मेट्रो कुठल्याही शहरातील असुद्या त्यातील आवाज हा शम्मी नारंग यांचाच असतो

देशभरातील सगळ्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूककोंडीला तोंड द्यावं लागत आहे. यामुळे मोदी सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे विशेष लक्ष देत आहे. यासाठी दिल्ली, कोलकत्या, हैद्रराबाद शहरांबरोबर नागपूर, पुणे सारख्या शहरात मेट्रोचे जाळं उभं राहत आहे.

मेट्रोचे डब्बे वातानुकूलित असतात, स्टेशन एकदम आधुनिक असतात. लोकल सारखी गर्दी मेट्रोत नसते. प्रवासा दरम्यान पुढील स्टेशनची माहिती, इंग्लिश, हिंदी आणि स्थानिक भाषेत माहिती जाते. अनेकांना वाटत की, आवाज हा कुठल्या माणसाचा नसून तंत्रज्ञानाचा वापराने सूचना व्यक्त करण्यात येतात. मात्र हे चुकीचं हवं.

देशभरातील मेट्रो मध्ये हिंदीतून देण्यात येणाऱ्या सूचनांचा आवाज हा शम्मी नारंग यांचाच असतो. तर इंग्लिश मधून देण्यात येणाऱ्या सूचनाचा आवाज हा रिनी खन्ना यांचा असतो.

शम्मी नारंग रिनी खन्ना यांची निवड करण्याचे श्रेय दिलं जात ते मेट्रो मॅन श्रीधरन यांना.

दिल्ली मेट्रो रेल कॉरपरेशनचे अध्यक्ष असणाऱ्या श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो सुरु होण्यापूर्वी एक मिटिंग आयोजित केली होती. त्यावेळी मेट्रो मध्ये सूचना देणारा आवाज हा चांगला असायला हवा असे सांगत त्यांना माहित असणाऱ्या दोन व्हॉइस आर्टिस्टचे नाव सुचवले. अर्थातच यात नावे होती एक शम्मी नारंग आणि दुसरं म्हणजे रिनी खन्ना यांचं.

यानंतर शम्मी नारंग आणि रिनी खन्ना यांना दिल्ली मेट्रो ऑफिसला बोलवण्यात येत. यानंतर दोघांच्या आवाजी ट्रायल घेण्यात येते. या दोघांचा आवाज सगळ्यांना आवडतो आणि अशा प्रकारे या दोघांची मेट्रोतील सूचनांसाठी निवड होते. जो पर्यंत मेट्रो राहील तो पर्यंत या दोंघांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे.

 शम्मी नारंगचा इथपर्यतचा प्रवास सोपा नव्हता

शम्मी नारंग हे मूळचे दिल्लीचे. हुशार असणाऱ्या नारंग यांनी बारावी नंतर इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्याचे ठरवले होते. इंजिनीरिंगच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत शम्मी नारंग हे करियर बाबत निश्चित होते. मात्र थर्ड ईयरला असतांना त्यांच्या कॉलेज मध्ये नवीन सभागृह बांधण्यात आले होते.

तिथे नवीन साऊंड सिस्टीम सुरु करण्यात आली होती. नवीन सिस्टीम कशी काम करते याची टेस्टिंग सुरु होती. यावेळी जरा चांगला आवाज कोणाचा आहे हे कॉलेज मध्ये जाऊन विचारण्यात आले. त्यावेळी शम्मी नारंग यांचं नाव पुढे आले.

ऑडिओ सिस्टीम लावणारा साधा सुद्धा माणूस नव्हता. तो एक अमेरिकन माणूस होता. त्यांचे नाव Mr Flanningan असे होते. आवाजाच्या बाबतीत त्यांनी बराच अभ्यास केला होता. साऊंड सेटिंग करतांना नारंग हे हिंदीत बोलत होते.Mr Flanningan यांना हिंदी भाषा समजत नव्हती. मात्र नारंग यांच्या आवाजातील गोडी त्यांना कळाली होती. 

Mr Flanningan यांनी नारंग यांना बोलावून घेतले. ते  व्हॉइस ऑफ अमेरिका मध्ये काम करत असल्याचे सांगितले. त्यांनी नारंग यांना त्यांच्या दिल्लीतील स्टुडिओ मध्ये भेटायला बोलावलं. काही दिवसानंतर शम्मी हे Mr Flanningan यांच्या स्टुडिओ मध्ये गेले. तिथे त्यांना काही ओळी वाचायला दिल्या आणि त्या रेकॉड केल्या.

यानंतर त्यांना हे रेकॉर्डिंग स्टुडिओ मधील सगळ्यांना ऐकवण्यात आले. त्यावेळी सगळ्यांचा तोंडी एकच वाक्य होत “क्या बात है”. नारंग यांनी रेकॉर्ड केलेले व्हॉइस ऑफ अमेरिका ला प्रसारित करण्यात आले. यानंतर नारंग यांची आवाजाची दुनिया सुरु झाली. त्यांना या पहिल्या कामाचे १०० रुपये मिळाले होते.

यानंतर नारंग हे कॉलेज आणि व्हॉइस रेकॉर्डींचे दोन्ही काम करत होते. त्यानंतर १९८२मध्ये त्यांना दूरदर्शन मध्ये अँकर म्हणून निवडण्यात आले. महत्वाचं म्हणजे दूरदर्शनसाठी १ लाख जणांमधून शम्मी नारंग यांची निवड करण्यात आली होती.

७०-८० च्या दशकात शम्मी नारंग हे दूरदर्शनवरील प्रसिद्ध चेहरा होते. आजही तेच लोकप्रिय आणि यशस्वी व्हॉईस आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. या काळात त्यांनी बऱ्याच मोठ्या बातम्यांचे वाचन केले. मात्र शम्मी नारंग यांना कुठले काम आवडते असं विचारलं ते ते मेट्रोला दिलेल्या आवाजाबद्दल खूप बोलतात.

एवढंच नाही तर नारंग यांची कंपनी मेट्रोच्या साउंडचे काम देखील पाहते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.