माधुरी दीक्षितचं शूटिंग होणारं घर शाहरुखने प्रचंड खस्ता खाऊन विकत घेतलं, तेच ते ‘मन्नत.’

‘मन्नत’, लँड्स एंड, बँडस्टँड, वांद्रे (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र – ४०००५०, भारत. हा पत्ता कुणाला माहिती नाही असा कुणी बॉलीवूड फॅन सापडणार नाही…

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘फौजी’ या मालिकेतून अभिनयाचा प्रवास सुरू केला. त्याची पहिली कमाई होती ५० रुपये इतकी…आणि आजचं बोलायचं तर शाहरुख हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. आजच्या काळात शाहरुख खान करोडच्या खाली कोणताही प्रोजेक्ट घेत नाही. एवढेच नाही तर शाहरुख अशा काही वस्तूंचा आणि वास्तूंचा मालक आहे ज्यांची किंमत १०० कोटींपेक्षा हि जास्त आहे…त्यातलंच एक म्हणजे त्याचा मन्नत बंगला !

शाहरुख खानचे नाव घेतले कि, त्याच्या ‘मन्नत’चा हमखास उल्लेख येतोच येतो.  मुंबई दर्शनाला गेलेला प्रत्येक व्यक्ती मग तो शाहरुख खानचा फॅन असो नसो ‘मन्नत’ समोर फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवरत नसतो.  त्याच्या मन्नत च्या आसपास कधीही पाहिलं तर दिसून येतं कि, शाहरुखच्या घरासमोर जवळपास त्याच्या १०० चाहत्यांची गर्दी असतेच असते. मुंबईतील वांद्रेला असलेला हा मन्नत बंगला कुणालाही हेवा वाटावा असाच आहे. वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड येथे ६ मजली उंच, सी फेसिंग असलेली हेरिटेज इमारत एका पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही.

दररोज शेकडो लोक त्यांच्या आवडत्या बॉलीवूड स्टारची झलक पाहण्याच्या आशेने घराला भेट देतात.

पण या मन्नत चा इतिहास माहितीये का तुम्हांला ?

मन्नतचे पूर्वीचे नाव ‘व्हिला व्हिएन्ना’ होते….

हा आलिशान बंगला शाहरुखने २००१ मध्ये खरेदी केला होता. शाहरुखने विकत घेण्याच्या आधी त्याचे नाव व्हिला व्हिएन्ना होते. २००५  मध्ये ते बदलून ‘मन्नत’ करण्यात आले.

शाहरुख खानने नरिमन दुबाशकडून १३.३२ कोटींना हे घर विकत घेतले आहे. आजच्या काळात त्याची किंमत सुमारे २०० कोटी आहे. असे म्हटले जाते की शाहरुख खानला दुबाशला घर विकण्यासाठी खूप मनवावे लागले होते. कारण शाहरुखचे स्थान, क्षेत्र इत्यादीमुळे शाहरुख हे घर विकत घेण्यासाठी खूप उत्सुक होता.

पण या बंगल्याचे मूळ मालकाचे नाव केकू गांधी होते जी कि, ते गुजराती वंशाचे पारशी व्यक्ती होते. केकू जी एक प्रसिद्ध कारागीर आणि गॅलरिस्ट होते. ‘व्हिला व्हिएन्ना’च्या शेजारी असलेली इमारत, ज्याला ‘केकी मंझिल’ असे नाव देण्यात आले होते, तीही त्यांच्याच मालकाची होती. केकूजींचे आजोबा माणेकजी बाटलीवाला ‘केकी मंझिल’मध्ये राहत होते. त्यांची मुलगी म्हणजेच केकू गांधींची आई व्हिला व्हिएन्ना उर्फ ​​मन्नत येथे राहत होती.

हे घर बऱ्याचदा शूटिंग साठी वापरण्यात येई. तेजाब सिनेमात माधुरी दीक्षितच घर म्हणून याच बंगल्याचा वापर करण्यात आलाय.

https://www.youtube.com/watch?v=sOGWtJt6I0Q

शाहरुखने हे घर विकत घेतल्यानंतर सुरुवातीला शाहरुखला आपल्या नवीन घराचे नाव ‘जन्नत’ ठेवायचे होते, पण एकदा घर विकत घेतल्यावर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, म्हणून त्याने आपल्या घराचे नाव ‘मन्नत’ ठेवले.

मन्नत हवेलीच्या आत क्लासिकल डिझाईन असल्या तरी, हवेलीच्या आतील भाग अतिशय आधुनिक पद्धतीचे आणि स्टायलिश आहेत, तसेच जगभरातील कलाकृतींनी सुशोभित केलेले आहेत. घराच्या मागच्या बाजूला एक विस्तारित दुसरी विंग आहे ज्यामध्ये बैठकीसाठी एक पॉश लाउंज आहे, एक मोठे  स्वयंपाकघर, मिस्टर खानची ऑफिसेस आणि स्टुडिओ तसेच एक मोठी सुसज्ज जिम आहे.

या बंगल्याचे मजेदार तथ्य म्हणजे, भारतीय घराचा सरासरी आकार किती आहे? नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या मते, ग्रामीण भागात ४९४ चौरस फूट, किंवा प्रति व्यक्ती १०३ चौरस फूट, आणि शहरी भागात ५०४ चौरस फूट, किंवा प्रति व्यक्ती ११७ चौरस फूट असते.

म्हणजेच मन्नत चा आकार पाहता एकट्या मन्नतमध्ये ते २२५ लोकं आरामांत राहू शकतात. सलमान खानने खुलासा केला होता की मन्नत हा त्याचा म्हणजेच सलमान खानचा असू शकला असता पण त्याचे वडील म्हणजेच सलीम खान यांनी हा बंगला विकत घेण्यासाठी नकार दिला होता कारण तो  खूपच मोठा असल्याने एवढं मोठं घर घेऊन काय करायचं म्हणून त्यांनी हे विकत घेण्यासाठी मान्यता दिली नव्हती..

आणि म्हणूनच सलमान खान कुठेही शाहरुख ला प्रश्न करतो कि, “इतने बडे घर में करोगे क्या?” यावर  हाच प्रश्न शाहरुख खानला विचारायचा कि, “तू इतने बडे घर में करता क्या है?” म्हणजेच सलमान खान चे घर देखील दिसायला जरी साधारण दिसत असेल तरी बरेच मोठे आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.