एकेकाळी ३ सेकंदाचा रोल करणारा सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावरचा टॉपचा कॉमेडियन झाला

छोट्या पडद्यावर कॉमेडी शोजची चलती होती, नवीन नवीन विनोदी कलाकार येऊन आपलं करिअर घडवत होते. म्हणजे आजसुद्धा टीव्हीवर दिलीप जोशी जे जेठालाल हे पात्र साकारतात, कृष्णा अभिषेक, कपिल शर्मा या सगळ्या मंडळींमध्ये त्यावेळी एक नवा हिरो आला होता आणि त्याने काही काळाच्या आतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

सुनील ग्रोव्हर म्हणल्यावर बऱ्याच जणांना आठवणार नाही कि कोण आहे गड्या हा, पण जर तुम्ही कपिल शर्मा शो मधला डॉक्टर गुलाटी, रिंकू भाभी किंवा कॉमेडी नाईट्स मधली गुथी पाहिली असेल तर तुम्हाला चटकन ध्यानात येईल कि सुनील ग्रोव्हर कोण आहे. आपल्या मूळ ओळखीपेक्षा पात्रांच्या नावाने फेमस असणारा सुनील ग्रोव्हर हा छोट्या पडद्यावरील कलाकारांपैकीच एक. 

सुनील ग्रोव्हर हा लहानपणापासूनच फुल फिल्मी होता. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दोघांच्या अभिनयाचा तो कट्टर फॅन. पंजाबला येऊन सुनीलने थेटरमध्ये डिग्री मिळवली. कॉलेजात थिएटर करून त्याची चांगला अभिनेता म्हणून ओळख झाली होती. जसपाल भट्टी हे तेव्हा फुल टेन्शन नावाचा शो करत होते त्यात सुनीलला त्यांनी कास्ट केलं.

हा रोल फक्त ३ सेकंदाचा होता. ९० च्या काळात टीव्हीवर दिसणं हेच मोठं मानलं जायचं. सुनील ग्रोव्हरचा यात डाकू आए, डाकू आए हा एवढाच डायलॉग होता. हा रोल तेवढाच काय सुनील ग्रोव्हरचा अभिनय लोकांना दिसला. कॉलेज पूर्ण झाल्यावर स्ट्रगलच्या काळात चंदिगढमध्ये शूटिंग चालू असल्याची बातमी सुनीलला कळली. सिनेमा होता अजय देवगण आणि काजोल या जोडीचा प्यार तो होना हि था. 

शूटिंग पाहायला गेलेल्या सुनील ग्रोव्हरला जागेवर रोल ऑफर झाला. यात एका सीनमध्ये अजय देवगणची दाढी करणारा तोताराम हा सुनील ग्रोव्हर होता. मुंबईत आल्यावर सुनील ग्रोव्हरला लवकर संधीच मिळत नव्हती. शेवटी द लिजेंड ऑफ भगतसिंग हा सिनेमा सुनील ग्रोव्हरच्या कारकिर्दीला कलाटणी देऊन गेला. या रोलमुळे सुनीलला अनेक कामं मिळायला सुरवात झाली.

पण सुनील ग्रोव्हर हे नाव लोकांना खऱ्या अर्थाने परिचित झालं ते म्हणजे कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोच्या माध्यमातून. हा कॉमेडी शो सुनील ग्रोव्हरला भारतभर घेऊन गेला. या शोमध्ये गुथी हे पात्र लोकांच्या कायमचं लक्षात राहून गेलं. म्हणजे आजवर टीव्ही शोजमध्ये असं युनिक पात्र कोणी साकारलं नव्हतं ते सुनील ग्रोव्हरने साकारून सगळ्यांना चकित केलं.

सुनील ग्रोव्हरच्या या पात्राला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. पुढे सुनीलच्या मुलाने त्याला स्त्री पात्र साकारू नको म्हणून सांगितलं तेव्हा एका मॉलमध्ये सुनील ग्रोव्हर आपल्या मुलाला घेऊन गेला आणि गुथीचा वेष बदलून आला तेव्हा हजारो लोकं सुनील ग्रोव्हरला दाद देत होते. त्याने त्याच्या मुलाला सांगितलं कि,

तुझा बाप लोकांना हसवण्याचं काम करतो आणि ते जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. या धडा सुनील ग्रोव्हरच्या मुलाला चांगलाच लक्षात राहिला.

पुढे कॉमेडी नाईट्स बंद पडून कपिल शर्माने द कपिल शर्मा शो सुरु केला. या शो मध्ये डॉ.मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभी हि दोन पात्र सुनील ग्रोव्हरनं इतकी उत्तम वठवली कि अजूनही हि पात्र लोकांच्या चांगलीच ध्यानात आहेत. पुढे कपिल आणि सुनील ग्रोव्हरचा वाद झाल्याने हि पात्र पुन्हा दिसली नाही. लोकांची अजूनही इच्छा आहे कि सुनील ग्रोव्हर या पात्रांमध्ये परत दिसावा.

आता कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर टीव्ही शोज आणि सिनेमांमध्ये झळकतोय. सलमान खानचा भारत सिनेमा, हिरोपंती, जिला गाजियाबाद, गजनी अशा सिनेमांमध्ये सुनील ग्रोव्हरने काम केलं. एकेकाळी फक्त ३ सेकंदाचा रोल असलेला सुनील ग्रोव्हर आज छोट्या पडद्यावर विविधरंगी पात्र साकारणारा अस्सल जातिवंत कलाकार बनलेला आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.