युपीमधील धर्मांतर प्रकरण काय आहे ज्याचं कनेक्शन आता विदर्भ, मराठवाड्यात सापडलंय.
गेल्या बऱ्याच काळापासून आपण उत्तर प्रदेशमधील कथित धर्मांतर प्रकरण ऐकत येतोय. हे प्रकरण पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे कारण आता या धर्मांतर प्रकरणाचं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचं कनेक्शन बाहेर येत आहेत. त्यात बीड, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असल्याची सद्याच्या तपासात बाहेर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
त्यात बीड च्या परळीमधील शिरसाळा नावाच्या गावाच्या इरफान शेख नावाच्या तरुणाला अटक झाली आहे.
धर्मांतरासारख्या गंभीर केस मध्ये मराठवाड्यातला एक तरुण सापडला त्यामुळे मराठवाड्यात सगळीकडेच पुन्हा एकदा दहशतवादी चळवळ आपले पाय पसरत आहे की काय अशी भीती व्यक्त केली जाते. अगोदर नाशिक त्यानंतर यवतमाळ आणि आता बीड मध्ये एकएक संशयीत आरोपी तपासादरम्यान समोर येत आहेत. तपासामध्ये आणखी कोणती आणि कुठले नावं समोर येतात हे पाहूया..
नक्की हे धर्मांतर प्रकरण आहे तरी काय?
उत्तर प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास १ हजार नागरिकांचं धर्मांतर करण्यात एक रॅकेट सक्रीय असल्याचे उघड झाले आणि हळूहळू या रॅकेटचे एकएक धागेदोरे उलगडत चालले आहेत. तसेच हे रॅकेट धर्मांतर करत असताना वेगवेगळी थेअरी वापरत असल्याचे देखील म्हणलं जातंय.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी आतिफ हा कुणाल अशोक चौधरी या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला असल्याची माहिती समोर आली आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलं गेलं. मोहम्मद शरीफ कुरैशी व मोहम्मद इदरीलला या दोघांना देखील ताब्यात घेतलं. आतिफच्या स्थानिक नेटवर्कचा शोध घेतांना एक-एक नावं समोर येत आहेत.
उत्तर प्रदेशमधील या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक ते मराठवाडा आणि विदार्भापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे. जसं नाशिक चा आतिफ आपलं ओळख आणि नाव लपवून राहत होता तसच आणखी कोण कोण आपली ओळख लपवून कोणत्या राज्यात किती व्यक्ती राहत असतील याची शंका व्यक्त होत आहेत.
तसेच या रॅकेटसाठी फंडिंग बाहेरील देशातून होत असल्याचे समोर आलेय.
नाशिकमधून ताब्यात घेतलेल्या आतिफच्या बँक खात्यात तब्बल २० कोटी रुपये जमा केले गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे आणि तपासाला वेग आला. हि रक्कम या कथित धर्मांतर रॅकेट चालवण्यासाठीच आलेली आहे असे आरोप केले गेले आहेत. कारण यात ट्वीस्ट म्हणजे हि रक्कम कुवैतसह जगभरातल्या इतर देशांमधून ही रक्कम टाकण्यात आली आहे.
आता पुढील तपासाची योजना म्हणजे हि रक्कम कोणकोणत्या देशातून, कोणत्या बँकेतून येतेय, रक्कम पाठवणारे व्यक्ती कोण आहेत आणि कुठल्या व कोणत्या खात्यांवर हि रक्कम जमा करण्यात आली आहे. या सर्व माहितीची यादी तयार करून त्यांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच हा निधी धर्मांतरण रॅकेटसाठी वापरण्यात येणार आहे कि, इतर कोणत्या कारवायांसाठी वापरण्यात येणार आहे याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाने सुरु केल्याची माहिती मिळतेय.
जसं हे कथित धर्मांतर प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालंय तसं दहशतवाद विरोधी पथकाने देशाच्या वेगवेगळ्या भागातून आत्तापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. तपासातून हे समोर आले कि, यातले जवळपास काही लोकं वेगवेगळ्या विश्वस्थ संस्था म्हणजेच ट्रस्ट चालवत असत. मात्र या ट्रस्ट साठीचा फंड जगभरातून येत असल्याने हे प्रकरण आणखी किती गंभीर पैलू उघडकीस अन्ते याचं काहीही सांगता येत नाही.
या निधीचा कथित धर्मांतरणासाठी वापर केला जात होता. यातला एक जण जसा नाशिकमध्ये नाव बदलून राहिला होता, तसेच इतरही अनेक जण आपली ओळख लपवून रहात असल्याचे समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील इरफान शेख नावाच्या तरुणाला जून महिन्यात अटक झाली होती. त्याच्यावर आरोप असा आहे कि, इरफान मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करतो. इरफानचे शिक्षण देखील शिरसाळा गावातल्या प्राथमिक शाळेत झालं होतं यानंतर नोकरीच्या निमित्ताने तो दिल्लीत गेला होता.
तर या तपासात आणखी काय धागेदोरे समोर येतात हे पाहणे आता देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचं झालं आहे.
हे हि वाच भिडू :
- भाजप तालिबानशी तुलना करतंय पण मोपल्यांचं बंड हे RSS च्या निर्माणाचं कारण आहे.
- जगद्गुरू परमहंस हे आज जल समाधी घेणार होते त्याचं काय झालं?
- जेंव्हा शास्त्रीजींनी दुकानदाराला सांगितले की, सर्वात स्वस्त साडी दाखवा..
- महात्मा गांधींवर विषप्रयोग करण्याचा डाव इंग्रजांच्या एका आचाऱ्याने उधळून लावला होता.
- ज्या पंतप्रधानांनी अपमान करून जेआरडींना एअर इंडियामधून बाहेर काढलं ते नेहरू नव्हते..