जगद्गुरू परमहंस हे आज जल समाधी घेणार होते त्याचं काय झालं?

भारताला हिंदू राष्ट्र घोषित केलं नाही तर २ ऑक्टोबर जल समाधी घेणार आहे! असं काही दिवसांपूर्वी अयोध्याचे जगद्गुरू परमहंस म्हणाले होते. आणि आज त्यांच्या अल्टीमेटमचा शेवटचा दिवस आहे. 

जगद्गुरू परमहंस यांनी २ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच आज देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास त्यांनी जल समाधी घेणार असा इशारा देखील आहे. तसेच, केंद्र सरकारने मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे नागरिकत्व समाप्त केले पाहिजे. अशीही मागणी त्यांनी केलीय. या प्रकरणात आता हिंदू महासभा देखील उतरली आहे. परमहंस आचार्य यांना हिंदू महासभेचा पाठिंबा मिळाला आहे.

हिंदू महासभेने म्हटलेय की, २ ऑक्टोबर रोजी हिंदू महासभेचे १ लाख कार्यकर्ते अयोध्येच्या सरयू नदीत जल समाधी घेतील.

पण अयोध्या पोलीस प्रशासनाने याची खबरदारी घेतलीये कि, जलसमाधी सारख्या बेकायदेशीर घटना रोखाव्या, म्हणून त्यांनी या महाराजांना त्यांच्यात आश्रमात नजरकैदेत ठेवले आहे. परमहंसांच्या आश्रमाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केले आहेत. मात्र याचा विरोध करत परमहंसांचे समर्थकांनी गर्दी केली आहे.

परमहंसांनी असंही सांगितलं कि, पोलिसांनी मला जल समाधी घेण्यापासून थांबवलं तर माझ्याकडे प्लॅन-बी तयार आहे.

अयोध्येच्या सरयू नदीमध्ये जल समाधी घेणार आणि मला पोलिसांनी अडवलं तर मी एका गुप्त रस्त्याने देखील शरयू नदीकडे जाऊ शकतो जे पोलिसांना काय कुणालाच माहिती नाही असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. पण सध्या तरी ते नजरकैदेतच आहेत.

अशी परिस्थिती विचार करायला भाग पाडते कि, अशा मागण्यांना केंद्र सरकार काय करू शकते? लोकांच्या दैनंदिन आयुष्यात इतक्या समस्या चालू असतांना तेच सोडवता सोडवता सरकारच्या नाकी नऊ येत आहेत अन त्यात हि अशी विचित्र मागणी सरकारला करून त्यातही जल समाधीची धमकी देऊन अशा महाराजांना काय साध्य होत असते त्यांच्या मनालाच ठावूक.

जगद्गुरू परमहंस आचार्य आज जलसमाधी घेतील का? काही गोष्टी इतक्या विचित्र वाटतात कि  आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या संताने सरकारने माझ ऐकलं नाही तर मी येत्या तारखेला जल समाधी घेईन …

महाराज म्हणतात की देशाच्या अखंडतेचे आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यघटना, न्यायालये, लोकशाही आणि मानवता अशा गोष्टीच शिल्लक राहणार नाही. पण त्यांच्या संत जगद्गुरू परमहंस आचार्य यांची ही मागणी पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरणार हे तर नक्की आहे, कारण आपल्या व्यवस्थेचा पाया असलेले धर्मनिरपेक्ष संविधान आपल्या भारताला कोणत्या एका धर्माच्या चौकटीत बांधून ठेऊच शकत नाही.

अशा परिस्थितीत कोणीही विशिष्ट धर्माच्या लोकांचे नागरिकत्व संपवण्याची मागणी तर करूच शकत नाही.

आजकाल लोकं आपल्या व्यक्तिगत आयुष्यात कोणत्याही कारणावरून नैराश्येला बळी पडतात.  त्यात अशी धर्माधारित, जातीनिहाय समस्या, कलह, कटकारस्थाने ऐकून सामाजिक नैराश्य वाढविण्याची  कामं आहेत. अशा हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी करून  जगद्गुरू परमहंस सामाजिक एकतेला सुरुंग लावण्याची काम का करत आहेत ?

एखादा उद्देश साध्य करण्यासाठी पुन्हा पुन्हा आपला जीव देण्याविषयी इशारा देणे, सरकारला अडचणीत आणणे हे कितपत योग्य असू शकते?

खरं तर संत, महाराजांनी जाहीरपणे आत्महत्या प्रवृत्तींबद्दल बोलूच नये. तुम्ही तुमची मागणी मांडू शकता, तुम्ही त्यासाठी आंदोलन करू शकता, पण समाधी घेण्याची भाषा करून लोकांचे लक्ष विचलित होऊ शकते. बरेच लोक म्हणतात की ही मागणी अगदी बालिश आहे, जसं कि एखादं लहान मूल एखाद्या गोष्टी साठी आग्रह धरते आणि त्यासाठी भिंतीवर डोकं आपटून घेते तसाच काहीसा हा प्रकार दिसून येतो.

बरं त्यांनी या आधीही अनेक वेळा समाधी घेण्याचं जाहीर केलं होतं.

या महाराजांनी यापूर्वी अनेक वेळा समाधी घेण्याविषयी सांगितले आहे. मे मध्ये पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या वेळी त्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेची सजावट केली होती आणि म्हटले होते की, ‘जर पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबला नाही तर मी आत्मदहन करीन. पण त्यांनी असं काहीच केलं नाही.

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे.

हिंदू महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस देवेंद्र पांडे म्हणाले,

“हिंदू महासभेचे सुरुवातीपासूनच एकच उद्दिष्ट होते की तेही तसेच आहे. सुमारे ४ महिन्यांपूर्वी आम्ही पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की गोहत्या थांबली पाहिजे आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे.

जे लोक हिंदु राष्ट्राची चर्चा करतात, ते आरोप करत आहेत की आम्ही जातिवाद पसरवत आहोत, तर आम्ही १९४७  च्या फाळणीच्या आधारावर ते पूर्णपणे अंमलात आणण्याबद्दल बोलत आहोत. १९४७ मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा भारताचे तुकडे झाले आणि मुस्लिम राष्ट्र बनवले. तेंव्हापासूनच आमची मागणी राहिलेली आहे कि, भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.