रघुवंश बाबू लालूंचे बेस्ट फ्रेंड तर होतेच पण त्यांना बिहारचा तारणहार म्हणून ओळखलं जायचं..

बिहारच्या राजकारणाने देशाला अनेक मात्तबर नेते दिले. त्यातलंच एक नाव म्हणजे रघुवंश बाबू अर्थात रघुवंश प्रसाद सिंग. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि रघुवंश बाबू दोघ जिवलग मित्र. त्यांच्या दोस्तीचे अनेक किस्से आजही बिहारच्या कट्ट्यावर फेमस आहेत.

रघुवंश बाबूंना लालूंचे संकटमोचक म्हंटल जायचं. मात्र ह्याचं रघुवंश बाबूंनी आपल्या शेवटच्या काळात स्वतःला  मित्रापासून दूर केलं होत. राजदमधून राजीनामा देत इतक्या वर्षांच्या मैत्रीवर कायमचा फुलस्टॉप लागला. यामागचं कारण त्यांनी काय स्पष्ट केलं नाही. बरं हा वाद बोलून मिटला देखील असता पण लालूंना सुद्धा त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळू शकली नाही. आणि वर्षातच म्हणजे १३ सप्टेंबर २०२० ला त्यांचं निधन झालं. 

जवळजवळ ३२ वर्ष या दोघांची मैत्री होती. मात्र, त्यांनतर असे काहीतरी घडले कि, रघुवंश बाबूंनी लालू प्रसाद यादव यांना पत्र पाठवलं आणि राजदमधून राजीनामा दिला. यावेळी त्यांनी पत्रात ३२ वर्षे  लालूप्रसाद यादव यांच्या मागे राहण्याबद्दल लिहिले. सोबतचं, पक्ष आणि सामान्य जनतेकडून मिळालेल्या आपुलकीविषयी देखील लिहिले. आणि म्हंटले कि, बस्स आता आणखी नाही, माफ करा!

तसं म्हंटल तर, रघुवंश प्रसाद सिंह आणि लालू प्रसाद यादव यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जातात. कर्पूरी ठाकूर यांच्या काळापासून दोघे एकत्र होते. कर्पूरी ठाकूर यांच्या मृत्यूनंतर रघुवंश प्रसाद सिंह यांनीचं लालूंना विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनण्यास मदत केली होती. रघुवंश प्रसाद सिंह यांनीही राजदच्या स्थापनेत मोठी भूमिका बजावली.

बिहारमध्ये मनरेगा यशस्वीपणे आणण्यात रघुवंश बाबूंचं मोठं योगदान मानलं जात.

पक्षात रघुवंश प्रसाद सिंह यांना लालूप्रसाद यादव यांच्यासारखाचं मान होता, पण बदलत्या काळानुसार, जेव्हा राजकारण बदलले, तेव्हा तेजस्वी यादव यांच्याशी त्यांचे अनेक मुद्यांवर मतभेद समोर आले. हेच कारण होत कि, रघुवंश बाबूंना अनेक वेळा बॅकफुटवर जावे लागले.

उच्च जातीच्या आरक्षणाच्या मुद्यावर रघुवंश प्रसाद सिंह आणि तेजस्वी यादव यांच्यातील मतभेत स्पष्टपणे दिसत होते. तेजस्वी झुकणाऱ्यातले नव्हते , त्यामुळं रघुवंश बाबूंनाचं माघार घ्यावी लागली.  रघुवंश प्रसाद सिंह यांचा विरोध असूनही तेजस्वी यादव यांच्या आवडते जगदानंद सिंह यांना राजदचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. 

तेजप्रताप यादव आज पक्षात शिस्तीच्या नावाखाली जगदानंद सिंह यांनी बनवलेल्या नियमांना विरोध करताना दिसतील, पण त्याविरोधात पहिला आवाज रघुवंश प्रसाद सिंह यांनी उठवला. या प्रकरणातही रघुवंश प्रसाद सिंह यांच्या शब्दांना महत्त्व दिले गेले नाही.

तसं पाहिलं तर पक्ष उभारणीत रघुवंश  बाबूंना देखील हात होता, मात्र त्यांना  पक्षात कोणतंही मोठं पद दिल गेलं नव्हतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजदचा पराभव झाल्यानंतर रघुवंश प्रसाद सिंह यांना राज्यसभेवर पाठवण्यार असल्याच्या चर्चाना उधाण आलं होत. रघुवंश  बाबूंना सुद्धा अशीच काहीशी अपेक्षा होती. पण लालूंनी त्यांच्याऐवजी आपले आणखी एक जुने मित्र प्रेमचंद गुप्ता आणि व्यापारी अमरेंद्र धारी सिंह यांना राज्यसभेवर पाठवले.

एवढंच नाही तर रघुवंश यांचे विरोधक आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाच्या तिकिटावर त्यांचा पराभव करणारे रामा सिंह यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रामा सिंह यांनी असेही सांगितले की, ते निश्चितपणे राजदमध्ये येतील.

यासह त्यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांच्या विरोधात निवेदनही दिले. तेजस्वी यादव यांनी यावर मौन बाळगल्याने रघुवंश यांच्या नाराजीलाही चालना मिळाली. रघु सिंह यांना पक्षात आणण्याच्या प्रयत्नांनंतरच रघुवंश प्रसाद सिंह जोरदार कारवाई करताना दिसत होते आणि त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

बिहारच्या राजकारणातला ध्रुवतारा असं त्याचं वर्णन आजही अनेक नेतेमंडळी करतात

रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नितीशकुमार यांना महाआघाडीत ठेवून त्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने होते. ते नितीशकुमारांना तेजस्वी यादव यांचे राजकीय गुरु बनवण्याविषयी बोलायचे. पण लालू प्रसाद यादव यांची यावर कोणतीच प्रतिक्रिया नसायची. रघुवंश प्रसाद सिंह बॅकफूटवर दिसण्याचं हे देखील एक कारण सांगितलं जातं.

रघुवंश बाबू आणि लालू प्रसाद यांची मैत्री फक्त राजकारणाशी जोडललेली नव्हती. ते एकमेकांच्या कुटुंबाशी देखील तितकेच जोडलेले होते. लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात ते चंद्रिका राय आणि लालू कुटुंबातील संबंध कायम ठेवण्याच्या बाजूने होते.

पण तेजप्रताप यादवांना रघुवंश बाबुंचा हा स्टॅन्ड पटत नव्हता. याचा परिणाम हळू- हळू तेजप्रताप यांच्या वक्तव्यांत दिसून येत होता. त्यांनी रघुवंश यांची तुलना राजदच्या समुद्रातल्या एका तांब्याभर पाण्याशी केली. आणि म्हंटले कि, रघुवंशसारखे एक तांबे पाणी आरजेडीच्या समुद्रातून निघून गेले तरी काही फरक पडणार नाही. 

रघुवंश बाबूंना पदोपदी होणार हा आपला अपमान सहन झाला नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या जिगरी असणाऱ्या लालूंनी यावर मौन बाळगल्याने त्यांना जास्त त्रास झाला. आणि शेवटी त्यांनी आपल्या मित्राला पत्र म्हणजे पक्षाच्या सुप्रिमोला पत्र लिहून  राजदमधून काढता पाय घेतला. आणि ही मैत्री कायमची संपली.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.