म्हणून बिहारी लोकं आजही म्हणतात, जाना था श्रीराम, पहुंच गए सूरीनाम !!

दक्षिण अमेरिकेत सुरीनाम नावाचा एक छोटासा देश आहे. आकाराच्या बाबतीत हा देश महाराष्ट्रापेक्षा निम्म्याहून मोठा आहे पण लोकसंख्या अवघी ८ लाख इतकीच आहे. या देशाची जवळपास २८ टक्के लोकसंख्या ही भारतीय वंशाच्या लोकांची आहे त्यामुळे सुरिनामला भारताच्या बाहेर असलेला छोटा भारत म्हटलं जातं. 

या दक्षिण अमेरिकेतल्या देशामध्ये भारतीय लोकांच्या जाण्याची गोष्ट सुद्धा फार रंजक आहे.

झालं असं की, स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपियन देशांच्या जगभरातील अनेक देशांमध्ये वसाहती होत्या. त्या वेगवगेळ्या वसाहतींमधून साखर, कापूस, तंबाखू, नीळ अशा नगदी पिकांचं उत्पन्न घेतलं जायचं. अशातच नेदरलँडच्या वेस्ट इंडिया कंपनीने दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तरेचा बराचसा भाग जिंकून घेतला होता. त्यामध्येच एक वसाहत होती होतं सुरिनामची.

वसाहत स्थापना केल्यानंतर डचांनी इटली मेझॉनची जंगलं साफ केली आणि तिथे उसाच्या शेतीला सुरुवात केली. 

डचांनी उसाची शेती सुरु केली खरी परंतु तिथे शेतावर आणि साखरेच्या कारखान्यावर काम करायला त्यांच्याकडे मजूरच नव्हते. मग मजुरांसाठी नेदरलँडच्या वेस्ट इंडिया कंपनीने आफ्रिकेतील लोकांना गुलाम म्हणून दक्षिण अमेरिकेच्या सुरिनाममध्ये आणायला सुरुवात केली. आफ्रिकन गुलामांना तर आणण्यात आलं पण डचांना आणखी मजुरांची गरज लागणार होती.

तेव्हा डचांनी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांबरोबर मजुरांसाठी व्यवहार सुरु केला.

अखेर १८७३ मध्ये ब्रिटिश सरकार आणि डचांमध्ये मजुरांना सुरिनाममध्ये पाठवण्याचा करार झाला. यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या भोजपुरी मजुरांची निवड करण्यात आली. भोजपूरच्या पट्ट्यात असलेल्या अनेक गरीब मजुरांना निवडून त्यांना सुरिनामला पाठवण्याची तयारी सुरु झाली.

भारतातून निघत असतांना मजुरांना सुरिनामला नेण्यात येत आहे अशी माहिती देण्यात आली, पण निरक्षर मजुरांना सुरीनाम हा देश आहे याची काही कल्पना नव्हती. त्यांना वाटलं की, इंग्रज सरकार आपल्या सगळ्यांना श्रीराम नावाच्या कोणत्या तरी तीर्थस्थळी नेत आहे. त्यांना सुद्धा राम मंदिरात जाण्याची ओढ लागली. सगळे मजूर कलकत्त्याच्या बंदरातून जहाजात बसले. मजल दरमजल करत हे जहाज भारत आणि आफ्रिका खंडाला वळसा घालून दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात जाऊन पोहोचलं. 

जेव्हा मजूर जहाजातून खाली उतरले तेव्हा त्यांना कळलं की, जहाज आपल्याला श्रीरामला नाही तर सुरिनामला घेऊन आलंय.

भारताच्या भोजपूरमधून सुरिनाममध्ये पोहोचलेल्या या मजुरांकडून उसाच्या शेतीवर गुलामाप्रमाणे राबवून घेण्यात आलं. त्यांच्याच भारतीय आणि गरिकां मजुरांच्या काष्ठावर सुरीनं हा देश अस्तित्वात आला. अखेर सुरिनामी लोकांनि डचांच्या विरोधात आंदोलन केलं आणि १९७५ सुरीनं हा देश नेदरलँडपासून स्वतंत्र झाला.

आज या देशामध्ये सर्वाधिक २७.४ टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात तर २१.७ टक्के लोक हे आफ्रिकन वंशाचे आहेत. सुरिनामामध्ये सर्वाधिक ५२.३ टक्के लोक ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत तर १९ टक्के लोकं हिंदू धर्मीय आहेत. यातले बहुसंख्य भोजपूरचे असल्यामुळे सुरनाममध्ये डच नंतर सर्वात जास्त भोजपुरीच बोलली जाते.

१६ जुलै २०२० रोजी भारतीय वंशाचे हिंदू चान संतोखी हे सुरिनामचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती पदाची शपथ घेतांना त्यांनी वेदांमधील श्लोक म्हटले होते त्यामुळे त्यांच्या शपथविधीची सगळीकडे चर्चा झाली होती. 

परंतु सुरीनाम आणि श्रीराम या दोन शब्दांमध्ये भोजपुरी मजुरांचा गोंधळ उडाला होता. यावरूनच हिंदी भाषेत एक म्हणा वापरली जाते.

“जाना था श्रीराम, पहुंच गए सूरीनाम…!!” 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.