एक हुकूमशहा असा पण होता ज्याने सिंगल पोरांवर टॅक्स लावला होता कारण…

बेनीतो मुसोलिनी. हिटलरच्या जोडीचा जगातील दुसरा सर्वोच्च हुकूमशहा. फॅसिस्ट विचारसरणीचा शासनप्रमुख, ज्याने पहिल्या महायुद्धात इटलीची तटस्थ राहण्याची भूमिका सोडून देशाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले.

प्रचंड मनुष्यहानी, आर्थिक हानी झाली तरी याची पर्वा न करता त्याने याचे समर्थनच केले.

आपल्या लोकप्रियतेला जरा जरी धक्का लागतोय असे दिसत असले तरी तो लगेच वृत्तपत्र स्वातंत्र्यावर निर्बंध आणणे, विरोधकांवर बंधन लादणे, आंदोलन, निदर्शने बंद करणे असे सगळे शक्य असलेले उपाय करायचा. अश्या या सर्वोच्च हुकुमशाहाची अखेर भयानक झाली.

१९४५ मध्ये त्याच्या प्रियसीसोबत इटलीतील लोकांनी भर चौकात गोळ्या घालून उलट लटकवलं होते.

या सनकी मुसोलिनीला आणखी एका गोष्टीची चीड होती ती म्हणजे समलैंगिकता. त्याचा समलैंगिक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फारच विचीत्र आणि रागीट होता.

बर्गेमो विद्यापिठाचे इतिहास प्राध्यापक लॉरेंजो बेनादूसी म्हणतात,

फॅसिस्टवाद म्हणजे ‘मर्दांचे राज्य’. त्यामुळेच मुसोलिनीच्या मते आपले राज्य हे मर्द असावे. आपल्या राज्यातील प्रत्येक पुरुष ‘मर्द’ असावा आणि स्रियांचा देखील पुरुषांकडेच आकर्षित होणाऱ्या असाव्यात यासाठी आग्रही असायचा.

त्यामुळेच १९२३ – १९२४ च्या दरम्यान सत्तेवर आल्यानंतर त्याने जे समलैंगिक लोक आहेत किंवा ज्यांच्याविषयी अशी शंका आहे अशांना राज्यातुन तडीपार करण्याचे आदेश दिले.

तसेच या तडीपार लोकांची राहण्याची व्यवस्था मुसोलिनीने आपल्या राज्यापासून ६०० किलोमिटर लांब असलेल्या एड्रियाट्रीक समुद्रामधील त्रेमितीस या निर्जन बेटावरती केली होती. त्यावेळी तिथे राहण्या-खाण्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. त्यामुळेच राज्यातील लोक समलैंगिकता लपण्याचा प्रयत्न करत असत.

यावर उपाय म्हणून मुसोलिनी राज्यात अधिक-अधिक लग्न व्हावीत यासाठी चालना देवू लागला.

पुढे जावून १९२४ मध्ये त्याने २१ ते ५० या वयोगटातील अविवाहित पुरुषांवर बॅचलर कर लावायला सुरुवात केली. ज्यांची लग्न होत नव्हती त्यांच्यावर समलैंगिकतेचा संशय घेतला जात होता.

समलैंगिकतेच्या याच संशयावरुनच १९३८ मध्ये इटलीच्या कटानिया शहरातुन जवळपास ४५ लोकांना अटक केले होते. आणि त्यांना त्रिमीतीस बेटावर बंदी बनवून पाठवले.

पुढे १९४५ मध्ये मुसोलिनीला मारल्यानंतर इटलीमध्ये सुधारणांना सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही जवळपास ७० वर्ष तेथील समलैंगिक नागरिक आपल्याला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी धडपडत होते.

आज परिस्थिती सुधारत आहे :

आज मात्र इटलीतील परिस्थिती सुधारत आहे. अलिकडेच या ऐतिहासिक बेटावरती लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या स्मृती पुन्हा जागवण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता.

२०१४ मध्ये इटलीतील ग्रेसेतो न्यायालयाने पहिल्या समलैंगिक विवाहाला मान्यता दिली. त्यानंतर २०१६ मध्ये इटलीच्या संसदेने बहुमताने कायदा बनवून कायदेशीर रित्या समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.