महिला व दलित अत्याचारांच्या केसेसमध्ये उत्तरप्रदेश सर्वात पुढे आहे..

उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या घटनेनंतर “उत्तरप्रदेश मेरा उत्तमप्रदेश” नावाची जाहिरात आठवली. आपण सगळेच जहिरातींना भुलणारे असतोे. दिसतं तसं कधीचं नसतं. उत्तरप्रदेशात योगी आल्यानंतर युपी आत्ता रामराज्य झाल्याच्या जाहिराती करण्यात आल्या.  

म. गांधींना देखील रामराज्य हवं होतं. पण त्यांच्या नजरेत असणारं रामराज्य खऱ्यांच्या मागे राहणारं होतं. दूर्देवाने अशा घटना घडल्या की रामराज्य ही फक्त कवीकल्पना होती की काय अशी शंका येऊ लागते. 

ज्या रामराज्याच्या उल्लेख मोठ्या दिमाखात करण्यात येतो तिथली आकडेवारीचं पहा.

२०१९ सालात महिला आणि दलित अत्याचाराच्या सर्वांधिक केसेस युपी मध्ये दाखल झाल्या आहेत. 

भारतात २०१९ साली महिला अत्याचाराच्या ४ लाख ५ हजार ८६१ केसेस दाखल करण्यात आल्या होत्या त्यापैकी तब्बल ५९ हजार ८५३ केसेस युपीतून आहेत. 

टक्केवारीत सांगायचं झालं तर १४.७ टक्के इतकी ही संख्या आहे. म्हणजेच देशात सर्वांधिक अशी.  २०१८ सालची संख्या सांगायची झाली तर उत्तर प्रदेशात ५९,४४५ आणि २०१७ साली ५६,००१ इतक्या केसेस होत्या. म्हणजे ग्राफ वरती जाणारा आहे.  बरं दूसरी महत्वाची गोष्ट किती केसेस फाईल होतात, कोर्टात टिकतात हे तुम्हाला देखील माहित आहे. 

विचार करा ज्या महिला बोलू शकल्या, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकल्या आणि केस फाईल करु शकल्या त्यांचीच ही आकडेवारी आहे, प्रत्यक्षात असणाऱ्या आकडेवारीचा विचार करुन पहा. 

दूसऱ्या नंबरला राजस्थान आहे. राजस्थानची टक्केवारी १०.२ इतकी आहे तर केसेस ४१,५५० इतक्या आहेत. बर यात महाराष्ट्र सुद्धा मागे नाही. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या ३७ हजार केसेस आहेत. 

आत्ता दलित अत्याचाराची आकडेवारी पाहूया, 

२०१९ सालात राष्ट्रीय स्तरावरच्या आकडेवारीत ७ टक्के वाढ झालेली आहे. यात देखील युपी टॉपला आहे. देशभरात एकूण दलित अत्याचाराच्या ४५, ९३५ केसेस झाल्या पैकी एकट्या युपीची टक्केवारी २५.८ इतकी राहिलेय. एकूण ११,८२९ केसेस युपीत झाल्या. 

आत्ता आपण दिवसाचं गणित पाहूया, २०१९ सालात प्रतिदिवस ८७ बलात्काराच्या केसेस दाखल झाल्या. त्यांची संख्या ३२ हजार इतकी आहे. त्यापैकी ३०६५ केसेस एकट्या युपीत झाल्यात.  टक्केवारीत १० टक्के आहे. 

देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा दर हा एक लाख संख्येला ६२.४ इतका आहे जो २०१८ साली ५८.८ टक्के इतका होता. 

जाताजाता दलित महिलांवर झालेल्या बलात्काराची आकडेवारी पाहुया, 

दलित महिलांवर बलात्कार झालेल्या एकूण केसेस २०१९ साली ३,४८६ इतक्या होत्या. इथे मात्र राजस्थान पुढे आहे. राजस्थानात २०१९ सालात ५५४ तर युपीत ५३७ इतकी आकडेवारी आहे. 

थोडक्यात काय युपी पुढं आहे पण दलित अत्याचार आणि महिला अत्याचारांच्या संख्येत. 

  • आकडेवारी संदर्भ : नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरो 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.