प्रशांत किशोर यांची साथ सुटली पण कॅप्टनची निवडणूक रणनीती पक्षाच्या राजकारणात अडकलीये.

पंजाबमध्ये २०२२ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर पंजाबमधले राजकीय वातावरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत चाललंय. त्यात काँग्रेस पक्षातली आतलीच भांडण चव्हाट्यावर येत आहेत आणि त्यात भर म्हणून आता या निवडणुकीच्या काहीच महिने आधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार असलेले तसेच निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कॅप्टनची साथ सोडली आहे.

आता कॅप्टनची निवडणूक रणनीती पक्षाच्या राजकारणात गुरफटली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार प्रशांत किशोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांचा राजीनामा स्वीकारायला कॅप्टनलाही वेळ लागला नाही. त्यांनी त्याच दिवशी किशोर यांचा राजीनामा स्वीकारला. आता मुख्य प्रश्न हा आहे कि, कर्णधाराची पुढील रणनीती काय असेल? मात्र राजकीय विश्लेषक सध्या याबाबत मौन बाळगून आहेत.

असंही असू शकते कि, कॅप्टनला स्वतःवरच कॉन्फिडन्स नाहीये का की, आगामी निवडणूक त्यांच्याकडून लढली जाणार आहे कि नाही ?

पंजाब काँग्रेसची कमान नवज्योतसिंग सिद्धू यांना मिळाल्यानंतर पक्षाचे राज्य अंतर्गत राजकारणाला वळण लागले आहे. पक्षात दोन सरळ ध्रुव आहेत. पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पंजाबमधील निवडणूक रणनीती आता गुंतागुंतीची झालेली दिसते.

खरं सांगायचं झालं तर प्रशांत किशोर यांच्या त्या ५ महिन्यांच्या कार्यकाळात, ना पंजाब कॉंग्रेसच्या कामी आले ना राज्य सरकारच्या, ना मुख्यमंत्री कॅप्टन यांच्या कामी आले. २०२२ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन कॅप्टनने त्यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या वर्षी १ मार्च रोजी नियुक्त झालेल्या प्रशांत किशोर यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला.

यासाठी प्रशांत किशोर यांचा पगार फक्त १ रुपया निश्चित करण्यात आला होता.

बरं पगार नसला तरी, त्यांना सरकारी कोठी, सचिवालयातील कार्यालय, सुरक्षा कर्मचारी, वाहनाची इतर सुविधा मिळतच होत्या. त्यांच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात प्रशांत किशोर हे फक्त दोन वेळा पंजाबमध्ये आले होते. या दोन दौऱ्यांदरम्यान त्यांनी एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आणि दुसऱ्यांदा आमदारांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकांमधून सरकारला कोणताही फायदा झाला नाही.

जरी असे मानले जात होते की कॅप्टनने त्यांना फक्त निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी नियुक्त केले होते, परंतु त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला.

असे म्हटले जाते की, आमदारांसोबतच्या बैठकीनंतरच, प्रशांत किशोर यांनी इथून पुढे मी पंजाबमध्ये काम करणार नाही असे मनाशी ठरवले होते, कारण या बैठकीत अनेक आमदारांनी नोकरशाहीच्या अति हस्तक्षेपाचा आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

काही मंत्र्यांशी झालेल्या संभाषणातच त्यांचं पक्कं झालं होतं कि, त्यांना पंजाबमध्ये काम करायचे नाही.

पहिल्या दिवसापासूनच  प्रशांत किशोर यांचा राजीनामा हा कॅप्टनच्या टेन्शनचे कारण मानलं जातं.

कारण पंजाबमधील काँग्रेसचे राजकारण आधीच कॅप्टन आणि सिद्धू यांच्यात विभागलेले दिसत आहे. सिद्धू यांना कॅप्टनच्या संमतीशिवाय काँग्रेस पार्टी हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपवली होती. प्रशांत किशोर हे मुख्यमंत्री कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील दुवाही आहे. सिद्धू यांना काँग्रेसमध्ये आणण्यात प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा होता.

अशा स्थितीत असे मानले जात होते की प्रशांत किशोर मुख्यमंत्री कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील अंतर मिटवण्यात यशस्वी होऊ शकतात, पण त्यांनी या सगळ्या गोंधळापासून दूर राहण्याचा विचार केलाय असं एकंदरीत दिसून येते.

किंव्हा प्रशांत किशोर यांच्या राजीनाम्याचा अर्थ काही वेगळा देखील असू शकतो जसा कि, कॉंग्रेस हायकमांडने प्रशांत यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी सोपवण्याचा विचार केला असू शकतो. आता हे सगळे तर्क-वितर्क लावण्याच्या ऐवजी…आगे आगे देखो होता हैं क्या ?

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.