हटाव लुंगी म्हणत स्थापन झालेली सेना चक्क तमिळनाडूमध्ये सुद्धा जम बसवायचा प्रयत्न करते

लुंगी हा शब्द आठवला की पहिल्यांदा डोक्यात येतं ते म्हणजे शिवसेनेचं आंदोलन. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने सुरू केलेली हटाव लुंगी, बजाव पुंगी हे त्यांचं आदोलन फारचं गाजलं. मुंबईतील दक्षिण भारतीयांच्या वर्चस्वाला विरोध हा ६० च्या दशकात शिवसेनेचा मुद्दा होता. त्याचा शिवसेनेला फायदाही मिळाला आणि त्यावर शिवसेना वाढली. त्यावेळी शिवसेनेची ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ ही दक्षिण भारतीयांविरुद्धची घोषणा मुंबईत लोकप्रिय ठरली होती.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली असली तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती. मराठी लोकांच्यासोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. मुंबईत अनेक उद्योगही उदयास आले असले तरी त्या उद्योगांच्या चाव्या मात्र अमराठी लोकांच्याच हाती होता. मराठी माणसाला दुय्यम स्थान मिळतंय अशी भावनाही त्या काळी जोर धरू लागली होती.

व्यापारातही गुजराती, मारवाडी आणि दाक्षिणात्य लोकांना प्राधान्य मिळत असल्यानं मराठी लोकांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून शिवसेने जन्म घेतला. आपल्या व्यंगचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मार्मिकच्या माध्यमातून मराठीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यास सुरूवात केली. त्यानंतर मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी १ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.

मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात हटाव लुंगी, बजाव पुंगी ही मोहीम शिवसेनेने सुरू केली.

मराठी माणसाला शिवसेना आपलीशी वाटल्यानंच मराठी माणूसही शिवसेनेशी जोडला गेला आणि राज्यभर त्यांचा वेगाने विस्तारही झाला. मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची हे समोरच्या ठणकावून सांगण्याची हिंमतही मराठी माणसाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनेच दिली.

साठच्या दशकात स्थापन झालेल्या शिवसेनेच्या प्रांतवादाच्या मुद्द्याबद्दल, आक्रमक आंदोलनांबद्दल, ‘राडा’ संस्कृतीबद्दल देशभरात तेव्हापासूनच चर्चा होती. त्यांचा कम्युनिस्टविरोध, आणीबाणीला समर्थनाची भूमिका यावरुन राष्ट्रीय राजकारणात सेना नेहमीच चर्चेचा विषय राहिली. पण सेनेचा मुखवटा मात्र स्थानिकच, म्हणजे मुंबईचाच होता. फारतर ठाण्यापर्यंत निवडणुकांवर प्रभाव होता.

पण १९८५ नंतर हिंदुत्वाचा मुद्दा बाळासाहेबांनी उचलल्यानंतर, अयोध्या आंदोलनानंतर, मुंबई दंगलीनंतर शिवसेनेचा महाराष्ट्रातही विस्तार सुरु झाला. हाच तो काळ होता जेव्हा बाळासाहेब आणि शिवसेनेबाबत तेव्हाच राष्ट्रीय स्तरावर आकर्षण निर्माण झालं.
बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर तिचा अभिमान आहे असं बाळासाहेब म्हणाले आणि देशभर शिवसेनेची लाट आली.

हिंदुत्वाच्या भूमिकेमुळं आणि अयोध्या आंदोलनाच्या वातावरणात शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावर दारं उघडली. बाळासाहेबांबद्दल देशभरात हे जे कुतुहल निर्माण झालं तो काळ रामजन्मभूमी आंदोलनाचा होता. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला हे सगळं होत होतं जेव्हा शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर येऊ इच्छित होती. त्यामुळेच त्यांचं लक्ष सगळं महाराष्ट्राकडेच होतं.

