फाळणीत पाकिस्तानमध्ये गेलेल्या लाहोरला उत्तर देण्यासाठी राजधानी बांधली..

१९४७ मध्ये भारत- पाक फाळणीमुळे अखंड पंजाबच पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये विभाजन झालं आणि पंजाबच्या पूर्वाश्रमीच राजधानी शहर लाहोर पाकिस्तानात समाविष्ट झालं.

लाहोर हे पंजाब साठी अतिशय महत्वाचं शहर. गेली शेकडो वर्षे बाजारपेठ, व्यापार उदीम प्रत्येक गोष्टीच ते केंद्र होतं. तेच पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे भारतात राहिलेल्या पंजाबचा एक हातच निकामी झाल्यासारखं झालं होतं.

त्यामुळे भारतातील पंजाबसाठी नवीन राजधानी स्थापित करणं गरजेच होत. त्यात फाळणीनंतर पश्चिम पंजाबमधून पूर्व पंजाबमध्ये स्थलांतरित झालेल्यांसाठी पुनर्वसनाची सोय करायची होती. त्यामुळे नेहरूंनी पंजाबच्या राजधानीसाठी संपूर्णतः  नवीन शहराची निर्मिती करण्याचे ठरविले.

‘पूर्वीच्या पारंपारिक कल्पनेच्या बेड्यातून मुक्त असं, जे नवस्वतंत्र भारतच प्रतिक ठरेल आणि ज्यातून भारताचा आपल्या भविष्यावरील विश्वास अभिव्यक्त होईल,  अशी संकल्पना नेहरूंची या शहराबाबत होती.

आपल हे स्वप्न साकार करण्यासाठी नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतचं पावलं उचलली.  यासाठी त्यांनी दिल्लीपासून २४० कि. मी. अंतरावरील ११४ चौ. कि. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाची निवड केली. या भूखंडाजवळ चंडीदेवीच मंदिर आणि  एक जुना किल्ला होता. ज्यामुळे या शहरच ‘चंडीगढ’ असं नाव पडल. या भूखंडावर नेहरूंच्या हस्ते १९५२ मध्ये कोनशीला बसविण्यात आली.

या शहराच्या निर्मितीसाठी नेहरूंनी आधी अमेरिकन वास्तूशास्त्रज्ञ द्वय अल्बर्ट मेयो आंनी मथ्यू नोवेस्की यांच्याकडे सोपविण्यात आल होत.

परंतु नोवेस्की यांच्या अपघाती मृत्यूमुळे फान्सच्या ल काबुर्झीये यांना हि जबबदारी सोपविण्यात आली.  काबुर्झीये जनसामान्य शास्त्रज्ञ मई व्हानदेर, रोहे, आणि वाल्टर ग्रुपिअस यांच्या क्युबिझम, प्युरीझमच्या आणि फ्युचरिस्टीक संकल्पनांनी प्रभावित होते. ‘आरसीसी’ बांधकामासंदर्भात पायाभूत कार्य करणाऱ्या   फ्रान्समधील ऑगस्ट पिरेट यांच्यासोबत त्यांनी काम केल.

काबुर्झीये यांनी आरसीसीचा वापर करून फ्रान्समध्ये उभारलेलं ‘युनायटेड डी हॅबिटेशन’ हे बहुउद्देशीय संकुल चांगलच चर्चित होत. भारतात त्यांची ही ख्याती पोहोचल्याने चंडीगढ शहराच्या संकल्पनेला न्याय देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.

शहराची मानवी रचना 

१९५२ मध्ये काबुर्झीये यांनी एम.एन. शर्मा, बी.पी. माथुर, आदित्य प्रकाश या भारतीय वास्तूशास्त्रज्ञांच्या मदतीने आपल्या कामाला सुरुवात केली. सुमारे ५ लाख लोकांच्या निवासी शहराची ही संकल्पना २ टप्प्यात पूर्ण करायची होती. यात पहिल्या टप्प्यात १.५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ३.५ लाख लोकांची व्यवस्था उभारायचं ठरल. काबुर्झीये  याचं वैशिष्ट्य म्हणजे ते मानवी दृष्टीकोनातून वास्तुशास्त्रीय विचार करत. शहराच्या रचनेच मानवी शरीराच्या रचनेशी साधर्म्य असत, असं त्यांची ठाम धारणा. या धारणेनुसारच त्यांनी चंडीगढच्या रचनेची योजना आखली.

