आणि रजनी पंडित लेडी जेम्स बॉण्ड म्हणून फेमस झाल्या..

सिक्स्टीज मधला सिनेमा सुरूय, स्थळ : कॅसिनो

सोव्हिएत लेडी ट्रेंच आपला पत्त्याचा डाव टाकते. तिच्या पुढ्यात ताश खेळत बसलेला, समोर तोंडात सिगार लाईट करणारा उंचपुरा तरणाबांड पुरुष आपली पानं टाकतो, आणि डाव जिंकतो.

ट्रेंच विचारते, आय ऍड्मायर्ड युअर लक मिस्टर …?

तो तरुण उद्गारतो.. बॉण्ड..जेम्स बॉण्ड.. 

आपल्याला जेम्स बॉण्डचे असले डायलॉग ऐकून वाटत कि खऱ्याखुऱ्या आयुष्यातले डिटेक्टिव्ह पण असेच असतात. पण नाही, असं नसतंय. प्रसंगी भिकाऱ्यांपासून ते कामवाल्यांपर्यंत सगळे रोल या डिटेक्टिव्ह लोकांना प्ले करावे लागतात.

अशीच एक लेडी जेम्स बॉण्ड भारतातल्या महाराष्ट्रातली रजनी पंडित..भारतातली पहिली महिला डिटेक्टिव्ह. हिची माहिती काढायला गेलं तर सगळं गुगल तुम्हाला तिची माहिती देईल पण तिचे किस्से मिळतील की नाही याची काय गॅरेंटी नाही. तिने सॉल्व केलेले मर्डर मिस्ट्रीज एवढ्या तुफान आहेत, काय बोलू नका.

असाच एक किस्सा, आज गोष्टीच्या रूपात 

रजनीच्या आयुष्यातली एक मोठी मर्डर मिस्ट्री सॉल्व करण्यासाठी रजनी ६ महिने कामवाली झाली होती. त्या स्टोरीमध्ये एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. त्या बाईने आपल्या लफड्यासाठी आपल्या नवऱ्याचा काटा काढला होता. आणि त्यानंतर आपल्या दोन मुलांचा खून केला होता. पोलिसांकडे हि केस आली पण त्यांना कोणतेही पुरावे सापडत नव्हते. यासाठी पोलिसांनी रजनीची मदत मागितली.

तेव्हा रजनीच प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं काम चांगलं फॉर्मात होत. 

तिला हा शोध काढायचा होता कि या बाईने कशा पद्धतीने नवऱ्याचा काटा काढला आणि त्या बाईचा पंटर कोण आहे?

रजनीनं केसला सुरुवात केली. तिच्यापुढं पहिला प्रश्न होता या बाईच्या घरात कस घुसायचं. यासाठी रजनीने घरकाम करणाऱ्या बाईचा रोल प्ले करायचं ठरवलं. त्या दवशी ती एका घरकाम करणाऱ्या बाइकडं गेली. रजनीने तिला पटवून दिल कि तिला, याच भागात कोणत्या तरी घरात कामाची नितांत  आवश्यकता आहे. कारण तिचे २ वेळच्या जेवणाचे पण वांदे आहेत. त्या बाईला राजनीवर दया आली,  त्या बाईने बरोबर तिला त्या खून झालेल्या घरात काम मिळवून दिल.

रजनी त्या घरत काम करायला लागली पण पहिले २ महिने रजनीच्या हाताला काहीच लागत नव्हतं. कारण त्या घरात खुनी बॉईचा पंटर, फक्त रात्रीच यायचा. ज्यामुळे रजनीच्या हाताला काहीच लागत नव्हतं. त्या दोघांना एकत्र पकडता येत नव्हतं.

पण एक दिवस उजाडलाच, ज्या दिवशी राजनीच नशीब उघडलं, आणि खुन्यांच्या नशिबाला टाळं लागलं..

झालं असं कि, रजनी ज्या खुनी बाईच्या घरात काम करत होती ती बाई चक्कर येऊन पडली. रजनीने हीच वेळ साधत त्या बाईची दिवस रात्र सेवा केली. या गोष्टीमुळे त्या खुनी बाईचा रजनीवर विश्वास बसला. ती तिला आता रात्रीच्या वेळी ही घरी थांबवून घेऊ लागली. थोडक्यात रजनी आता त्या बाईची केयरटेकर झाली होती.

पुरावे गोळा करताना राजनीकडून एक गफलत झाली होती. रजनीने एकदा आपला रेकॉर्डर चालू करताना त्याचा बीप असा आवाज आला होता. घरात शांतता असल्यानं तो आवाज खुनी बाईने स्पष्ट ऐकला होता. त्या बाईला आता रजनीच टेन्शन यायला लागलं होत. पण ती बोलून दाखवू शकत नव्हती. तिने रजनीचं घराबाबाहेर पडणं बंद करून टाकलं होत. त्यामुळे रजनीला बाहेर जाऊन पोलिसांशी संपर्क करणं अवघड जात होत.

इकडं या बाईन तिच्या पंटरच्या घरी येण्यावर रोक लावली होती. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. तो त्या बाईचं ऐकत नव्हता. अशाच एका वेळी तो घरात असताना रजनीने स्वतःच्या बोटाला धारधार सुरीने कापून घेतलं आणि बोटाला डॉक्टरकडे जाऊन पट्टी करून येते म्हणून घराबाहेर पडली.

लागलीच तिने पीसीओ वरून पोलिसांना फोन केला. २० मिनिटांत पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. त्या बाईसहित तिच्या पंटरला पोलिसांनी अटक केली. खुनाचे सर्व पुरावे रजनीने पोलिसांच्या हाती सुपूर्द केले.

रजनीने केस सॉल्व करण्यासाठी बरेच रोल प्ले केलीत. यात आंधळी बाई, कामवाली, प्रेग्नन्ट बाई, फेरीवाली असलंच बरचस काही. अशी या अफलातून बाईचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत. आजच्या पुरता एवढाच..

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.