सम्राट अशोकाने अफगाणिस्तानातल्या पहाडांवर आपला फर्मान कोरून ठेवलाय ..

कंदाहार अफगाणिस्तानातलं दुसरं मोठ शहर. ज्याला तालिबानची राजधानी असही म्हंटलं जातं. दरम्यान कंदाहार खास करून ओळखलं जातं ते प्राचीन भारताशी संबंधित असणाऱ्या शिलालेखासाठी.

विशेष म्हणजे या शिलालेखांपैकी एक शिलालेख सम्राट अशोकाचा सर्वात जुना शिलालेख आहे.

तिसरा मौर्य शासक अशोक हा मौर्य घराण्याचा सर्वात शक्तिशाली राजा होता. सुमारे २७३ बीसी ते २३६ बीसी पर्यंत त्याच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याची भरभराट झाली. दक्षिणेकडील प्रदेश वगळता जवळजवळ संपूर्ण उपखंडात त्याचे साम्राज्य पसरले.

कलिंग युद्ध अशोकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण होते. या युद्धापूर्वी अशोक एक क्रूर शासक असायचा, ज्याला आपले साम्राज्य दूरवर पसरवायचे होते. युद्धातील रक्तपात पाहिल्यानंतर अशोकला त्याच्या कृत्याबद्दल खूप वाईट वाटले आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याने त्याच्या साम्राज्यात धम्माचा संदेश पसरवण्यासाठी शिलालेख लिहून घेतले. अशोकाने सुमारे तीस शिलालेख लिहिले होते. हे शिलालेख बलाढ्य सम्राटाच्या इतिहासाची माहिती देतात.

अशोकने खूप डोकं लावून त्याचे सर्व शिलालेख केवळ त्याच्या राजधानीतच नव्हे तर त्याच्या राज्याच्या सीमेपलीकडे व्यापारी मार्गांवर आणि पवित्र तीर्थक्षेत्रांवर लिहिले होते, जेणेकरून त्याचा संदेश केवळ त्याच्या प्रजेपर्यंतच नाही तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आज हे शिलालेख भारतीय उपखंडात सगळीकडं आढळतात. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे कंदाहार.

तर, कंदाहार हा प्राचीन काळाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रदेश आहे. दक्षिण अफगाणिस्तानमधील सध्याच्या कंदाहार शहराजवळ जुना कंदाहार आहे. प्राचीन काळी याला अलेक्झांड्रिया अराकोसिया म्हटले जायचे. महान ग्रीक शासक सिकंदरने बांधलेल्या किंवा पुन्हा स्थापित केलेल्या अनेक शहरांपैकी हे एक. त्यांना अलेक्झांडरचे नाव देण्यात आले.

या ऐतिहासिक शहराची स्थापना इ.स.पूर्व ३३० च्या आसपास झाली. ज्यावर नंतर अनेक राजवंशांनी राज्य केले. कंदाहार हे त्याच्या भौगोलिक स्थानामुळे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने सर्व राजवंशांना ते काबीज करायचे होते. त्यामुळे अशोकाने आपले शिलालेख या भागात लिहायचे ठरवले.

दरम्यान, अशोकाचे सुरुवातीचे शिलालेख खूप नंतर सापडले. अशोकचे सर्वात जुने शिलालेख १९५८ मध्ये जुन्या कंदाहारमधील चेहेल टेकडीवरील एका खडकावर सापडले. यांनतर फ्रेंच आणि इटालियन विद्वानांनी या शिलालेखाचा अभ्यास केला.

अशोकाच्या अनेक शिलालेखांपैकी हा कदाचित सर्वात अनोखा शिलालेख आहे. कारण त्याचे बहुतेक शिलालेख प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिले गेले होते, परंतु हा शिलालेख शास्त्रीय युनानी आणि इब्रानी (सीरियन भाषा) मध्ये लिहिलेला होता.

