बिहारच्या दारूबंदीमुळे या मुख्यमंत्र्यांना सरकार गमवावं लागलं होतं…

विषारी दारू पिल्याने बिहारच्या मोतीहारीमध्ये २० जणांचा मुत्यू झाला, तर ६ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याआधीही बिहारमध्ये विषारी दारुमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत, अशा घटना घडल्या की राज्य सरकारने या लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी कायम करण्यात येते.

मात्र हे लोक दारू पिऊन मेले असून त्यांना कुठलीही मदत करणार नसल्याची स्पष्ट भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वेळोवेळी घेतली आहे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा राजकारणही तापलं आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या महत्वाकांक्षीपणामुळे लोकांचे जीव जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. २०१६ पासून बिहार मध्ये दारू बंदी आहे. नितीश कुमार यांनी २०१६ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दारू बंदी केली होती. मात्र नितीश कुमार यांच्या पूर्वी सुद्धा बिहार मध्ये दारू बंदी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना आपले पद सुद्धा गमवावे लागले होते.

त्यांचे नाव म्हणजे कर्पुरी ठाकूर

नितीश कुमार यांच्या नावावर बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड आहे. मात्र बिहारच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून आजही कर्पुरी ठाकूर यांच नाव बिहार मधील जनता घेत असते. आजही बिहार मध्ये त्यांना राजकारणातील भीष्म पितामह म्हणून सुद्धा त्यांचे नाव घेतलं जातं.

कर्पुरी ठाकूर हे २ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेत  

ठाकूर पहिल्यांदा १९७० मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले. मात्र या दरम्यान त्यांना ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. परत ७ वर्षांनी जनता पक्षाच्या माध्यमातून १९७७ मध्ये यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यांच्या कार्यकाळात भरपूर चांगले निर्णय त्यांनी घेतले.

ठाकूर यांच्या कार्यकाळात बिहार मध्ये प्रथमिक शिक्षण मोफत करण्यात आले होते. बिहार मध्ये पुलावरून पायी जरी चालत जायचं असेल तरीही त्यासाठी पैसे द्यावे लागायचे. ठाकूर यांच्या कार्यकाळात हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे कामगार वर्ग ठाकूर यांच्यावर खुश झाला होता. 

महत्वाचं म्हणजे कर्पुरी ठाकूर हे गांधींचे अनुयायी होते. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की, चोरी आणि व्याभिचापेक्षा दारूची वाईट असते. जर मला भारतात हुकूमशाह केलं तर दारू दुकानदारांना कुठलाही परतावा न देता सगळी दुकाने बंद करून टाकेन.

गांधीजींच्या या या गोष्टींपासून प्रेरणा घेत कर्पुरी ठाकर यांनी १९७७ मध्ये बिहार राज्यात दारू बंदीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे बिहार मधील गरीब मजदूर खूप खुश झाले. मात्र समाजातील एका वर्गाला हा निर्णय आवडला नव्हता. त्यामुळे ठाकूर यांचे अनेक दुष्मन तयार झाले होते.

दारू बंदीच्या निर्णयानंतर ठाकूर यांच्या विरोधात दारू माफियांनी मोर्चा उघडला.

राज्यातील दारू दुकानदार मोठ्या प्रमाणात बैठका घ्यायला सुरुवात केली. याला विरोधकांचे पाठबळ मिळत होते. बिहार मध्ये चोरीच्या मार्गाने दारू वाढली होती. माफिया आणि विरोधकांची केलेल्या अपप्रचारामुळे कर्पुरी ठाकूरांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

अवघ्या अडीच वर्षात म्हणजे २१ एप्रिल १९७९ ला त्यांनी राजीनामा दिला. यानंतर आलेल्या सरकारने लगेच दारू बंदी उठवली आणि बिहार मध्ये पुन्हा एकदा सर्रास दारू मिळू लागली.

मुख्यमंत्री पद गेल्यानंतर कर्पुरी ठाकूर यांनी दारू बंदीचा मुद्दा मात्र सोडला नाही. विरोधी पक्षनेता झाल्यावर सुद्धा त्यांनी दारू बंदी  करावी ही मागणी लावून धरली होती. यामुळे आदिवासी, दलित, कामगारांचे मोठे नुकसान होत आहे.

कर्पुरी ठाकूर फक्त विधानभनातच आवाज उठवत होते असे नाही. त्यांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून  आंदोलनाला सुद्धा बसले होते. मात्र त्यांना परत दारू बंदी करण्यात यश आलं नाही. बऱ्याच काळानंतर २०१६ मध्ये नितीश कुमारांनी बिहार मध्ये दारू बंदी केली. त्यावरून आजही वाद सुरुच आहे.

हे ही वाच भिडू

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.