नुसतं युवा आमदार होवून भागणार नाही, हातकणंगलेचा हा पॅटर्न राज्यभर राबवायला पाहीजे…

अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक असो कि अमरावतीमधल्या ग्रामपंचायतीची निवडणूक एक गोष्ट कॉमन असते, प्रचार करणारे कार्यकर्ते तरणी आणि नेता मात्र म्हातारा. जगाच्या पाठीवर कुठेही जा राजकारण हे रिटायर लोकांची मोनोपॉली झालेली आहे.

कारण विचारलं तर सांगतात कि अनुभवाने केस पांढरे झाले कि मगच राजकारण कळते.

याला उत्तर म्हणून तरुण आमदारांची क्रेझ महाराष्ट्रात तरी आली. पण झालं अस की यातील बहुतांश आमदार घराणेशाहीच्या बळावरतीच पुढे आले. आत्ता निवडणूकीची प्रॅक्टिकल गोष्ट पहायची झाली तर आमदार, खासदार आणि त्यासाठी लागणारा जनसंपर्क, पैसा, हितसंबधांच राजकारण अशा अनेक गोष्टी घराणेशाहीमुळे पुरक ठरतात. त्यामुळे पक्षांचा कल देखील घराणेशाहीतली तरुण नेतृत्वाकडे झुकला…

मात्र निवडणूक आल्यानंतर या तरुण, युवा नेतृत्वांना संधी दिल्या का.. ज्या युवकांनी त्यांचा प्रचार केला त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं का?

याच उत्तर आपणाला हातकणंगले विधानसभेच्या मतदारसंघात मिळतं.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. केंद्रात व राज्यात असलेल्या लाटेमुळे काँग्रेसला यावेळची निवडणूक जड जाणार असं बोललं जात होतं. अशातच हातकणंगलेच्या विधानसभेमध्ये गेली दहा वर्षे शिवसेनेची सत्ता होती. मात्र राजूबाबा आवळे यांनी हा मतदारसंघ चुरशीने खेचून आणला.

राजू आवळे पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आले असले तरी हातकणंगले वडगाव परिसरात आवळे घराण्याचे कार्य गेली अनेक वर्षे तळागाळात पोहचले आहे. राजू आवळे यांचे वडील जयवंतराव आवळे हे काँग्रेस पक्षातले दिग्गज नेते. विलासराव देशमुख यांच्या विश्वासामुळे त्यांनी कोल्हापुरातून जाऊन थेट लातूरमध्ये खासदारकी जिंकण्याचा पराक्रम केला होता. राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून देखील त्यांनी चमकदार कामगिरी केली होती.

जयवंतराव आवळे यांनी पंचवीस वर्षे पूर्वाश्रमीच्या वडगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले असल्यामुळे सहाजिकच या भागात त्यांचे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. पण मधल्या पंधरा वर्षांच्या काळात सत्ता नसल्यामुळे कट्टर कार्यकर्त्यांना सुस्ती आली होती..

राजू आवळे यांनी हे चित्र बदलायचं ठरवलं.      

सर्वसामान्य कार्यकर्ते ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करत असतात, त्यांच्या मेहनतीमुळे नेते निवडणुका जिंकतात पण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांना कोणत्याही पदावर फारशी संधी मिळत नाही. आवळे यांनी अशा कार्यकर्त्यांना पदांवर जाण्याची संधी दिली.

वडगाव कृषी उत्त्पन बाजार समिचीच्या प्रशासक मंडळच्या निवडीत सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना प्रशासक मंडळावर नियुक्ती केली. चेतन चव्हाण प्रशासक तर भैरू पवार, अनिल जामदार यांच्या सारख्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली.  यापैकी अनेकांनी आपण बाजार समितीवर कधी संचालक म्हणून जावू याचा विचार देखील केली नव्हता.

पण आमदार राजू आवळे यांनी प्रमुख नेते मंडळींकडे याच कार्यकर्त्यांचा आग्रह धरून त्यांनी संधी दिली.

या कृतीकार्यक्रमामुळे “पोरखेळ” म्हणून टिकाही करण्यात आली. पण दूसरीकडे तरुणांना काहीतरी पदे मिळत आहे हे दिसू प्रत्यक्षात घडू लागलं. आमदार निष्ठावंत तरुण कार्यकर्त्यांना संधी देतात म्हंटल्यावर १५ वर्षे काहीसे शिथिल झालेले कार्यकर्ते नवा जोमाने कामाला लागले.

बाजार समितीच्या चेअरमनपदी तरुण कार्यकर्त्याला संधी देवून तर आवळे यांनी अनेकांना धक्काच दिला.

नाराज झालेल्या काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी राजूबाबांनी पोरखेळ चालवला आहे अशी टीका केली. पण आवळे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व तरुणांना संधी देत राहिले. बाजार समितीप्रमाणे संजय गांधी निराधार समितीत देखील वडगाव शहराध्यक्ष असलेल्या सचिन चव्हाण या तरुणाला सदस्य म्हणून संधी दिली. त्याचप्रमाणे गोरगरीबांची कामे विनाअडचणीचे झटपट व्हावी म्हणून अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवले.

त्याचा परिणाम असा झाला की गेल्या दोन वर्षांत हातकणंगले संजय गांधी योजनेत तब्बल २००० हजारपेक्षा जास्त प्रकरणे मंजूर झाली आहेत. पहिल्याच बैठकीत विक्रमी ४०९ प्रस्ताव मंजूर करून त्यांनी आपल्या कामाची प्रचिती दाखवली आहे.

गेल्या वर्षात हातकणंगले शहराला पहिल्यांदा नगरपंचायत मंजूर झाली. आमदार झाल्यानंतर दोन महिन्यातच ही निवडणूक लागली होती. या निवडणुकीत देखील आमदार राजू आवळे यांनी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि तरुणांना संधी द्यायचे ठरवले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र ही निवडणूक लढवली. यात सामान्यातील सामान्य व सर्व जाती जमातीच्या लोकांना पक्षाची उमेदवारी दिली.

यावेळी नवख्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे फटका बसेल असा इशारा अनेकांनी दिला पण आमदार आवळे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली. न‌वे असल्याचा फटका अनेकांना बसला. या निवडणुकीती लोकनियुक्त नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला पण फक्त दोन नगरसेवक निवडून आले.

मात्र राजू आवळे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास तरुणांना किती तरी मोठे बळ देवून गेला. या पॅटर्नमुळे युवकांना संधी मिळू लागली. घराणेशाहीचा फायदा की तोटा हा नंतरचा विषय पण किमान जो व्यक्ती घराणेशाहीतून निवडून येतो त्यांने मोठ्या मनाने सर्वसामान्य घरातील युवकांच्या मागे उभारण्याची गरज आहे. म्हणूनच राजू आवळेंची ही कृती नक्कीत कौतुकास्पद आहे अस म्हणावं लागेल…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.