सगळ्या जगाला विकिलिक्स गोत्यात आणत होते आणि यांनी त्यालाच वापरून निवडणूक जिंकली

ज्युलियन असांज हा वाघ माणूस. शत्रूच्या जमिनीवर राहून त्याने जनतेसाठी उघड लढा दिला. त्याचं काम म्हणजे पत्रकारिता. पण आशीतशी साधीसुधी नाय.

थेट शत्रूच्या गोटात घुसून जगात सरकारे काय काय जनतेपासून लपवत आहेत, कोण किती पैसा जमवतो, किती लुबाडतो, किती कसे खर्च करतो याची इत्यंभूत माहिती काढणे. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये नेमके किती पैसे खर्च केले, केनिया आपल्या राजकारण्यांनी नेमकी किती लाच घेतली आणि क्युबाचा तुरुंगामध्ये नक्की काय होते, त्या सगळ्यांचा इत्यंभूत अहवाल करणारी ही संस्था म्हणजे विकीलीक्स.

अमेरिकेने आत्तापर्यंत लपवलेली एक लाख नऊ हजार लोकांची कत्तल केलेल्या करणारी युद्धाची कागदपत्रे विकिलिक्सने खुली केली.

एप्रिल 2011 पासून विकिलिक्सने याआधी लपवून ठेवलेल्या 779 फाइल्स लोकांसमोर खुल्या करायला सुरुवात केली.

जगातल्या माहितीचे हस्तांतर सरकारकडून लोकांमध्ये करणे हाच विक्रीच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला आहे यामुळे आतापर्यंत किती नेत्यांना खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले आहे.

पण एका माणसाने या नेत्यांच्या झोप घालवणार या वेबसाईटचा वापर करून चक्क खुर्चीवर बसून दाखवण्याची एवढेच नव्हे तर या वेबसाईटचा वापर करून निवडणुका जिंकण्याची करामत करून दाखवली होती

आणि तो माणूस म्हणजे नरेंद्र मोदी.

सुरुवातीला कुणीतरी नरेंद्र मोदी हे भारतातील कधीही भ्रष्ट होऊ न शकणारे एकमेव नेते आहेत असे म्हणताना ज्युलियन असांजे चा फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. यात असांजे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वारेमाप स्तुती केली होती.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या वेबसाईटवर या गोष्टीचा सविस्तर उल्लेख केला होता त्यासोबतच माध्यमांशी बोलताना ही ते यासंदर्भात विकिलिक्सची पाठ थोपटत होते.

एकीकडे देशातील काँग्रेसचे सरकार भ्रष्टाचार सोडून काहीही करत नाही असे अमेरिकन एजन्सी म्हणत आहेत मात्र दुसरीकडे जगभरात गुजरात सा चेहरा फक्त भ्रष्टाचार न करणारा असा नाही तर भ्रष्टाचार करू शकत नाही असा प्रस्तुत केला जातो आहे यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

विकिलिक्सने मला व्यक्ती म्हणून अनकरप्टीबल म्हणजे करप्ट न होऊ शकणारा, ज्याला कोणीही लाच देऊच शकत नाही असा केला आहे अस त्यांचं म्हणणं होतं. मोदीजी याविषयी बोलताना म्हणाले

“एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करत नाही ही साधी गोष्ट आहे पण तो भ्रष्टाचार करुच शकत नाही असे विकिलिक्सने भारतात संशोधन करून शोधून काढले आहे”.

त्यांनी भरपूर लोकांशी यासाठी बातचीत केली असा दावाही मोदी यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना केला होता.

पण विकीलीक्स खरोखर असे काही म्हटले होते का?

ही सगळी गडबड सुरू झाली होती ती 2011साली.

2011साली विकिलिक्सने गुजरात मधील एक शहर राजकोट येथील काही काँग्रेस नेत्यांचे परस्परात झालेले संभाषण लोकांसमोर उघडे केले होते. राजकोट मधील काँग्रेसचे नेते मनोहर सिंह जडेजा यांच्याशी झालेले संभाषण याचा एक भाग होते. यामध्ये जडेजा हे गुजरातची राजकीय परिस्थिती समजावून सांगत होते.

“येत्या काळामध्ये गुजरातमध्ये भाजपला तोंड देणे अवघड जाणार आहे. मुस्लिमही आता भाजपाला समर्थन देत आहेत, याचे कारण म्हणजे मोदी हे पूर्णपणे भ्रष्टाचार करुच शकत नाहीत अशा स्वच्छ प्रतिमेचे नेते झाले आहेत आणि त्यांच्यापर्यंत गोष्टी व योजना पोहोचवत आहेत असा लोकांचा समज झाला आहे. त्यामुळे मोदी लवकरच राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते होतील”

असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. आता ह्या संभाषणात मध्ये जडेजा यांनी “विकिलिक्सने असे म्हटले आहे” असा उल्लेख केला नाही. त्यासोबतच त्यांचे स्वतःचे असे मत आहे असेही ते म्हणत नाहीत. याबरोबरच केवळ जनतेच्या मनामध्ये त्यांची अशी प्रतिमा तयार होत आहे, याविषयी ते बोलत होते. या सर्व गोष्टी जगजाहीर होत्या. त्यामुळे या गोष्टी फार कमी महत्त्वाच्या होत्या.

पण याचा सगळ्यात चांगला वापर करून घेतला तो भाजपच्या आयटी सेलने.

या मुद्द्यावर भाजपने चक्क एक मोठे कॅम्पेन उभे केले. एकीकडे देशात भ्रष्टाचार वाढतच असताना दुसरीकडे भाजपाचे नेते हे जागतिक स्तरावर ती भ्रष्टाचार करुच शकत नाहीत अशा विशेषणाने गौरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विविध माध्यमांतून ही गोष्ट लोकांसमोर मांडण्यात आली.

