ॲप्पल, मर्सिडीज सोडा भारताची पहिली फार्मा कंपनी एका छोट्या खोलीत सुरू झाली होती

आपण अनेकदा ॲप्पल या गॅरेजमध्ये उभा राहिली होती, मायक्रोसॉफ्ट या दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झाली, मर्सडिज या छोट्या गॅरेजमध्ये सुरू झाली म्हणून उदाहरणं देतो. तशी उदाहरणं द्यायला पण काही हरकत नाही. 

एखाद्या कंपनीसाठी काय लागतं. भांडवल.. साधी गोष्ट आहे वो भांडवलाशिवाय काही होतं नाही. दूसरी गोष्ट लागते ती जागा. MIDC मध्ये सहजासहजी जागा सुटली नाही तर आठ-दहा एकराचा माळ काहीना काही करुन ॲडजेस्ट करायलाच लागतो. 

भारताची पहिली फार्मा कंपनी एका घरात सुरू झाली. ७०० रुपयांच्या भांडवलावर ती सुरू करण्यात आली होती. ७०० रुपये म्हणजे त्या काळचे जास्त असले तरी एखाद्या फार्मा कंपनीसाठी खूपच किरकोळ रक्कम होती. 

आपण अनेकदा ॲप्पल या गॅरेजमध्ये उभा राहिली होती, मायक्रोसॉफ्ट या दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झाली, मर्सडिज या छोट्या गॅरेजमध्ये सुरू झाली म्हणून उदाहरणं देतो. तशी उदाहरणं द्यायला पण काही हरकत नाही. 

पण कसय न भिडू, आपल्याचं माणसांच कौतुक करायला आपण कुठेतर कमी पडतो. आपल्या मातीत देखील अशी माणसं आहेत. अशाच माणसांपैकी एक माणूस म्हणजे, 

आचार्य प्रफ्फुल चंद्र राय… 

भारतीय केमिकल सायन्सचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भारतातल्या पहिल्या केमिस्ट्री रिसर्च स्कूलचे ते संस्थापक होते. 

त्यांचा जन्म बंगालच्या खुलाना जिल्ह्यातला. १८६१ सालचा त्यांचा जन्म. १० वर्षांचे झाल्यानंतर ते कलकत्ता येथे पुढील शिक्षणासाठी गेले. पण तिथे गेले आणि त्यांची तब्येत बिघडली. पुन्हा कलकत्ता सोडून त्यांना आपल्या गावी यायला लागलं. 

याच काळाचा फायदा घेवून त्यांनी इतिहास,भुगोल, साहित्य यासोबत अन्य भाषांच शिक्षण घरबसल्या घेण्यास सुरवात केली. काही काळानंतर तब्येत व्यवस्थित झाली आणि ते १८७६ साली पुन्हा कलकत्त्याला गेले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अल्बर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इथून मॅट्रिकची परिक्षा पास झाल्यानंतर त्यांनी विद्यासागर कॉलेज आणि प्रेसिडेंट कॉलेजात प्रवेश मिळवला. प्रेसिंडेटं कॉलेजमध्ये ते विज्ञान शिकायला जात तर विद्यासागर कॉलेजात ते आर्ट्स शिकत. हळुहळु त्यांचा कल विज्ञानाकडे झुकत गेला. 

प्रिसेडेन्ट कॉलेजमध्ये विज्ञान शिकवण्यासाठी त्यांना एलेक्झांडर पेडलर नावाचे शिक्षक येत. त्यांच्या प्रभावातून त्यांनी आपल्या होस्टेलमध्ये एक केमिकल लॅब सुरू केली. 

१८८२ साली त्यांनी गिल्क्राईस्ट स्कॉलरशीप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी इंग्लडच्या एर्डिनबग विद्यापीठात जाण्याचा चान्स मिळाला. इथे बीएस्सी आणि डीएसस्सी च्या डिग्री त्यांनी मिळवल्या. त्या काळात सर्वजण आर्गेनिक केमिस्ट्रीच्या मागे लागले होते. ते पाहून या माणसाने इनआर्गेनिक केमिस्ट्रील लक्ष घालण्यास सुरवात केली. 

एकामागून एक करत त्यांचे प्रबंध जागतिक दर्जाच्या ठिकाणी छापून येवू लागले. लोक त्यांना ओळखू लागले. अशा वेळी बाहेरील देशांमधून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नोकरीच्या ऑफर येवू लागल्या. अशा वेळी त्यांच्या उपयोगी आलं ते त्यांच आर्ट्स च शिक्षण. 

भारतात राहून भारतासाठी काहीतरी करावं म्हणून ते भारतात आले. 

१८८९ साली ते जिथे शिकले होते त्याच प्रेसिडेन्ट कॉलेजात शिक्षक म्हणून काम पाहू लागले. या काळात केमिस्ट्री विषयात त्यांनी अनेक शोध लावले. त्यामुळे तरुण पोरं त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. उदाहरण सांगायचं झालं तर या तरुण पोरात असणारे दोन जण म्हणजे मेघनाथ सहा आणि शांती स्वरूप भटनागर. 

याच काळात आपल्या छोट्याशा घरातून त्यांनी भारतातील पहिल्या केमिकल फॅक्ट्रिची स्थापना केली. बंगाल केमिकल ॲण्ड फार्मास्यूटिकल वर्क्स लिमिटेड कंपनी ची सुरवात त्यांची घरातून झाली. ७०० रुपायांच्या भांडवलावर ती सुरू करण्यात आली होती.

त्यांच्या या कंपनीमुळे सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली माहित आहे का?

तर त्यांच्या भोवती गोळा होणाऱ्या पोरांना कळालं की आपलं नॉलेज एखाद्या ब्रिटीश कंपनीत जावून महिन्याच्या पगारावर वाटण्याची गरज नाही. आपण देखील अशी कंपनी उभा करु शकतो. 

या कंपनीत केमिकल्स, औषधे तयार होत होती. ग्लिसरीन, साबण, टुथपेस्ट अशा गोष्टी देखील तयार केल्या जातं. जेव्हा राय ६० वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी आपला पूर्ण पगार विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाला देऊन टाकला. त्यांच सोबत ते अखेरपर्यन्त आंतराष्ट्रीय सेमिनार अटेंन्ड करत राहिले. 

दुर्देवाने भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं म्हणजे १९४४ साली त्यांच निधन झालं. मात्र त्यांनी घातलेल्या पायामुळेच भारतीयांनी औषधे तयार करण्याची, केमिकल इंडस्ट्रीमध्ये भव्यदिव्य करण्याचा कॉन्फिडन्स मिळाला हे नक्की. 

२०११ साली रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री ने रॉय पुतळा आपल्या आवारात बसवला. युरोपा बाहेरच्या व्यक्तीचा इथे असणारा हा एकमेव पुतळा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.