तेरा पक्षांचा पराभव करून पहिल्यांदाच शिवसेनेचा ढाण्या वाघ विधानसभेत पोहचला होता.

शिवसेनेच्या काळात साधारण ५० वर्षांपूर्वी एक दैदिप्यमान घटना घडली होती. शिवसेनेचे पहिले  आमदार वानराव महाडिक हे सेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. हो आजच्या दिवशी या विजयाला बरोब्बर ५१ वर्ष पूर्ण झालीत.

Shivsena : आजचा दिवस महत्वाचा मुख्यमंत्री पदाइतकाच महत्वाचा आहे....

आता फक्त २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण होणार अशी घोषणा करत शिवसेना राजकारणात उतरली झाली. सेना स्थापन होऊन ४ वर्षे झाले आणि विधानसभेत पोहोचण्यासाठी सेनेला ४ वर्षे लागले. आणि प्रश्न समोर येतो कि, हे पहिले आमदार कोण आहेत ? तर ते नाव म्हणजे वामनराव महाडिक !

आजच्याच दिवशी म्हणजेच १९७० मध्ये २० ऑक्टोबर रोजी वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले होते. 

१९७० च्या काळात परळचे तत्कालीन आमदार व कम्युनिस्ट नेते आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यांची हत्या झाली आणि राजकीय वातावरण तापलं होतं. कारण सेनेन त्यांना मारलं असे आरोप  तेव्हा केले गेले होते. आमदारांची हत्या झाल्यामुळे त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यांच्या त्यांची पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई उभ्या राहिल्या तर सेनेकडून नराव महाडिक उभे राहिले.

बाळासाहेबांनी “महाराजांचा भगवा विधानसभेत गेलाच पाहिजे” अशा आशयाचा अग्रलेख लिहून, सेनेने प्रचार सुरू केला. लोकांना भावनिक आवाहन केले.  याच निवडणुकीच्या प्रचारासाठी सेनेने एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तब्बल २८ जाहीर सभा घेतल्या होत्या.

शेवटी निवडणुकीचा निकाल लागला आणि कम्युनिस्ट पक्षाच्या सरोजिनी कृष्णा देसाई यांना एकूण २९९१३ एवढी मते पडली तर वामनराव महाडिक यांना ३१,५९२ एवढी मते पडली. महाडिकांनी १६७९ मतांनी विजय मिळवून शिवसेनेचा भगवा पहिल्यांदाच विधानसभेत नेला होता.  शिवसेना विजयी झाली आणि शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत गेला.

तब्बल नऊ राजकीय पक्षांचा पाठींबा मिळूनही कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला.

विशेष म्हणजे या निवडणुकीत सेनेचे निवडणूक चिन्ह होते “उगवता सूर्य” आणि चिन्हाप्रमाणेच याच निवडणुकीत सेनेचा राजकीय सूर्योदय झाला म्हणायला हरकत नाही. आणखी एक बाब म्हणजे याच निवडणुकीला सेनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठींबा मिळाला होता. संघाकडून मोरोपंत पिंगळे यांनी नागरिकांना आवाहन केलेलं कि, ‘साऱ्या हिंदुनी एक होवून शिवसेनेला मतदान करा”.

को होते हे वामनराव महाडिक ?

वामनराव महाडिक यांचा जन्म १५ जुलै १९२५ रोजीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताडेरे या गावाचा. सुरुवातीपासूनच ते सेनेचे नेते होते. १९६९ ते ७० मध्ये ते परळमधून निवडून आले.  १९७८ मध्ये ते मुंबईचे महापौर होते. १९८० ते १९८६ या दरम्यान ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ मधून निवडलेल्या ९ व्या लोकसभेचे सदस्य होते.

बाळासाहेब ठाकरें यांची त्या काळात असलेली तुफान लोकप्रियता आणि शिवसैनिकांनी केलेला तुफान प्रचार आणि मराठी माणसाला घातलेले भावनिक साद या सर्व गोष्टींच्या बळावर परळमध्ये शिवसेनेने पर्यायाने महाडिकांच्या रुपात भगवा फडकावला सेनेने विधानसभेत पाऊल ठेवलं होतं. आणि आत्ता याच पक्षाचे पक्षप्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत हि बाब पाहिली तर स्पष्ट होते कि, गेल्या ५४-५५ वर्षात सेनेचा दैदिप्यमान यशस्वी राजकीय प्रवास हा मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन थांबला !

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.