नवाब मलिक म्हणाले तसं ‘समीर वानखेडेंची उलटी गिनती चालू झाली काय ?

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोजच नवे-नवे खुलासे बाहेर पडत होते. पण आता आर्यन जेल मधून बाहेर पडला अन तिकडे ‘मन्नत’ मध्ये जाऊन त्याने दिवाळीचा फराळ पण खाल्ला असेल पण इथे लोकांचे ‘सामजिक’ दिवाळे निघाले त्याचं काय ?

एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचीचे प्रमुख विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच लावली होती त्यात समीर वानखेडेला अडचणीत आणणारे मुद्दे हि तसेच बाहेर पडतायेत…मग ते कितपत खोटे असोत कि, खरे असोत त्याची चौकशी सुरुये आणि एक-एक गोष्टी समोर येतायेत.

या प्रकरणात एनसीसीबीचा मुख्य साक्षीदार असणारा किरण किरण गोसावी याने केलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांची चौकशी सुरु झाली आहे..आणि त्यातून च एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे,

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आली. 

हो ….मोठीच गोष्ट म्हणायला लागेल,आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. 

त्यांच्या झोनमधील एकूण ६ प्रकरणांची दिल्ली एनसीबीकडून चौकशी केली जाईल, ज्यात आर्यन खानच्या प्रकरणाचा समावेश आहे. तो प्रशासकीय निर्णय आहे. आमच्या झोनमधील एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्ली संघांकडून (NCB) केली जाईल, ज्यात आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. 

हा प्रशासकीय निर्णय होता, असे उपमहानिदेशक, दक्षिण-पश्चिम क्षेत्र, एनसीबी मुथा अशोक जैन यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

पण आता समीर वानखेडे याचं म्हणन आहे कि, मला त्या चौकशीतून काढून टाकण्यात आलेले नाही. उलट मीच हा तपास सोडलेला आहे. 

या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. दिल्ली आणि मुंबईच्या NCB पथकाचा समन्वय आहे.

समीर वानखेडे यांच्याकडील तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. समीर वानखेडे यांच्याकडून पाच प्रकरणांचा तपास काढून घेतला असला तरी एकूण २६ प्रकरणांची चौकशी आवश्यक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच  या  कारवाईवरच प्रश्न उपस्थित करत आलेत. नवाब मलिक यांनी सातत्याने काही दिवस पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उभे केले होते. मग एकएक करत मलिक यांनी वानखेडे यांचे इतर धागेदोरे समोर आणते गेले..

त्याशिवाय समीर वानखेडे यांनी अवैध मार्गाने सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या लाइफस्टाइलवरही नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते.

ते असंही म्हणाले कि, ही तर सुरुवात आहे…अजून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले.

या प्रकरणात एनसीसीबीचा मुख्य साक्षीदार असणारा किरण गोसावी हा सर्वाधिक चर्चेत आला होता. एनसीबीच्या अधिकाऱ्या ऐवजी किरण गोसावी याने आर्यन खानला पकडून एनसीबीच्या कार्यालयात आणले होते. आणि त्यानंतर सेल्फी काढून तो फोटो व्हायरल केला होता.

यावर एनसीबीने किरण गोसावी हा आपला अधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. इथून पुढे खऱ्या वादाला सुरुवात झाली.

तसेच किरण गोसावी हा पुण्यातील एका गुन्हात पाहिजे असलेला आरोपी असल्याचे समोर आले होते. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस सुद्धा काढण्यात आली आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीचा आपण बॉडीगार्ड असल्याचा दावा प्रभाकर साईल याने केला आहे. आपण किरण गोसावीकडे जुलै महिनापासून कामाला असल्याचे प्रभाकर साईल सांगितले आहे.

प्रभाकर साईल समीर वानखेडे यांच्यावर काय आरोप केले आहेत? ज्यामुळे समीर वानखेडे यांची चौकशी होतेय…

ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केली, त्यात १८ कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे.  प्रभाकर साईलने असे सांगितले की, एनसीबी रेडचे पंच क्रमांक १ म्हणून प्रभाकर साईल याची पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटवर बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.

क्रुझवरील ड्रग्स पार्टीनंतर एनसीबीनी केलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ताब्यात घेण्यात आले होते. ही कारवाई करतांना एनसीबीच्या कार्यालयात अधिकाऱ्या ऐवजी किरण गोसावी हा आर्यन सोबत उपस्थित असल्याचे फोटोवरून दिसून आले होते. याच वेळी प्रभाकर साईलने साईल यांनी गोसावीचा चोरून लपून एक व्हिडीओ शूट केला आहे. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय.

हा फोन शाहरुख खानाला लावण्यात आला होता आणि यावेळी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावर १८ कोटींवर हे डील झाले. हे सर्व संभाषण मी ऐकल ऐकलं असून त्यात समीर वानखेडेंना ८ कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईल यांनी केला आहे. हे सगळं झालं पण आता समीर वानखेडे यांची चौकशी चालू झाली आणि याच चौकशीदरम्यान समीर यांच्यावर काही कारवाईसदृश्य निर्णय समोर आलेत….ते म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आली. 

त्यात भाजप सरकार मधील गृहमंत्री अमित शहा सुद्धा आर्यन खान प्रकरणाच्या चौकशी गृह मंत्रालयाला अंधारात ठेवून केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यात नवाब मलिक यांनी काही काळापूर्वी असं जाहीरपणे इशारा दिला होता कि, एका वर्षांत आम्ही समीर वानखेडे यांना घरी पाठवतो….आणि तितक्यात हा समीर वानखडे यांच्याकडून तपास काढून घेल्याची बातमी कशाचे संकेत देतेय ?  

नवाब मलिक म्हणाले तसं ‘समीर वानखेडेंची उलटी गिनती चालू झाली काय ?

 हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.