प्रियांका गांधींना वाराणसीतून उमेदवारी न देण्याबद्दल काय कारणे असू शकतात ?

वाराणसीतून अजय राय यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आणि प्रियांका गांधीच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला. गेल्या महिन्यापासून प्रियांका गांधी मोदींविरोधात लढणार अशा चर्चा चालू होत्या. खुद्द कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांकडून देखील या लढाईची हवा तयार करण्याच काम चालू होतं.  पण त्या चर्चा फक्त कट्यावरच्या चर्च्याच ठरल्या. 

बर या हि चर्चा तयार करण्याचं काम खुद्द राहूल गांधी यांनी देखील केलं होतं. प्रियांका गांधींच्या उमेदवारीवरून राहूल गांधींना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले होते की सस्पेंस वाईट गोष्ट नाही. प्रियांका वाराणसीतून लढणार की नाही याला मी दुजोरा देखील देणार आणि आणि या बातमीचं खंडन देखील करणार नाही. 

प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याच्या पहिल्या दिवसापासून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे हे कोणिही नाकारू शकणार नाही. त्यातही उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या आणि सर्वाधिक खासदार देणाऱ्या राज्यात सध्या तरी प्रियांका गांधींची हवा चालू झाली आहे हे देखील माध्यमातून स्पष्ट होतं आहे. या हवेचा अचूक फायदा कॉंग्रेस घेईल अशीच चर्चा होती पण पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाने चुकीचा निर्णय घेतल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली. 

प्रियांका गांधींना वाराणसीतून उमेदवारी देण्यात आली नाही याच मुख्य कारण सांगण्यात येत ते म्हणजे,

कॉंग्रेस प्रियांका गांधींच्या बाबतीत रिस्क घ्यायला तयार नव्हती. राजकीय विश्लेषकांच्या मते प्रियांका गांधींचा पराभव झाला असता तर मोदींची हवा टिकून आहे याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात झाली असती. त्याचसोबत प्रियांका गांधींची इंदिरा गांधींसोबत होणारी तुलना त्याचा पक्षाला होणारा फायदा या सर्व गोष्टी मागे पडून प्रियांका गांधींकडे पराभूत उमेदवार म्हणून बघण्याची मानसिकता लोकांमध्ये तयार झाली होती. राहूल गांधी यांची सुरवातीपासून विरोधकांकडून पेरण्यात आलेली पप्पू इमेज अजूनही कॉंग्रेस पक्षाला खोडता आली नाही.

अशा वेळी एक पराभूत व्यक्ती म्हणून प्रियांका गांधींची इमेज तयार करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष तयार नव्हता. 

दूसरीकडे असही सांगण्यात येत की,

जर मोदींना हरवून प्रियांका गांधी विजयी झाल्या असत्या तर पुढच्या क्षणी राहूल गांधी यांच अस्तित्व नष्ट होण्याची चिन्ह होती. या निवडणुकीत प्रियांका निवडून आल्या असत्या तर त्या राहूल यांच्याहून अधिक अशा क्रमांक एकच्या नेत्या तयार झाल्या असत्या. व आत्ताच्या काळात पक्षामध्ये माध्यमांकडून दोन नेतृत्व तयार करण्यात आली असती. 

मोदींच्या विरोधात लढल्यास किंवा न लढल्यास फायदा कमी मात्र तोटा जास्त असल्याचं कॉंग्रेस पक्षाला जाणवत होतं. उत्तरप्रदेशसह इतर राज्यात कॉंग्रेसची लाट निर्माण होण्यास प्रियांका गांधीची उमेदवारी अनुकूल ठरली असती मात्र निकालानंतर प्रियांका गांधी यांचा विजय अथवा पराभव दोन्ही गोष्टी अडचणीच्या ठरल्या असत्या. हाच विचार करून प्रियांका गांधींचा पत्ता मागे ठेवण्यात आल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येत आहे. 

प्रियांका गांधी यांच्या ऐवजी उमेदवारी देण्यात आलेले अजय राय कोण आहेत? 

अजय राय वाराणसीतले मोठे नेते असल्याच सांगितलं जातं. ते पुर्वी भाजपमध्येच होते. त्यानंतर व्हाया समाजवादी पार्टी ते कॉंग्रेसमध्ये आले. ते स्वत: पाचवेळा आमदार राहिले आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी वाराणसीमधून नरेंद्र मोदींना आव्हान दिलं होतं. तेव्हा ती तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मोदींना ५६ टक्के म्हणजे ५.८१ मते मिळाली होती तर दूसऱ्या क्रमांकाच्या केजरीवाल यांनी २.०९ लाख मते मिळाले होते. तुलनेत अजय राय यांना ७५ हजारचं मते मिळाली होती. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.