फॅन्स पोलिंग झाली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा वर्ल्डकपचा पत्ता कटला तो कायमचाच….

क्रिकेटचं जग दरवेळी बदलत राहतं म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी टी- २० क्रिकेट फॉर्मला होतं तर आता टेस्ट क्रिकेट किती जबरदस्त आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा आहे याची प्रचिती येते. भारताकडून टेस्ट क्रिकेटचे महारथी म्हणल्यावर दोन नाव आपसूक पुढे येतात ते म्हणजे द वॉल राहुल द्रवीड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण. या दोन खेळाडूंनी कळस रचला. पण व्ही व्ही एस लक्ष्मण हा इतका उत्तम बॅट्समन असूनही त्याला एकही वर्ल्डकप खेळता आला नाही. याच्यामागे एक जबरदस्त गोष्ट आहे.

व्ही व्ही एस लक्ष्मण हा बऱ्याचदा टेस्टचा बॅट्समन आहे असं म्हटलं जायचं पण वनडे मॅचेसमध्ये लक्ष्मणचा दबदबा होता. राहुल द्रविडच्या बरोबरीने लक्ष्मण होता, पण लक्ष्मण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये स्लो होता म्हणून त्याला जास्त पसंती वनडे क्रिकेटसाठी देण्यात आली नाही. लक्ष्मण टेस्टच्या जाळ्यात इतका ओढला गेला होता कि त्याला वनडेमध्ये जास्त रमता आलं नाही असं सांगण्यात यायचं.

टेस्टमध्ये आणि काहीकाळ वनडेमध्ये सातत्य असलेला लक्ष्मण वर्ल्डकप का खेळू शकला नाही हा मुद्दा अजुनहि चर्चेत असतो. त्यावेळी मुद्दा हा झालेला कि भारतीय संघात एकाहून एक धुरंधर बॅट्समन येऊ लागले होते, म्हणजे एक फळी तयार होत होती. सचिन, सेहवाग,गांगुली, युवराज, धोनी,गंभीर अशी नवीन खेळाडूंची भरती होत होती. हि सगळी पलटण फिल्डिंग आणि बॅटिंगमध्ये बाप होती तेही लक्ष्मणच्या तुलनेत.

१९९९च्या वर्ल्डकप अगोदर बऱ्याच वनडे मॅचेस लक्ष्मणच्या खेळून झाल्या होत्या. पण तेव्हा त्याची वर्ल्डकप संघात निवड झाली नव्हती. २००३ च्या वर्ल्डकपच्या प्रमुख दावेदार खेळाडूंपैकी लक्ष्मण एक होता. १५ खेळाडूंच्या यादीत १३ लोकं फिक्स होती त्यात सहा बॅट्समन [ सचिन,सेहवाग,गांगुली, द्रविड,युवराज,कैफ ]  आणि सहा बॉलर [ झहीर,नेहरा, श्रीनाथ, आगरकर, हरभजन आणि कुंबळे ] राखीव विकेट किपर म्हणून पार्थिव पटेल होता. 

आता प्रश्न होता उरलेल्या दोन जागांचा एक जागा ऑल राउंडरची होती तर दुसरी जागा बॅट्समनची होती. बॅट्समनच्या जागी लक्ष्मणची निवड होईल असं लक्ष्मणसहित सगळ्यांनाच वाटत होतं. पण यावेळी वेगळं घडलं. ऑल राउंडरच्या जागी संजय बांगरची निवड झाली आणि बॅट्समनची जागा रिकामी होती.

आता त्या जागी दिनेश मोंगिया आणि लक्ष्मण यांच्यात फाईट होती. यावेळी फॅन्स पोलिंग झाली कि वर्ल्ड कपची टीम काय असावी. यात टीम फिक्सचं होती फक्त चान्स मिळाला तो दिनेश मोंगियाला.

कारण त्याने काही सामन्यांमध्ये वादळी खेळी आणि त्याचा पळायचा स्पीड चांगला असल्याने त्याची फॅन्स पोलिंगमध्ये निवड झाली. पुन्हा लक्ष्मणच्या पदरी निराशा पडली आणि त्याला वर्ल्डकपमधून वगळण्यात आलं.

लक्ष्मणच्या बायोग्राफीमध्ये जॉन राईट म्हणतो कि लक्ष्मणला असं वाट होतं कि जर त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली नाही किंवा एकदाही वर्ल्डकप खेळला नाही तर त्याच करियर धोक्यात येईल वैगरे. लक्ष्मणने उलट कोचवर आरोप लावले कि त्याला बॅकअप केलं नाही. यावरून बरेच वादसुद्धा झाले होते.

त्या वर्ल्ड कप मध्ये लक्ष्मणच्या ऐवजी निवड झालेला दिनेश मोंगिया चक्क फेल गेला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनल मॅच मध्ये भारताच्या बॅटिंग ऑर्डरने नामुष्कीजनक कामगिरी केली. जर कांगारुंची शिकार करण्यासाठी स्पेशालिस्ट समजला जाणारा लक्ष्मण टीम मध्ये असता तर चित्र वेगळं असतं.

वर्ल्डकपला निवड झाली नाही याचा वचपा लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्रँग्यूलर सिरीजमध्ये काढला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडकावलेल्या शतकी खेळी या लक्ष्मणचा उद्रेक दाखवून देतात. पुढच्या वर्ल्डकपवेळी सुद्धा ग्रेग चॅपलचा इश्यू आडवा आला आणि पुन्हा लक्ष्मणचा पत्ता कटला. 

परफेक्ट टेस्ट बॅट्समनचा शिक्का लक्ष्मणवर बसला तो कायमचा त्यामुळे त्याला वर्ल्डकपला मुकावं लागलं याच शल्य त्याला आयुष्यभर राहिलं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.