शहराच्या राज्यकारभाराच नियंत्रण करणार ‘कॅपिटल संकुल’ शहरच्या शिरोभागी असेल. व्यापार उदिमाच केंद्र ‘सिटी सेंटर’ त्याच्या हृदयस्थानी असेल.

उद्यान, बगीचे,  तलाव फुफ्फुसाच काम करतील. शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांच्या वस्तूंनी व्यापलेला हा भाग बौद्धिक केंद्र ठरेल. तसेचं औद्योगिक केंद्र आतड्यासारखा असेल. आणि ‘सेवन व्ही’ नावाने प्रसिद्ध असलेलं विना- गुंतागुंतीच रस्त्याच जाळ शहरातील अभिसरणाच द्योतक असेल. अश्या मोठ्या कल्पकतेने काबुर्झीये यांनी या मानवी निवासी शहराची स्पष्ट रूपरेषा आखली.

कॅपिटल संकुलात  सचिवालय, विधानसभा, आणि उच्च न्यायालय अश्या सर्व लोकशाही संस्थांची रचना आखली गेली. भूमिगत रहदारीची व्यवस्था केलेल्या या भागात वरच्या स्तरावर ‘पेडेस्ट्रीयल प्लाझा’ सारखी रचना केली गेली. केंद्रवर्ती असलेल्या प्लाझाच्या ठिकाणी काबुर्झीये यांनी जाणीवपूर्वक नेहरूंच्या कल्पनांना पूरक अश्या तीन प्रतीकात्मक स्मारकचिन्हांची योजना केली. ज्यात ओपन हॅंन्ड, हुतात्मा स्मारक आणि टॉवर ऑफ शॅडोजचा समावेश आहे.

सेक्टरची वैशिष्ट्यपूर्ण रचना 

सुमारे ५ लाख लोकसंख्या असलेल्या असलेल्या शहरात दैनंदिन जीवन सुकर व्हावं, यासाठी संपूर्ण शहर अनेक सेक्टरमध्ये विभाजित करण्याची योजना आखली गेली. यात प्रत्येक सेक्टरमध्ये निवासी संकुलाजवळ बाजारहाट करण्याच केंद्र राहील आणि सर्व सोयी उपलब्ध होतील, अशी कटाक्षाने योजना आखली गेली.

सेक्टरच्या रचनेत सुटसुटीतपणाची ग्वाही देताना भारतीयांच्या मोहल्ला संस्कृतीची दखल घेऊन चौक, बरसाती इत्यादी संकल्पनानांचा  देखील वापर केला गेला. एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी चंदीगढमधील रस्त्यांची अगदी आगळी आणि नियोजनबद्ध अशी ‘सेव्हन व्ही’ रचना करण्यात आली. तसेच नागरिकाच्या स्वस्थतेसाठी ‘रोझ गार्डन’ , ‘ रोक गार्डन’ सारखी विरंगुळ्याची ठिकाण निर्माण केली गेली.

काबुर्झीये आणि चंदीगढचा प्रभाव 

१३ वर्षाच्या प्रयत्नानंतर काबुर्झीये  यांनी १९६५ मध्ये शहराचा पहिला टप्पा पूर्ण केला.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची मार्गदर्शक तत्व स्पष्ट करून आणि शासनाच्या हाती सूत्र सोपवून ते आल्या मायदेशी  परतले. त्यांनंतर इतर वास्तूशास्त्रज्ञांनी काबुर्झीये  यांची मुलभूत तत्वे तशीच वापरली तर काही योग्य बदलही केले. मात्र,पुढील काळात देशातील अनेक प्रकल्पांसाठी, वास्तुरचनांसाठी  काबुर्झीये यांनी उभारलेलं चंदीगढ शहर प्रेरणादायी ठरलं.

उदाहरण द्यायचं झालं तर गुजरातमधील गांधीनगर, मुंबईजवळील सिडको अर्थात नवी मुंबई, जयपूरमधील विद्यानगरी इत्यादी. आधुनिक बांधकाम आणि शहररचनेसाठी अभ्यासकांकरिता चंदीगढ हे नेहमीच प्रेरणादायी राहील.

पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी 

१९६५ मध्ये चंडीगढ अस्तित्वात आल्यानंतर त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. १९६६ मध्ये पूर्व पंजाबचे पंजाब आणि हरियाणा असे दोन भाग पडले. आणि दोन्ही राज्यात चंडीगढ आपली राजधानी व्हावी अशी मागणी होऊ लागली. ज्यामुळे वाद निर्माण झाले. पुढील काळात चंडीगढला या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.