रेम आपल्या देशात सुरवातीला कबुतराच्या माध्यमातून व्यक्त केलं गेल. म्हणजे “कबुतर जा जा जा…..” या गाण्याप्रमाणे कित्येकांनी पत्र पाठवून आपल प्रेम व्यक्त केलं आपल्या आताच्या भाषेत लव्ह लेटर. हा जमाना तसा प्रेम व्यक्त करण्यासाठी कठीण होता. पण प्रेमात पण नंतर क्रांती झाली, पत्रातून फोन आणि तिथून पुढे जाऊन २००४ साली चालू झाल.

प्रेमाचा orkut प्रवास.

हे orkut आपल्यापैकी अनेकांनी अनुभवल असेल, प्रेमाच्या भावना सहज व्यक्त करण्याच हे सगळ्यात सोप माध्यम होत. भारतात धुमाकूळ घालणारी ही पहिली सोशल नेटवर्किंग साईट होती. गुगल ने निर्माण केलेला हा प्रकार भारत आणि ब्राझील या दोन देशात सगळ्यात जास्त चालला. आता कित्येक लोकांच प्रेम, जे orkut ने जोडल तिथून ते फेसबुकवर आपल्या चिमुकल्यांचे फोटो टाकेपर्यंत आल असेल आता पर्यंत.

तर या प्रेमाचा जोडण्याचा आणि झटक्यात तुटण्याचा प्रवास चालू झाला तो याच orkut मुळे.

orkut नावाच्या माणसाने तयार केलेल्या या साईट मुळे आपल्याला सहज scrap बुकचा वापर करून कधीही  व्यक्त होता आल. इतकचं नव्हे तर हे scrap तितक्याच तातडीने उडवता येत होत जस सध्या आपण माणस डिलीट मारतो त्याप्रमाणे. या scrap च महत्व इतक कि ते बघण्यासाठी सगळे कामधंदे सोडून आपण इंटरनेट कॅफेत घालवलेत. या scrap मधून राग, मजा, प्रेम सगळ एकदम भन्नाट पद्धतीने व्यक्त केलं जात होत.

याच orkut वर अजून एक भन्नाट पर्याय होता, भनाट म्हणल्या म्हणल्या तुम्हाला आठवला ही असेल, तो म्हणजे

crush पाठवण्याचा…. 

म्हणजे तुम्हाला ती किंवा तो आवडलाच तर उगाच आताच्या फेसबुक प्रमाणे वॅालवर जाऊन फक्त सगळे फोटो लाईक करत बसण्यापेक्षा हा उपाय भारी होता, काय असेल ते थेट…..

याच क्रश मुळे कित्येक जण प्रेमात क्रश झालेत तर अनेकांच्या प्रेम गाडीला डायरेक्ट पंख लागलेत. माझ तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी आपल्याला तेव्हा जेवण झालं का? काय करतेस? असली सुरवात करायची गरज नव्हती थेट माझा तुझ्यावर crush आहे हे एक बटन दाबून सांगता येत होत.

असाच अजून एक पर्याय म्हणजे एखाद्याची प्रोफाईल बघणे, orkut च्या अगदी सुरवातीच्या काळात तुम्ही कुणालाही ओळखत असो नसो तुम्ही त्यांना सहज स्टोक करू शकता होता. तिचे फोटो बघून ती काय करते काय नाही ते कळायचे.

यातलाच एक भाग म्हणजे तिला पटवायचे झालेच तर आपल्याला तारीफ करण भाग आहे. हे करण्यासाठी orkut वर TESTIMONIALS नावाचा एक भारी प्रकार होता. यावर येऊन माझ्या बद्दल जरा चांगल लिही म्हणजे बघणारी इम्प्रेस होईल असे सांगून मी कितीतरी लोकांना कटिंग चहा तर कधी वडापाव खाऊ घालण्याची शपथ दिली होती. कारण शेवटी इमेज टिकायला पाहिजे ना….

कारण आधीच आमचा चेहरा असला भारी कि काही विचारायला नको त्यात कुठला तरी बिना फिल्टरचा फोटो DP म्हणून लावलेला असतांना कोण होणार इम्प्रेस तेव्हा कामाला याचे ते हेच TESTIMONIALS. 

आणि आता सगळ्यात महत्वाचे कुठल्या तरी सुंदर मुलीचा अथवा मुलाचा फोटो पाहून आपण आता फेसबुकवर लगेच मेसेज करतो आयुष्यातल सगळ ज्ञान वापरून बोलतो, एवढ सगळ केल्यानंतर कुठे जुळायला लागलं असं वाट आणि तेवढ्यात कळत कि ती प्रोफाईल आपल्या वाटल्या प्रमाणे सुंदर मुलीचे किंवा स्मार्ट मुलाची वैगरे नसून एखादी फेक प्रोफाईल असते. तेव्हा मात्र आपला चेहरा पांढरा फेक पडलेलो असतो, पण orkut च्या जमान्यात  याची शक्यता कमी होती कारण एका सर्वेक्षणानुसार orkut वर फेक प्रोफाईलचे प्रमाण तुलनेने कमी होते.

म्हणजेच काय तर तेव्हा फोटोत असणारे तुम्हाला आवडले तर ते खरे होते पुढे काही होऊ अगर नाही ….

हा सोशल मिडियावरील प्रेमाचा प्रवास जितका भारी वाटतो तितकाच भयंकर आहे ! म्हणजे सध्या मेसेज केला म्हणून भांडण नाही केला म्हणून भांडण एवढच काय तर प्रोफाईल फोटो वरून सुद्धा भांडण तर कधी उगाच नुसता अंगठा का पाठवला म्हणून भांडण……

या सगळ्या भांडा भांडीत आपल्या प्रेमाचा सत्यानाश होतो आणि मग आपले वडीलधारे म्हणतात “आमच्यावेळी असं नव्हता बाबा”. तेव्हा आज जरा प्रेम करतांना सावध व्हा नाहीतर लग्नाची स्वप्न पाहता पाहता लग्नातल फक्त

“सावधान” !!!!!

एवढच राहील आयुष्यात...

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.