शिवसेनेनं ही करामत करुन दाखवली १९९१ मध्ये, जेव्हा रामजन्मभूमी आंदोलन जोरात होतं. संपूर्ण देशात अयोध्येच्या मुद्द्यावरुन हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीही हिंदुत्वाची भूमिका घेतलीच होती. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातला ‘बाहुबली’ असलेले पवन पांडेय शिवसेनेच्या तिकिटावर १९९१ च्या विधानसभा निवडणुकीत अकबरपूर मतदारसंघातून निवडून आले. सेनेसाठी हे मोठं यश होतं.

पवन पांडेय आमदार असताना सेनेनं उत्तर प्रदेश त्यांच्या प्रभावाखालच्या भाग हातपाय पसरायला सुरुवात केली होती. लखनौ, बलिया, वाराणसी, गोरखपूर या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही सेनेला तेव्हा यश मिळालं. पवन पांडेय सेनेचा उत्तर प्रदेशातला चेहरा बनले. पण हे फार काळ टिकलं नाही. पुढच्याच निवडणुकांमध्ये पांडेय पडले.

शिवसेनेने गोवा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, दिल्ली आणि प. बंगामध्ये निवडणुका लढवल्या आहेत. पण त्यांना यश मिळालेले नाही. याचे कारण शिवसेनेची इमेज. शिवसेना प्रांतीयवादी असून अन्य राज्यातील नागरिकांना विरोध करते असा प्रचार अन्य राज्यांमध्ये झाल्याने आणि भाजपने हिंदुत्वाचा स्वीकार केल्याने शिवसेनेला मतदारांनी साथ दिली नाही.

शिवसेना कश्मीर मध्ये ही आहे असं म्हंटल तर तुम्हाला पटणार नाही.

पण बुऱ्हाण वाणी या २१ वर्षीय कमांडरच्या मृत्यूनंतरची गोष्ट. संपूर्ण काश्मीर खोरे पेटून उठले होते. काश्मीरच्या राजकारणात मोठमोठ्या उलथापालथी घडल्या होत्या. बुऱ्हाणचे व्हिडीओ घराघरात पाहिले जायचे, त्याच्या नावाने गाणी लिहिली जायची. दर घरातलं कुणीतरी मेलं आहे असं वातावरण. त्या काळात काश्मीर जवळपास बंद पडलं होतं. सगळं ठप्प.

त्याच काळात उत्तर कश्मीर मधल्या नौगाममधल्या एका घरात सभा भरली. घरावर आणि इतरत्र भगवे झेंडे लावले गेले. झेंड्यावर भारताचा नकाशा होता. शिवसेनेच्या डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्र होतं. चर्चा वाढत चालली आणि उपस्थित लोकांमध्ये उत्साह आला. घोषणाबाजी सुरु झाली आणि गावातल्या लोकांनी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. जवळपास ३० लोकांनी एका नव्या हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश केला होता.

या पक्षाचे नाव होते शिवसेना. पण महाराष्ट्राची शिवसेना नाही. त्यापासून वेगळी निघालेली शिवसेना हिंदुस्तान! कश्मीरमध्ये असलेली हि शिवसेना महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेचेच एकेकाळचे अंग होते. या संघटनेनेही सुरुवात ठाकरे यांच्या सेनेतूनच झाली होती.

आज रोजी शिवसेना हिंदुस्तान पक्ष देशाच्या १८ राज्यांमध्ये सक्रिय आहे. जम्मू भागात १० वर्षांपासून हा पक्ष मजबुतीने काम करत आहे. ४ वर्षांपासून त्यांनी काश्मीरच्या इतर भागातही आपले अभियान सुरु केले असून आजवर हजारपेक्षा जास्त सदस्य या संस्थेने जोडलेले आहेत.

गंमत म्हणजे हटाव लुंगी, बजाव पुंगी हे दक्षिण भारतीय लोकांच्या विरोधातील आंदोलनावर वाढलेली शिवसेना तामिळनाडू मध्ये सुद्धा आहे हे विशेष.

हे हि वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.