शब्दाला कवडीची किंमत नसली तरी पार्थ यांनी शेअर्स घ्यायला दिलेले ७० लाख विसरू नका साहेब

राजकारणात किंमत लय महत्वाची गोष्टय. कधी कोण कोणाची किंमत काढेल हे सांगता येत नाही. आज पण अशीच गोष्ट झाली. शरद पवारांनी जाहीर स्टेटमेंट दिलं. त्यात ते म्हणाले 

माझ्या नातूच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. 

शरद पवारांच्या या स्टेटमेंटवरून सध्या लोकांच्या फ्यूजा टाईट झाल्या आहेत. आत्ता या स्टेटमेंटच्या पाठीमागची कारणे काय आहेत तर सध्या पेटलेलं सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच प्रकरण आणि राममंदीर भूमीपूजन सोहळा. 

सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येबाबत CBI चौकशी व्हावी म्हणून पार्थ पवारांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची भेट घेत मागणी केली. दूसरी गोष्ट म्हणजे राममंदीराबाबत त्यांनी जय श्रीराम म्हणत मंदीराच्या भूमीपूजनाबाबत अनुकूल भूमिका घेतली.

यावर माध्यमातून बातम्या रंगवण्यात आल्या नंतर सुप्रिया सुळेंना याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा तूम्हाला व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे का, पार्थ पवारांची व्यक्तिगत मते आहेत. ती पक्षाची मते नाहीत अस म्हणत सुप्रियाताईंना पार्थ यांची बाजू मांडत चिलींग विथ पार्थ केलं.

मात्र भिडू राजकारण हे राजकारणच असतं. हे मुद्दे राष्ट्रीय स्तरावरून विचारण्यात आल्यानंतर व्यक्तिस्वातंत्र म्हणून मुद्दे रेटता आले नाहीत आणि शरद पवारांनी आज थेट कवडीची किंमत नाही असं सांगून पार्थ पवारांना फटकारलं. 

आत्ता यामागचं राजकारण काय, यामागे राजकीय गणित काय आहेत, यामुळे राज्याच्या राजकारणात काय होवू शकतं वगैरे वगैरे गोष्टी सांगण्यासाठी आपल्या माध्यमांकडे पोत्याने राजकीय विश्लेषक आहेत. पण पैशाचा हिशोब कोण सांगणार. नक्की कवडी म्हणजे किती इथपासून ते शरद पवार व पार्थ पवार यांच्यात व्यावहारिक नातं किती रुपयांच आहे हे देखील बघायला पाहीजे कारण, 

कारण, निमित्त कवडीचं आहे !!! 

तर पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षातर्फे अर्ज दाखल केला होता. साहजिक तेव्हा त्यांनी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं व या प्रतिज्ञापत्रावरून बातम्या करण्यात आल्या. 

या बातम्यांनुसार आज शरद पवारांनी पार्थ यांच्या बोलण्याची कवडीची किंमत देखील केली नाही त्याच शरद पवार व सुप्रिया सुळेंना पार्थ पवारांनी शेअर खरेदीसाठी ७० लाख रुपये ॲडव्हान्स दिले आहेत अशी माहिती मिळते. 

पार्थ यांच्याकडे एकूण २० कोटी १२ लाख रुपये असल्याचं तसेच आई सुनेत्रा पवार व भाऊ जय पवार यांच्याकडून एकूण ९ कोटी ३६ लाख रुपयांच कर्ज त्यांनी घेतलं होतं. त्यांच्याकडे किती रुपये आहेत याहून अधिक महत्वाच म्हणजे आजोबा शरद पवार व आत्या सुप्रिया सुळे यांना त्यांनी शेअर खरेदीसाठी ७० लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिल्याची माहिती देण्यात आली होती. 

इथे क्लिक करुन सविस्तर बातमी वाचू शकता. 

आत्ता पुढचा मुद्दा असा की,

१० कवड्या म्हणजे एक दमडी, ४ दमड्या म्हणजे एक पै आणि ३ पै म्हणजे एक पैसा, ४ पैसे म्हणजे १ आणा म्हणजेच एका रुपयात २,५६० कवड्या येतात. पैशात किंमत करायची झाली तर शेअर खरेदीसाठी सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्याकडे

७० लाख * २,५६० कवड्या = जे येईल इतक्या कवड्या ॲडव्हासमध्ये असल्याची माहिती मिळते तरिही शरद पवार मात्र पार्थ पवार यांच्या बोलण्याची किंमत कवडीची देखील करत नाहीत हे अवघडाय गड्या. असो कसही असलं तरी कवडीच्या निमित्ताने जूना ७० लाखांचा हिशोब आठवला आणि तो तुम्हाला सांगितला इतकचं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.