ही यादी पहा आणि मगच शाहूमहाराजांवर ब्राह्मणद्वेषाचे आरोप करा

शाहू महाराज ब्राह्मणद्वेषी होते. एक मित्र आपल्या वाॅट्सएपच्या ज्ञानावर शाहू महाराजांना ब्राह्मणद्वेषी ठरवत होता.

शाहू महाराज निश्चितच ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते. मुठभर सनातनी लोकांनी जो अहंकार जपला होता त्याला पायदळी तुडवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. महाराजांच्या या कृतीमुळे जातीचा अभिनिवेष बाळगळणारी सनातनी मंडळी महाराजांच्या विरोधात गेली.

ही मुठभर मंडळी म्हणजे संपुर्ण ब्राह्मण समाज नव्हता हे ध्यानात घ्यायला हवं.

ब्राह्मण्यशाहीच्या विरोधात शिंग फुंकले असले तरी महाराज व ब्राह्मण जातीच्या व्यक्तींचे संबंध कसे होते हे पाहण्यासाठी या यादीवरून एकदा नजर घालावी.

१) नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे व समाजसुधारक आगरकर यांच्याविषयी महाराजां खूप आदर होता. गोखले व रानडे यांच्याकडून मागासलेल्या लोकांमध्ये शिक्षणप्रसार करण्याचे कार्य मी शिकलो, असे महाराज म्हणत.

२) गोपाळ गणेश आगरकर यांचे सुधारक पत्रक आर्थिक अडचणीत सापडले त्यावेळी या पत्रकाचे संपादक व्ही.आर. जोशी यांना पैशाची मदत करून ते वृत्तपत्र वाचवले.

३) कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले हे शाहू महाराजांचे शिक्षक होते.

४) बी. एन. जोशी हे कोल्हापूर संस्थानचे सरन्यायाधीश होते.

५) राजघराण्यातील वेदोक्त पद्धतीचे संशोधन करण्याचे कार्य के.एन. पंडीत व व्ही.बी. गोखले या न्यायाधीशांनी करून महाराज क्षत्रीय असून त्यांना वेदोक्ताचा अधिकार असल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला.

६) डाॅ. टेंगशे हे सिव्हील सर्जन होते. ते महाराजांच्या सोबत युरोप प्रवासात होते. त्याचप्रमाणे आणखी एक ब्राह्मण डाॅक्टर धोंडोपंत बोरकर यांच्यावर महाराजांचा खास विश्वास होता.

७) नारायण भट्ट सेवेकरी या विद्वान ब्राह्मण भटजीकडून महाराजांनी १९०१ साली वेदोक्त पद्धतीने श्रावणी केली.

८) गोपाळराव सोहोनी व गणपत अभ्यंकर हे लीगल ॲडव्हाईजर होते.

९) विष्णुपंत जोशी हे स्टेट प्लीडर होते.

१०) बापू देशपांडे हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते.

११) सोनटक्के व घोलकर हे डिस्ट्रिक्ट जज्ज होते.

१२) पेंढारकर हे चीफ पोलीस होते.

१३) आपटे हे राजाराम काॅलेजचे प्राचार्य होते.

१४) महाराजांचे अत्यंत विश्वासू सल्लागार वा.द. उर्फ बन्याबापू तोफखाने होते.

आपणही आपल्या माहितीतल्या लोकांची नावे कमेंटबाॅक्समध्ये सुचवा.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. प्रदीप गबाले says

    वा.द. तोफखाने यांचे बालपणीचे सवंगडी गं. य. दीक्षित गुरुजी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या उदार देणगीतून मिळालेल्या जागेवर तपोवन आश्रमाची स्थापना केली. या तपोवन आश्रमात आपल्यासाठी देखील एक छोटीशी पर्णकुटी असावी अशी छत्रपती शाहू महाराजांची इच्छा होती. राजवैभव असूनही पर्णकुटीत राहण्याची इच्छा व्यक्त करणारा असा दुसरा छत्रपती होणार नाही. तोफखाने आणि दीक्षित दोघेही ब्राह्मण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.