कोरोनात अंबानी एका तासाला जितके कमवत होते तितके एका मजूराला कमवायला १० हजार वर्ष लागतील

हम्म्म, अंबानी विरोधक काय? म्हणजे मोदी विरोधक… 

आम्ही नाय वाचत तुमचा लेख जा…. 

अरे भावड्या वाच तर, लय लोड घेवू नको. नॉन प्रॉफिट ऑक्सफेम नावाचा ग्रुप आहे. त्यांनी २५ जानेवारीला एक रिपोर्ट जाहीर केलाय. या रिपोर्टमध्ये कोरोनासारख्या महामारीत श्रीमंत कसे श्रीमंत झाले आणि गरिब कसे गरिब होतं गेले हे सांगितलय.

ऑक्सफेमने हा रिपोर्ट स्विझर्लंडच्या दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमि फोरमच्या समोर मांडला आहे. 

या संबधित PTI ने बातमी दिलेय, त्यात सांगितलय भारतातल्या १०० टॉप अब्जाधिशांची संपत्ती मागच्या मार्च म्हणजे २०२० च्या मार्च पासून आजपर्यन्त १२,९७,८२२ कोटींनी वाढले. आत्ता भारतातले सर्वात खालच्या लेव्हलचे गरिब लोक काढले तर ही वाढलेली संपत्ती खालच्या नंबरवर असणाऱ्या १३.८ गरिबांना समप्रमाणात वाटली तर प्रत्येकाला ९४,०४५ रुपयांचा चेक मिळू शकतो.. 

NDTV ने बातमी देताना या रिपोर्टची टक्केवारी सांगितलेय,

लॉकडाऊनच्या काळात अब्जाधीश लोकांची संपत्ती ३५ टक्यांनी वाढली. तर याच रिपोर्टनुसार देशातली ८५ टक्के घरांमध्ये मासिक उत्पन्न न मिळण्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

ऑक्सफेम रिपोर्ट्स नुसार एप्रिल २०२० मध्ये देशातल्या १.७ लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. ऑगस्ट २०२० रोजी मुकेश अंबानी जगात ४ थ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती झाले. याच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलय की, 

अंबानी एका सेकंदात जेवढे कमावतात तितके पैसे कमवायला अनस्किल्ड वर्करला ३ वर्ष लागतील तर अंबानी एका तासात जितके कमावतात तितके पैसे कमवायला अनस्किल्ड वर्करला १० हजार वर्ष लागतील. 

जगभरातील अब्जाधिशांची संपत्ती सांगायची झाली तर १८ मार्च ते ३१ डिसेंबर २०२० अखेर ही संपत्ती ३.९ ट्रिलियन डॉलरने वाढलेय. 

इतक्यावरच न थांबता ऑक्सफेमने एका सल्ला देखील दिलाय. त्यांच्या मते भारतातल्या टॉप ११ अब्जाधिशांवर करोनात वाढलेल्या त्यांच्या संपत्तीवरच १ टक्के टॅक्स लावला तर तो संपुर्ण पैसा भारतातील लसिकरणासाठी पुरेसा ठरु शकतो. 

तर अस हाय सगळं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.