‘कंदाहार द्विभाषिक शिलालेख’ म्हणून ओळखला जाणारा खडकावरचा हा शिलालेख प्रत्यक्षात अशोकाचा सर्वात जुना शिलालेख आहे. त्याच्या शासनकाळात लिहिलेला हा फरमान यूनानवादी जगासोबत त्याच्या  साम्राज्याच्या सीमेवर लिहिलेला होता. हे अशोकाच्या छोट्या खडकांवर लिहिलेल्या फर्मानांपैकी एक मानला जातो.

लहान खडकांवर लिहिलेली अशोकाची फर्मान त्याची सुरुवातीची फरमानं मानली जातात तर त्यानंतरची फरमानं मोठ्या खडकांवर आणि खांबांवर लिहिलेली होती.

कंदाहारमध्ये सापडलेला छोटा फरमान हा भारतीय उपखंडात सापडलेल्या इतर सर्व किरकोळ फरमानांच्या आधीचा आहे. जरी या फरमानांचा विषय वेगळ्या ठिकाणी बदलत असला तरी त्यापैकी बऱ्याच शिलालेखात धर्माबद्दल बोललं गेलेय. अशोकाने आपला धर्म संदेश पसरवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती.

शिलालेखाचा यूनानी भाग बहुधा त्याच्या युनानी (यवन) प्रजेसाठी होता. हिब्रू भाषा ही पर्शिया (इराणी) सरकारची भाषा होती आणि फरमानचा हा भाग मौर्य साम्राज्याच्या उत्तर-पश्चिम भागातील कंबोजांसाठी लिहिला गेला असावा.

हा फरमान जरी लहान असला तरी अशोकच्या विचारसरणीत बदल स्पष्टपणे दाखवतो. त्यात म्हटलेय की, कश्याप्रकारे अशोकाने कोणत्याही जीवाच्या हत्येला मनाई केली होती. ज्यानंतर शिकारी आणि मच्छीमारांनी शिकार सोडली आणि ते चांगल्या मार्गावर गेले.

सम्राट अशोक आपल्या राज्याभिषेकानंतर लोकांना भक्तीचा संदेश द्यायला लागले. तेव्हापासून त्यांनी लोकांना अधिक धार्मिक बनवले.

विशेष म्हणजे अशोकाची शक्तीचा अंदाज  शिलालेखातील इब्रानी भागावरूनलावता येतो.  ज्यावर “आमचे प्रभु, प्रियदर्शी (अशोक)” असे लिहिलेले आहे.

द्विभाषिक फरमानपासून काही किलोमीटर अंतरावर, जवळजवळ एक दशकानंतर १९६४ मध्ये, अशोकचा दुसरा शिलालेख सापडला, जो अशोकाचा “कंदाहार-यूनानी फरमान” म्हणून ओळखला जातो. हे शिलालेख खडकांवर लिहिलेल्या अशोकच्या मुख्य शिलालेखांपैकी एक आहेत.

खडकांवर एकूण १४ फरमान लिहिले गेले. हे प्रामुख्याने प्रवचन आणि घोषणा आहेत, ज्यामध्ये त्याच्या वारसांना आणि अधिकाऱ्यांना राज्याचे कामकाज चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सम्राट अशोकाचा सर्वोत्तम संरक्षित शिलालेख उत्तराखंडातील कलसी आणि गुजरातमधील गिरनार येथे आहेत. फरमान क्रमांक १२  मध्ये नैतिक वर्तनाचा उल्लेख आहे, तर फरमान क्रमांक १३ कलिंग युद्धातील रक्तपाताबद्दल सांगतो. ज्यात कलिंग युद्धात हजारो लोकांना कैद किंवा मारण्यात आले आणि अशोकाने या युद्धामुळे धम्माच्या (धर्माच्या) मार्गावर कशी वाटचाल केली याचे वर्णन आहे.

इतिहासकार आणि अभिलेखागार डी.सी. सरकारचा विश्वास आहे की, युनानी आवृत्तीसह फरमानची एक इब्रानी आवृत्तीही असेल. द्विभाषिक शिलालेख काबूल संग्रहालयात ठेवले होते.

दरम्यान, १९९२-९४  मध्ये संग्रहालयात चोरी झाली, ज्यानंतर ते आता कुठे आहेत याबद्दल कोणतीही माहिती नाही.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.