मध्यप्रदेशातून केलेला पाण्याचा विसर्ग विदर्भातील महापुराला जबाबदार आहे का ?

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भात विक्रमी पाऊस होतोय. या ढगफुटीमुळे भंडारा, नागपूर. गडचिरोली, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात महापूर आला आहे, या पुरमय परिस्थितीमुळे विदर्भात  हाहाकार उडालाय.

२२ जुलै  रोजीच्या सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओसुंडून वाहत असल्याने २०  गावांचा संपर्क तुटला

विदर्भात १९९४ नंतरचा सर्वात मोठा पूर आला आहे.

तब्बल २७ वर्षानंतर विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९९४ च्या काळानंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे. पण मुद्दा हा आहे कि संततधार असतांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात पूर येण्याला नेमकं काय कारण जबाबदार आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

या प्रदेशात पाऊस नसतानाही इतका मोठ्या प्रमाणात पूर कसा काय आला ?

जर हा पूर पावसामुळे आला नाही तर या महापुराला रोखता आलं नाही का ?

कारण विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस इतकाही मोठ्या प्रमाणात पडला नव्हता कि त्यामुळे पूर येईल.

विदर्भातील खोसेखुर्द, पेंच, तोतलाडोह, अप्पर वर्धा यासारखी मोठ- मोठी धरणे भरली आहेत. या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित करायला सुरु केले आहे कि,

या धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती का?

नागपूरपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर तोतलाडोह धरण आहे.   हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील चौराई धरण बांधल्याने तोतलाडोह धरण भरणे कठीण झाले होते. या तोतलाडोह धरणाची क्षमता १,०१६ दशलक्ष घनमीटर आहे.
गेल्यावर्षी सुरुवातीला तोतलाडोह धरणात पाणीच नव्हते. त्यामुळे नागपूरकरांवर पाणीकपातीची वेळ आली होती.
याच धरणाच्या उजव्या कालव्यातून नागपूर शहर आणि डाव्या कालव्यातून पारशिवनी, रामटेक, मौदा तालुका आणि भंडारा जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी सोडले जातं.

मध्यप्रदेशच्या धरणातून केलेला विसर्ग नागपूरच्या पूराला जबाबदार ?

अलीकडेच हवामान विभागाने पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्याप्रमाणेच पाऊस देखील झाला. त्यानंतर पावसाची झड धरणाच्या परिसरात सुरूच होती. याच संततधारीमुळे पावसामुळे धरणांध्ये पाण्याची पातळी वाढली होती. पेंच, अप्पर वर्धा, तोतलाडोह, गोसेखुर्द या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. यात सर्वात जास्त विसर्ग हा गोसेखुर्द धरणातून करण्यात येत होता.
मात्र याबद्दल स्थानिकांना सूचनाच केली नव्हती
पण तरीही धरणाचे दरवाजे उघडावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती.  

मध्यप्रदेश आणि विदर्भ काय कनेक्शन ?

या काळादरम्यान मध्यप्रदेशात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते असा हवामान विभागाने इशारा दिला होता जो कि खरा ठरलाय. पण मध्यप्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य प्रदेशातील नदी-नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली. परिणामी मध्यप्रदेशमधील  संजय गांधी सरोवरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला तो थेट विदर्भातील धरणात.

आणि याच विसर्गामुळे विदर्भातील नद्यांची पातळी वाढली. या नद्यांमध्ये पेंच, वैनगंगा या नद्यांचा सामावेश आहे. या नद्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि त्यामुळे पेंच धरणाच्या पातळीत वाढ झाली. 

परिणामी तोतलाडोह आणि गोसेखुर्द धरणांमध्येही पाणी वाढू लागलं.

पातळीत वाढ होत असूनही याकडे प्रशासनाने मात्र गांभीर्याने पाहिलं नाही?

संजय गांधी सरोवरातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची सूचना आधीच देण्यात आली होती तरी देखील प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष काही स्थानिकांचं म्हणणे आहे.

जर सूचना आधीच देण्यात आली तर याबाबतीत स्थानिकांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही?

धरणात पाणीसाठ्याची क्षमता किती आहे, धरणातून पाण्याचा विसर्ग कधी होणार आहे, किती प्रमाणात होणार आहे अशा सूचना करण्यात प्रशासन कमी पडलं हे एकंदरीत परिस्थितीवरून समजत आहे.

प्रशासनाच्या या चुकीचा परिणाम गडचिरोली आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना देखील भोगावा लागत आहे.

कारण गडचिरोलीला पुराची परिस्थिती निर्माण होईल इतका पाऊस झालाच नाही पण गोसेखुर्द धरणातून तब्बल २० हजार क्युसेकपेक्षा जास्त प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे अख्खा गडचिरोली जिल्हा महापुरामध्ये अडकला आहे.

धरण प्रशासनाला सूचना मिळताच जर योग्य तो निर्णय घेऊन पाण्याचा विसर्ग अचानक न करता, थोड्या- थोड्या प्रमाणात विसर्ग केला असता तर विदर्भ महापुरापासून वाचला असता.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.