आपल्या वेबसाइटवर देखील मोदींनी हे लगेच मांडून टाकले.

https://www.narendramodi.in/i-am-glad-that-america-admits-modi-is-incorruptible-hon%E2%80%99ble-cm/

नरेंद्र मोदी हे भ्रष्ट न होणारे नेते आहेत हे अमेरिकेने मान्य केले याचा मला आनंद आहे असे त्यांनी आपल्या वेबसाईटवर लिहिले.

माध्यमांशी बोलताना याचा उल्लेख मोदींनी केला होता यावेळी त्यांनी वेबसाईटवर वापरलेला ‘incorruptible’ शब्दांच्या ऐवजी व्याकरण दृष्ट्या चुकीचा आणि विकिलिक्सने कधीही न वापरलेला ‘un-corruptible’ असा शब्दप्रयोग केला.

याच्याही पुढे जाऊन कोणीतरी एक फोटो बनवला. त्यात असांजे याचा फोटो वापरला होता. खरेतर हा फोटो गमती मध्ये बनवला होता. यात वरचेच वाक्य स्वतः असांजे म्हणत आहे असे दाखवले होते.

पण बीजेपी मधल्या कार्यकर्त्यांनी याचा प्रचंड वापर केला एकीकडे असांजे जगभरातल्या नेत्यांना खाली ओढत असताना हा माणूस मोदींची स्तुती करत आहे असे वाटून या फोटोचा प्रचंड फैलाव केला गेला. जसं गांधीजींच्या फोटोच्या शेजारी कोणतेही सुविचार त्यांच्या नावावर ती खपवले जातात त्याचप्रमाणे हा फोटो कुणीतरी मीम म्हणून बनवला होता.

काही लोकांनी या नेमला सिरीयसली घेतलं आणि असांजे खरोखरच असं म्हणाला आहे, मोदीजी हे स्वच्छ शुद्ध चारित्र्याचे नेते आहेत असा गवगवा होऊ लागला.

या घटनांना 2011 च्या काळातच सुरुवात झाली होती. या काळामध्ये नेमके भारतात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन तापले होते. अण्णा हजारे आणि रामदेव बाबा यांच्या आंदोलनाचा प्रचंड प्रभाव तरुणांच्या मनावर होता. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेद्वारे लोकपाल विधेयकासाठी प्रचंड मोठे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध उभे करण्यात येत होते.

भारतात लवकरच भ्रष्टाचार विरोधी क्रांती होणार असून देशाचे चित्र कायमचे पालटणार आहे असे वातावरण तयार झाले होते.

त्यामुळेच हा मुद्दा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. जगातील एकूण एक भ्रष्ट लोकांना शोधून काढणारा माणूस जर मोदींना स्वच्छ चारित्र्याचा म्हणत असेल तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे असा लोकांचा मोठ्या प्रमाणात समज झाला.

भारतीय नेत्यांनी परदेशी लोकांचा आपल्या निवडणुकीत वापर करून घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही ओबामा त्यांच्यासमोर झुकत आहेत अशा प्रकारचा फोटो व्हायरल केला होता. हा फोटो मोठ्या प्रमाणात तमिळनाडूमध्ये पसरला आणि त्यांची कीर्ती गगनाला भिडली होती.

अर्थात ओबामा यांनी या बाबतीत कुठलीही लक्ष घातले नाही. त्यामुळे हा प्रकार तसाच खपून गेला.

पण जगभरातल्या नेत्यांची झोप उडवणाऱ्या विकिलिक्सने ही गोष्ट पचवून घेतली नाही.त्यांनी आपल्या वेबसाईटवर तसेच आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून ही गोष्ट स्पष्ट केली की ज्युलीयन असांजे यांनी मोदींना भ्रष्टाचारमुक्त म्हणणे सोडाच पण कधीही मोदींचा उल्लेख देखील केलेला नाही.

शिवाय एकच वीट न करता त्यांनी ट्विट्स ची मालिकाच बनवली आणि आपली बाजू स्पष्ट करत असे काही घडले नसल्याचा निर्वाळा दिला.

भारतीय जनता पार्टीकडून मोदीजींची खोटी भलावना विकीलीक्सच्या नावावर केली जात आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहून टाकले. त्याबरोबरच आपल्या वेबसाईटवर नरेंद्र मोदी यांच्या नावाची एक वेगळी लिंक तयार केली नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात असणारे सगळे कागदपत्रे त्या लिंक वर ती सोडण्यात आली. ही लिंक अजूनही उपलब्ध आहे. यामध्ये विकिलिक्सने आपण मोदींविषयी कोणतेही विधान केले नाही. मोदी भ्रष्ट नाहीत हे विधान येथील काँग्रेसच्या नेत्यांचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पण हे विकिलिक्सचे स्पष्टीकरण भारतात जास्त प्रसिद्ध झाले नाही.

काही निवडक माध्यमांनी या गोष्टीला प्रसिद्धी दिली. मोदी स्वतः विकिलिक्सने असे म्हटले आहे हे म्हणाले पण त्यांनी हा खुलासा केल्यानंतर मोदीजी यावर काहीही बोलले नाहीत.

तेव्हा भाजपचे प्रवक्ते असणारे मुक्तार अब्बास नकवी यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी त्याचे उत्तर दिले.

“मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना अमेरिकेच्या किंवा तेथील कुठल्याही संस्थेच्या प्रमाणपत्राची गरज नाही. देश त्यांना चांगले ओळखतो.”

अर्थात मोदींची प्रतिमा यामुळे प्रचंड सुधारली. 2014 च्या निवडणुकीत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असे अनेक पत्रकारांनी आपल्या लेखनात म्हटले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.