साधू -संतांच्या सेन्सर बोर्डने हिरवा कंदील दिल्यावरच भारतात रिलीज होणार फिल्म आणि वेब सिरीज

एक ३ ते ४ दिवसांपूर्वी ‘आश्रम’ या वेब सीरिजच्या सेटवर तुफान राडा झाला. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी सेटवर येऊन सेटची तोडफोड केली आणि तिथल्या क्रूला जबरदस्त मारहाण केली. सोबतच दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. एवढंच नाही तर ही बजरंग दलाची मंडळी मेन म्हणजे अभिनेता बॉबी देओलला मारायला आली होती. पण तो काय त्यांच्या तावडीत सापडला नाही.

या वेब सीरिजबद्दल बहुतेकांना माहितीचं असेल, ही ‘आश्रम’ सिरीज लोकांचे शोषण करणाऱ्या धर्मगुरूवर अर्थात बाबा-बुवांवर आधारित आहे.

आता हा राडा कशामुळं झाला तर वेब सीरिजच्या ‘आश्रम’ या नावावरून. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हंटल कि,

“आश्रम ही वेबसिरीज हिंदुत्वाचा अपमान आहे. यातून हिंदू धर्माविरोधात गैरसमज पसरवल्याचं काम केलं जातंय आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातायेत. अशा परिस्थितीत जोपर्यंत या सीरिजचे नाव बदलले जात नाही तोपर्यंत सिरीज पुन्हा शूट करू देणार नाही.”

आता तसं पाहायचं झालं, तर आश्रम या वेब सीरीजचा हा तिसरा पार्ट आहे. या आधीही या सीरिजचे नाव आश्रमचं होते. पण त्यावेळी नावावरून काही राडा झाला नव्हता. आधी या सिरीजमधल्या कन्टेन्टवरून हा राडा झाला होता. आश्रमा सीरिजमध्ये धार्मिक गुरू आणि संतांची चुकीची प्रतिमा मांडली जात असल्याचा आरोप केला गेला. पण एवढा मोठा राडा काय झाला नव्हता.

मात्र पार तिसऱ्या सिजनच्या वेळेस या कार्यकर्त्यांनी वेब सीरिजच्या नावावरचं आक्षेप घेतला. आणि त्यांनतर २४ ऑक्टोबरला झालेला प्रकार सगळ्यांनीच पाहिला.

या राड्यानंतर काही वेळातच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे स्टेटमेंट आले. त्यांनी मालिकेचे नाव बदलण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

बजरंग दलाचे प्रांतीय संयोजक सुशील सुदेले यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हंटले कि,

प्रकाश झा यांना मालिकेचे नाव बदलावेचं लागेल. तसे न केल्यास शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. इतकंच नाही तर सीरिज रिलीज सुद्धा होऊ देणार नाही.

दरम्यान, प्रकाश झा यांनी नाव बदलण्याचे आश्वासन दिल्याचेही सुशील यांनी सांगितले.

आता या सगळ्या राजकारण तर येणारचं.

तर भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या सगळ्या प्रकरणावर पार भडकल्या. फिल्म आणि वेब सिरीज हिंदूंच्या भावना दुखावत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोबतच प्रज्ञा ठाकूर यांनी डायरेक्ट साधू संतांचं स्पेशल सेन्सॉर बोर्ड तयार करणार असल्याचं म्हंटल. ज्यांच्या परमिशन शिवाय कुठलीच वेब सिरीज आणि फिल्म रिलीज होणार नाही.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या कि,

“मी फक्त एकच सांगते की, साधू-संत कधीच पिक्चर बघत नाहीत. आता आम्हाला एक डिपार्टमेंट तयार करावं लागेल. भारत भक्ती आखाडा हा डिपार्टमेंट तयार करेल. कोणताही पिक्चर किंवा सिरीज रिलीज होण्यापूर्वी तिथे पहिला जाईल. त्यानंतरच ते रिलीज होईल. हे काम संपूर्ण कायदेशीर विधीमंडळाच्या माध्यमातून केले जाईल. अन्यथा मी सेन्सॉर बोर्डावर कारवाई करेन. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.”

एवढचं नाही त्या पुढे म्हणाल्या कि, “आम्ही आधी कोणत्याही चित्रपट किंवा सिरींजची स्क्रिप्ट वाचू, मगचं ते बनवायला परवानगी देऊ. अन्यथा चित्रपट होऊ देणार नाही. हिंदूंच्या भावना दुखावणारा असा कोणताही चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केल्यास मी सेन्सॉर बोर्डात बसलेल्या लोकांवर कारवाई करेन. “

प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी त्यांचे नाव न घेता याला फॅसिझम म्हटले आहे. याप्रकरणी वेब सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या गप्प बसण्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या स्टेटमेंटनंतर ते जवळपास कायदा हातात घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. मात्र तसं होणार नाही कारण साधू-संतांच्या संघटनेला चित्रपटांच्या स्क्रिप्टवर ठेवण्याचा अधिकार नाही. तयासाठी कायदेशीर सेन्सॉर बोर्ड आहे.

पण जर प्रज्ञा ठाकूर आणि त्यांच्या भारतीय आखाड्यानं जर सेन्सॉर बोर्ड तयार केल्याची कल्पना केली, तर मुख्य सेन्सॉर बोर्डची काही भूमिकाच राहणार नाही. आणि देशात कित्येक साधू- संतांच्या संस्था आणि आखाडे आहेत. मग ते सुद्धा ही मागणी लावून धरतील.

आणि महत्वाचं म्हणजे देशात अनेक जाती- धर्माचे लोक आहे, त्यांच्या धर्माशी संबंधित संघटना आहेत. आता प्रत्यक्ष धर्माच्या संघटनांनी हीच मागणी केली. तर लोकांना मनोरंजन काय असत हेच विसरायला लागलं.

हे ही वाचं भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.