90’s च्या पोरांना खुळ करून सोडणारी सविता भाभी एका भिडूच्या डोक्यातली सुपीक कल्पना होती.

सिनेमा सुरु आहे .. सविता भाभीचा सीन सुरु आहे..

रात्रीच चांदणं पडलं आहे. सविता भाभी आतिषला बिलगून स्कुटरवर बसली आहे. आपल्या प्रेमभरल्या आवाजात ती त्याला विचारते आहे..

में वहा आकर अपनी इमेज गवा दूंगी, अपनी मिस्ट्री गवा दूंगी.. तुम क्या गवाओगे??

आतिष उत्तरतोय – व्हर्जिनिटी..

पाटी पडते अश्लील उद्योग मित्र मंडळाच्या नावाने.. आणि अचानक मधूनच बॅकग्राऊंडला गाणं सुरु झालंय..

जोबनवा म्हारा फ़ायर है

जो टच ना करे वो कायर है।

जो इस पे ना अट्टरॅक्ट हुआ।

वो अव्वल दरजे का लायर है …

सविता भाभी जशी आपल्या गोड आवाजाने आतिषला घायाळ करते. अगदी तसच ती रोज हजारो पुरुषांना आपल्या मदमस्त आवाजाने घायाळ करत आली आहे. ती रोज स्वप्नात येते पुरुषांच्या. फोन वर गप्पा मारते. आपल्या जीवनातल्या दुःखाच्या आनंदाच्या गोष्टी ती सांगते. मात्र ती समोर कधी येत नाही.

सविता भाभी असंख्य पुरुषांसाठी एक मिस्ट्री आहे. काहींसाठी ‘सविता भाभी’ गुप्तपणे विकल जाणार छापील पुस्तक आहे. तर काहींसाठी ती इनकॉग्निटो मोडवर किंवा प्रॉक्सी साइटवर बघितली जाणारी वेबसाइट आहे. सविता भाभी ओटीटी इरोटिकाचे भव्यदिव्य जग आहे.

अशाच तुमच्या आवडीच्या सविता भाभीचा इतिहास ऐकायची प्रत्येक रांगड्या पुरुषाची इच्छा आहे म्हणूनच…

खरं तर सविता भाभी या एक पोर्नोग्राफीक कार्टून कॅरेक्टर आहेत. हे सविता भाभीचा कॉमिक्स किर्तु नावाचं पब्लिकेशन हाऊस काढत होत. ही सविता भाभी गृहिणी असते. तिचा बिचारीचा नवरा अशोक तिच्याकडे लक्षच देत नसतो. नवरा लक्ष देत नसल्याने सविता भाभी सैरभैर होत असते. आणि ती अशी अश्लील वागू लागते. 

मग तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाची गोष्ट हे कॉमिक बुक तुम्हाला रंगवून सांगत. ज्या सविता भाभीच्या गोष्टी ऐकून तुम्ही उत्तेजित होता तिच्या माग डोकं एका भिडूच होत. 

या गड्याचं नाव सुमित कुमार. हा सुमित दिल्लीचा. शाळेत यथातथाच असणारा हा सुमित मोठा होऊन कम्युटर इंजिनिअर बनला. ह्या पोराने २३ वर्षांचा असताना एक पराक्रम सुरु केला. कोणालाच माहित पडू नये असा. पण हा पराक्रम बाहेर आला आणि ह्या पोराने अटकेच्या भीतीने सगळंच सांगून टाकलं. 

त्याचा पराक्रम होता सविता भाभी. कम्युप्टर इंजिनिअर असणाऱ्या या सुमीतच डोकं कम्युप्टर मध्ये कमी आणि सेक्स स्टोरी लिहिण्यामध्ये जास्त चालत होत. तो मिडल क्लास फॅमिली मध्ये जन्मला पण त्याला मिडल क्लास आयुष्य जगायचंच नव्हतं. आजपर्यंत चोरून चोरून ज्या गोष्टी वाचून हा मोठा झाला त्या गोष्टी त्याने कॉमिक्स मध्ये आणायच्या ठरवल्या. पण त्याचे हे कांड चोरून चोरूनच सुरु होते. 

पुढे सविता भाभीच्या इरॉटिक गोष्टी बाजारात सरार्स खपू लागल्या. खप वाढायला लागला तसा काही संघटना, लोक यांच्या डोळ्यावर या गोष्टी आल्या. कारण कसंय ना, भाभी हा उत्तरेकडील भागात प्रतिष्ठित शब्द होता. आणि सविता भाभी मुळे या शब्दाला पॉर्नचं वलय मिळाल. लोक चिडली. काहींनी या कॉमिक्स वर बॅन यावा म्हणून पोलीस कम्प्लेंट टाकल्या. पोलीस शोधायला लागले आणि मग सुमित कुमार स्वतःहून बाहेर आला. आणि त्याने सगळ्या जगात आपलं सविता भाभींविषयीच प्रेम व्यक्त करून टाकलं. 

तो म्हंटला,  

“I am grateful for what Bhabhi has done for me and I don’t care whether I get into trouble for coming out and openly saying that I have anything to do with her.” 

आणि आज हा सुमित सगळ्या देशात स्पीच देत फिरत असतो. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.