आजीच्या ऊबदार गोष्टीची सर फक्त आणि फक्त स्टोरीटेललाच

हर कोई कहानी लेके जिता है

कुछ कहानीया हम बताते है

हम म्हणजेच स्टोरीटेल….

तुमचा आमचा म्हणजे सगळ्या मनुष्यप्राण्याचा सर्वात जुना छंद काय असेल तर तो म्हणजे गोष्टी ऐकणे. आता या गोष्टी कसल्याही असतात. जसं भुताच्या पंचतंत्राच्या, प्रेमाच्या, इतिहासाच्या तर कधी युद्धाच्या. काही गोष्टी कथा असतात काही दंतकथा असतात.

पण गोष्ट कशी ही असू द्या ना, ती सांगणं म्हणजे कला असते. गोष्ट ऐकता ऐकता तुम्ही त्या गोष्टीतलेचं एक पात्र होऊन जाता. हे ज्याक्षणी वाटतं ना त्याक्षणी गोष्ट सांगणाऱ्याने आपली कला साधली असं म्हणायचं. 

याचमुळे पूर्वी म्हणे राजाच्या दरबारात देखील स्टोरी टेलर असायचे. आजही या कथाकरांना प्रचंड मान असतो. तुमच्या आमच्या आयुष्यात स्टोरीटेलिंगची सुरवात आपल्या आजीपासून होते. आपल्या अवतीभवती तसे अनेक स्टोरीटेलर असतात. पुढे पुस्तकं, मित्र मैत्रिणींनी सांगितलेले किस्से, आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या कथा यातून या गोष्टी जन्मभर आपल्याकडे येतच राहतात.

गोष्टी कधी मरत नाहीत. गोष्टी कधी संपत नाहीत. म्हणून गोष्टी सांगणारा हा नेहमीच भारी असतो.

आधुनिक काळात या स्टोरी टेलिंगच स्वरूप बदलत चाललंय. गेल्या काही वर्षात आलेली डिजिटल क्रांती गोष्टींना पुस्तकाच्या बाहेर घेऊन आली. असाच एक डिजिटल प्लॅटफॉर्म जो जुन्या नव्या गोष्टींना मॉडर्न जनरेशन पर्यंत घेऊन जातो. तो म्हणजे स्टोरीटेल. 

आज मराठी पासून भारतातल्या बहुतेक स्थानिक भाषेत जाऊन पोहचलेल्या स्टोरीटेलची सुरवात मात्र युरोपात झाली होती.

स्वीडनच्या स्टॉकहोममधला एक केमिकल इंजिनियर म्हणजे जोनास टेलँडरने २००५ साली त्याचा मित्र जॉन हॉक्सन याच्या सोबत बोकीलर नावाची कंपनी सुरु केली. हि कंपनी ऑडिओ बुक्सची निर्मिती करायची. स्वीडनपुरती मर्यादित असणारी हि कंपनी सुरवातीला तितकीशी जम बसवू शकली नाही. पुढे हीच नाव बदलून स्टोरीटेल असं करण्यात आलं.

पुढे २०१० च्या दशकात जेव्हा ऍपल आणि अँड्रॉइड यांची क्रांती झाली तेव्हा स्टोरीटेल साठी मोठं अवकाश खुलं झालं. स्वीडन युरोपच्या बाहेर स्टोरीटेलने आपले पंख पसरले. 

भारतात स्टोरीटेलच आगमन २०१७ साली झालं. ती भारतात कशी आली यामागे देखील एक गंमत आहे.

तर झालं असं की योगेश दशरथ नावाचा एक आयटी इंजिनियर युरोपमध्ये जॉब करायचा. त्याला वाचनाची भयंकर आवड होती. या आवडीतूनच कोणी तरी त्याला स्टोरीटेल डाउनलोड करायला सांगितलं. योगेश या ॲप्लिकेशनच्या प्रेमात पडला. पण त्याला स्टोरी ऐकताना प्रश्न पडला कि हे एवढं भारी ऍप भारतीय भाषांमध्ये पण आलं पाहिजे. 

मग त्याने प्रयत्न सुरु केले. स्टॉकहोमला असलेल्या स्टोरीटेलच्या ऑफिसला मेल पाठवला. त्याला वाटलं नव्हतं कि पुढे काही होईल. पण चक्क स्टोरीटेलने रिप्लाय दिला. त्याला बोलवून घेतलं. प्रेझेन्टेशन सादर करायला लावलं. योगेशच्या सादरीकरणावर प्रभावित होऊन त्यांनी भारतीय भाषांमध्ये स्टोरीटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला.

आज स्टोरीटेल हे ऍप हिंदी, मराठी, तामिळ, मल्ल्याळम बंगाली, गुजराती, ओडिया, कन्नड,आसामी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठीचं बोलायचं झालं पुल देशपांडे, शिवाजी सावंत यांच्यापासून ते विजय तेंडुलकर यांच्यापर्यंत अनेक मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तके ऑडिओ स्वरूपात इथं ऐकायला मिळू शकतात.    

राजकीय नेत्यांचे आत्मचरित्र, धार्मिक ग्रंथ, शेअर मार्केट  पासून सर्व जॉनरची सर्व भाषांमधली पुस्तके ऍव्हेलेबल आहेत. शिवाय याचे सादरीकरण अनेक मोठमोठ्या कलाकारांनी केलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर कोसला या भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीचं वाचन अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी तर गोट्या या ताम्हणकरांच्या गाजलेल्या पुस्तकाचं वाचन गीतकार संदीप खरे यांनी केलं आहे. कित्येक ऑडिओबुकचे सादरीकरण मुक्त बर्वे, अलोक राजवाडे, शरद पोंक्षे, गौतमी देशपांडे आणि ललित प्रभाकर यांसारख्या दिग्गजांनी केलेलं आहे.

स्टोरीटेल फक्त जुन्या पुस्तकांपुरतं मर्यादित नाही तर स्टोरीटेल ओरिजिनल या सेक्शनमध्ये खास एक्सक्ल्युजिव्ह कन्टेन्ट देखील ऐकायला मिळतो. यात सिरीज असते, पॉडकास्ट असतात.आरोग्यापासून ते राजकारण, तरुण उद्योजकांचे विचार अशा अनेक गोष्टींवर असलेले हे पॉडकोस्ट नक्की ऐकावेत असेच आहेत.

आता हे स्टोरीटेल वापरायचं कसं ?

गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप सहज डाऊनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात. नाममात्र शुल्क वापरून साहित्यातील प्रचंड मोठा खजिना आपल्यासाठी खुला होतो.   

जर तुम्ही पण मऊ गोधडीत शिरून ऐकलेल्या आज्जीच्या स्टोरी मिस करत असाल. तुमच्या गोष्टीवेल्हाळ मित्राच्या गप्पांची आठवण येत असेल. जगभरातल्या मोठमोठ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्या वाचायला वेळ मिळत नाही म्हणून राहून गेलंय तर नक्कीच स्टोरीटेल डाउनलोड करा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.