प्रेम, लिव्ह इन आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे

आधी लिव्ह इनमध्ये राहून नंतर लग्न करण्याची इच्छा सुद्धा अनेकांची असते, पण दिल्लीच्या श्रद्धा वाकरची ही इच्छा तिच्या जीवावरच बेतेल असं तिला सुद्धा कधी वाटलं नसेल.

लव्ह, सेक्स आणि धोका असा शेवट अनेकांनी ऐकला असेल पण आज दिल्लीत उघडकीस आलेल्या एका लव्हस्टोरीत मात्र प्रेम, लिव्ह इन आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे असा शेवट घडला.

कारण काय तर फक्त लिव्ह इनमध्ये राहणारी श्रद्धा तिच्या प्रियकराकडे वारंवार लग्नाची गळ घालत होती एवढंच.

मुंबई शहरातल्या नॉर्मल लव्ह स्टोरी प्रमाणे श्रद्धा वाकर आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब अमीन यांची लव्हस्टोरी जुळली होती. झालं असं की, पालघरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वाकरला मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली. पालघर आणि मुंबईच अंतर काही फारसं नाहीच. श्रद्धा सुद्धा कॉल सेंटरच्या नोकरीवर जॉईन झाली.

त्याच कॉल सेंटरमध्ये आणखी एक मुलगा जॉईन झाला होता, नाव होतं आफताब अमीन. श्रद्धा आणि आफताबची भेट झाली आणि नजरानजरी दोघेही प्रेमात पडले. श्रद्धा धर्माने हिंदू हळूहळू हे प्रेम आणखी घट्ट होत गेलं. या प्रेमामुळेच दोघांनीही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

पण दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे श्रद्धाच्या घरच्यांनी दोघांच्या लिव्ह इनला विरोध केला. श्रद्धाच्या वडिलांनी तिला समजावलं आणि निर्णय वापस घेण्याची मागणी केली, परंतु श्रद्धाने वडिलांनाच सुनावलं.

ती वडिलांना म्हणाली की, “आता मी २५ वर्षांची झालेली आहे, मला माझे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचं आहे. असं समजा की मी आजपासून तुमची मुलगी राहिलेली नाही.”

एवढं बोलून श्रद्धा आफताबसोबत राहायला निघून गेली. 

सुरुवातीला श्रद्धा आणि आफताब हे मुंबईच्या जवळच्या नायगाव मध्ये राहत होते. त्यानंतर दोघेही वसईला शिफ्ट झाले. या दरम्यान दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. लिव्ह इनमध्ये राहत असतांना श्रद्धा कायम आफताबकडे लग्नाची गळ घालत होती. यावरून आफताब कायम तिला मारहाण करायचा.

या गोष्टी श्रद्धाचे मित्र तिच्या आई वडिलांना सांगत होते सोबतच श्रद्धा सुद्धा अधूनमधून आईला कॉल करून सांगत होती. या गोष्टी ऐकून पुन्हा आईवडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आफताबला सोडून दे आणि गावी परत ये अशी मागणी तिचे आईवडील तिला सातत्याने करत होते, पण श्रद्धा आफताबसोबत राहण्यावर अडून बसली होती. लग्नानंतर सगळं सुरळीत होईल असं तिला वाट होतं. ती कायम सोशल मीडियावरून आई वडील आणि मित्रांच्या संपर्कात होती. 

याचदरम्यान दोघे मुंबई सोडून दिल्लीला शिफ्ट झाले.

दोघांनी दिल्लीत काम शोधलं आणि महरौलीच्या छतरपूर भागात एक फ्लॅट भाड्याने घेतला. दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा श्रद्धाने आफताबकडे लग्नाची गळ घातली. यावरून पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरु झाली. एक दिवस १८ मे २०२२ ला भांडण इतकं विकोपाला गेलं की, आफताबने श्रद्धाचा गळा आवळून तिला ठार मारलं.

जेव्हा श्रद्धाचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने युक्ती लढवली. सर्वात आधी त्याने फ्रिजर खरेदी केला. त्या फ्रिजरमध्ये श्रद्धाचा मृतदेह ठेवून दिला. याआधी आफताबने शेफ बनण्याचा कोर्स केला होता. त्या कोर्समध्ये वस्तू कशा कापायच्या याच प्रशिक्षण त्याने पूर्ण केलं होतं. त्याने याच स्किल्सचा वापर श्रद्धाची डेडबॉडी कापण्यासाठी केला.

त्याने तिची डेडबॉडी फ्रिजरच्या बाहेर काढली आणि संपूर्ण शरीराचे एकूण ३५ तुकडे केले.

मग हे सर्व तुकडे परत फ्रिजरमध्ये टाकून दिले. बाहेर वास जाऊ नये यासाठी अगरबत्त्या जाळल्या. त्या दिवसापासून त्याचा रोजचा घटनाक्रम सुरु झाला. तो रोज रात्री श्रद्धाच्या शरीराचा एक तुकडा घ्यायचा आणि दिल्लीतील सुनसान जागी नेऊन त्या तुकड्याची विल्हेवाट लावायचा. आफताबने हळूहळू सगळे तुकडे दिल्लीच्या सुनसान जंगलांमध्ये नेऊन नष्ट केले. एकूण १८ दिवस हा घटनाक्रम चालत राहिला.

श्रद्धाच्या डेडबॉडीची विल्हेवाट लावल्यामुळे त्याला वाटलं  होतं की आता सगळं एकदम ओक्के झालंय, पण श्राद्धाचे सोशल मीडियावरचे मेसेज बंद झाले होते. मित्रांकडून कॉल केल्यावर ती रिसिव्ह करत नव्हती. यामुळेच तिच्या मित्रांना श्रद्धाच्या खरंच ठीक आहे ना? याची शंका आली. तिच्या मित्राने लागलीच ही गोष्ट तिच्या वडिलांना संगीतली.

गोष्ट सिरीयस आहे हे लक्षात घेऊन तिच्या वडिलांनी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महाराष्ट्र पोलिसांकडे कम्प्लेंट केली. तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी प्रकारांचा तपास करायला सुरुवात केली. या तपासात दिल्ली टेक्निकल सर्व्हिलान्सने या प्रकरणाचा तपस सुरु केला.

पोलीस तपास करत दोघांच्या फ्लॅटवर पोहोचले परंतु फ्लॅटला कुलूप होतं, पण पोलिसांनी तपस सुरूच ठेवला.

याच तपासादरम्यान पोलिसांनी आफताबबद्दल एक गुप्त सूचना मिळाली. या सूचनेनुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणाला की श्रद्धा ५ महिन्यापूर्वीच गेली. मात्र पोलिसांनी याची कसून तपासणी सुरु केली.

तेव्हा अखेर आफताबने श्रद्धाचा खून केला असल्याचं मान्य केलं आणि कशा पद्धतीने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली हे सुद्धा मान्य केलं.

श्रद्धाच्या सोशल मीडियावरचे मॅसेज बंद झाले आणि तिचा कॉल लागत नसल्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला आणि तिच्या खुनाचा छडा लागला. या घटनेमुळे दिल्लीत चांगलीच खळबळ उडाली असून दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासाला वेग आला आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.