म्हणून ब्रिटिशांना मराठ्यांवर मिळवलेला हा विजय नेपोलियनपेक्षा भारी वाटतो.

आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो, कशामुळे माहितीये का? तर आजच्याच दिवशी म्हणजेच २३ सप्टेंबर १८०३ रोजी एक लढाई झाली होती. ब्रिटीशांमध्ये आणि मराठा सैन्याच्या दरम्यान !

आसई हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की या गावात अशीही एक लढाई झाली होती, या आसईच्या लढाईत जिंकणारा सेनापती नंतर ब्रिटनचा पंतप्रधान झाला. एवढेच नाही तर या सेनापतीने १८१५ मध्ये वॉटरलूच्या युद्धात नेपोलियनचा पराभव केला होता. असे असूनही, त्याने आसईच्या लढाईमधील त्याचा विजय आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय मानला होता.

अशी काय होती हि लढाई ?

आसईची लढाई मराठे व इंग्रज यांच्यात झालेली लढाई ज्यात मराठ्यांचे संख्याबळ जास्त असून देखील  मोठा पराभव झाला होता. 

त्या दरम्यान दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकृतरित्या मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी होता पण हळूहळू पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण सुटत चालले होते. आणि त्यांची सत्ताकेंद्रे पुण्यावरुन आता इंदूर आणि ग्वाल्हेर येथे गेले होते.

महादजी शिंदे यांच्या निधनानंतर मराठ्यांच्या एकी तुटू लागली. त्यात होळकरांनी पुण्याचा ताबा घेत दुसऱ्या बाजीरावांचा पराभव केला. पराभवानंतर बाजीराव इंग्रजांकडे आश्रयासाठी पळून गेला. तो ब्रिटिशांना मिळून वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्तास्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. आणि अशाप्रकारे बाजीराव आणि इंग्रज सरकार आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असेच दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झालं.

युद्ध सुरू झालं म्हणजेच याचा अर्थ इंग्रजांना भाग होतं की त्याने मराठ्यांवर आक्रमण करणं.

शत्रूला लवकर संपवावे यास उद्देशांनी शिंदे यांनी देखील भोसले यांच्या मदतीला त्यांची सैन्य आणली. फक्त यासाठी मराठी व इंग्रजी दोन्ही आपल्या फौजा चांगले स्थळ व वेळेच्या शोधात होत्या. यात मराठ्यांचे ४० ते ५० हजार सैनिक होते आणि बराच मोठा तोफखाना देखील होता.

मोठे संख्याबळ आणि मोठा तो खाण्याच्या जोरावर इंग्रजांवर मात करू असा असा मराठ्यांच्या सरदारांना विश्वास होता. सहाजिकच होतं इतका मोठा जबरदस्त सैन्य आणि तोफखाना असताना आपणच लढाई जिंकू हा आत्मविश्वास त्यांना होता.

तर वेलस्लीला त्याच्या शिस्तबद्ध इंग्रज लष्करावर विश्वास होता.

इंग्रज मराठ्याच्या फौजेला गाठून हरवायच्या बेतात होती तर मराठ्याना अजूनही पारंपारिक गनिमी काव्याच्या पद्धतीवर विश्वास होता.

इंग्रजांची रणनीती अशी होती की,

त्यांचे सैनिक दोन मुख्य पलटणीत विभागून होते. एक फलटणीने पश्चिमेकडून चाल केली तर दुसऱ्या पलटणीने दुसऱ्या बाजूने चाल केली व दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडायचा अशी योजना होती. पण झालं असं की वेलस्लीला मराठ्यांची गाठ लवकरच पडली आणि दोन्ही सेना आमने-सामने आल्या.

त्या दरम्यान मराठ्यांची सैन्य हे कैतना व जुहा नदीच्या संगमाजवळ वास्तव्यास होती. तर मराठ्यांना वाटत होतं की, वेलस्लीलाच्या सैन्यांना नदी ओलांडावी लागेल आणि त्याचा फायदा आपण घेऊ. युद्धनीतीच्या दृष्टिकोनातून मराठा सैन्याची स्थिती वरचढ होती. तरीदेखील वेलस्लीने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. आणि वेलस्लीच्या फौजेला मराठा फौजेच्या सोबत आमने-सामने युद्ध करावे लागले.

तरी वेलस्ली आजूबाजूच्या स्थानिक लोकांकडून माहिती घेत होता की ही नदी कुठे उथळ आहे का. शेवटी त्याला आष्टीजवळ त्या नदीची उथळ जागा सापडली. परंतु मराठ्यांनी इंग्रजांचे भारतीयांबाबतचे शिस्तीचे अंदाज चुकवले आणि वेलस्लीच्या फौजेला तोंड दिले. परिणामी ब्रिटिश फौजेच्या अंदाजापेक्षा जास्त फौज मारली गेली परंतु ७४ व्या व ७८ व्या हायलॅंडर तुकडीने मराठ्यांचा फौजेला दणाणून सोडले.

या लढाईमध्ये मराठी सैन्य मोठ्या प्रमाणात मारले गेले. जवळपास सहा हजार मराठे सैनिक शहीद झाले. तर ब्रिटीशांची पंधराशे सैनिक मारले गेले. याचमुळे वेलस्लीच्या आयुष्यात त्याच्यासाठी आयुष्यातले कारकिर्दीत मधील सर्वोत्तम युद्ध असे तो मानतो.

वेलेस्लेने लिहिलेल्या युद्ध अहवालानुसार, त्या दिवशी तो तेथे मृतदेहांमध्ये झोपला होता. वेलेस्लीचे सैन्य इतके थकले होते की त्यांनी त्याच नदीचे पाणी प्यायले आणि तिथेच आराम करण्याचा निर्णय घेतला. पुढे जाण्यापूर्वी स्टीव्हनसन तेथे असावे अशी वेलेस्लीची इच्छा होती. पण त्याच्यापर्यंत पोहोचायला अजून एक दिवस जावा लागला.

या विजयामुळे वेलेस्ले प्रसिद्ध झाले.

नंतर वॉटरलूच्या युद्धात त्याने ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केले आणि नेपोलियनचा पराभव केला. त्यानंतर ब्रिटनच्या राजाने त्याला ड्यूक ऑफ वेलिंग्टन ही पदवी बहाल केली. आणि नंतर ते ब्रिटनचे पंतप्रधानही झाले. वेलेस्लीने आसईच्या लढाईला त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट लढा आणि सर्वात मोठा विजय मानतो.

आर्थर वेलेस्लीने लढाई जिंकली होती, पण या युद्धात इतके रक्तपात झाले की जुआ नदीचा रंग लाल झाला असे म्हणले जाते.

परंतु इतके मोठे मोठे संख्याबळ असून देखील मराठे सैनिक हरले होते.  मराठ्यांचे संख्याबळ पाहता अधिक असून देखील मराठ्यांचा पराभव झाला होता. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.